जन्मस्थळ
जन्मस्थळ


जवळ जवळ चाळीस वर्षाहुन जास्त कालावधी लोटला. आमचं राहणं सवरणं मुंबई शहरातच झालयं. गावातले सगळेच शहराकडे धाव घेतल्याने आम्ही शहर वाशीच झालो होतो. आणि कधी असा योग ही आला नाही की माझ्या आईच्या माहेरी म्हणजे आजोळी जावं लागलं.
हल्ली आम्ही मित्र मैत्रिणी भटकंती करतो त्यामध्ये वेगवेगळ्या गावाना ही भेटी देतो. अशा भेटी देत असता अचानक मी माझ्या आजोळच्या गावात सावर्डेपासून जवळ जवळ शे दिडशे कि.मी अंतरावर एक छोटासा गाव काकोडे आहे तेथे पोचलो. निर्सगाचे दर्शन घेत आम्ही गावे पाहत होतो. तेथे आम्हाला मुकाम करायचा होता, म्हणून आम्ही राहायची सोय बघू लागलो. एका मोठ्या वाड्यात पोचलो. वाडा खुप जुना होता. त्याची थोडी मागच्या बाजूची
मोडतोड झाली होती. तरी तेथे माणसे राहत होती. आम्ही आमची राहायची व्यवस्था होईल कां म्हणून चौकशी केली. तर मोठ्या आदराने त्या लोकांनी समंत्ती दिली. आमच्या जेवणा खाणाची ही व्यवस्था नीट केली.
सगळं आटोपल्यावर गप्पा मारत होतो. तेव्हा आम्ही कुठचे कोण ह्याची त्यांनी चौकशी केली. आणि आम्ही ही आमची सगळी माहिती पुरवली. गप्पाच्या ओघात त्यांनी माझी बारीक विचारपूस केल्यावर त्यांना कळून चुकले की तो वाडा माझ्या आईचे माहेरच. आता तेथे माझ्या ओळखीची कोणी नव्हती कारण बरेच वर्षे सरली त्यांच्याशी सबंध आलाच नव्हता.
पण आता त्यांनी सांगीतल्यावर मला ही खूप आनंद झाला. माझ्या आईचा माहेरचा वाडा माझं जन्मस्थळ. मी पहिला मुलगा असल्यांने पहिलं बाळंतपण माहेरीच व्हायचे. आणि त्यातूनही त्या काळी घरीच बाळंतपणे व्हायची. कधी बाई अडकली तर गावचा डॉक्टर बोलवायचे पण बहुतेक करुन बाळंतपणे घरीच एक वेगळीच खोली असायची तिला बाळंतीणीची खोली म्हणायचे. फक्त एक दार बाकी लहान खोली मिणमिणता दिव्याच्या प्रकाश. त्या खोलीला मला व सर्वानाच बघायची इच्छा झाली. ती बघताना एवढं भरून आलं की माझ्या आईने कळा सोसून किती त्रास सहन करून मला जीवन दिले! त्याकाळी निगा नीट ठेवली नसेल किंवा मूल पायाळू असेल तर किती भयंकर असायचे. आणि त्याच कारणाने बऱ्याच बायका व तानुल्याचा मृत्यू व्हायचा. तिकडच्या आजीने सांगीतलेल्या गोष्टीने मला माझ्या आई बद्दल खूपच अभिमान वाटला. आता उठसुठ बायका डॉक्टरकडे जातात त्यांना सर्व सुखसोयी मिळतात . आता गरिबातला गरीब ही बायका हॉस्पिटलमध्येच मुलाला जन्म देतात . खरंच धन्य त्या माता आणि महान ती वेगळी बाळंतीणीची खोली.