जन्जीरा
जन्जीरा
शाळेत सर इतिहास शिकवीत होते.. त्यात मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास होता.. कसे तानाजी मलासुरेनी आपल्या मुलाच्या लग्नाची पर्वा न करता सिंहगडाला झुंज देऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढून विजय मिळवला.. ते सिंहासारखे लढले म्हणून त्याला सिंहगड म्हणतात... लोक कर्तव्याला कसे महत्व देत होते हे सांगत होते.. तसेच शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले कसे जिंकले. काही हरलेही.. त्यातलाच एक किल्ला जन्जीरा जो त्यांना जिंकता नाही आला.. त्याला महाराजच काय कुणीही जिंकू शकले नाही.. जन्जीरा हा किल्ला अंबर मलिक ह्या मुघलाने बांधला..
जन्जीरा किल्ला कुणीही जिंकू शकले नाही म्हणून ह्याला अजिंक्य किल्लाही म्हणतात.. मुलांना ह्या अजिंक्य किल्ल्याविषयी जाणून घेण्याची खुप उत्सुकता होती.. सर म्हणाले शिवाजी नंतर संभाजी राजांनीही प्रयत्न केला पण त्यांना तो जिंकता आले नाही... संभाजींनी त्याच्या अंतरावर समुद्रातच दुसरा किल्ला बांधला.. त्याला कासा किल्ला म्हणतात.. हे दोन्ही किल्ले अरबी समुद्रात मुरुड इथे आहेत.. जन्जीरा जिथे बांधला ते पहिले एक बेट होते.. त्या सम्पूर्ण बेटावर 22 एकर जागेत जन्जीरा किल्ला अम्बर मलिक ह्या मुघल
ाने बांधला.. त्याला बांधायला 40 वर्षे लागलीत.. किल्ल्यात नावेने जावे लागते.. आत गेल्यावर मोठया तोफा आहेत ज्या अश्या धातूपासून बनविल्या आहेत त्या कितीही उन्हात थंड राहतात.. किल्ल्या त दोन गोडया पाण्याचे तलाव आहेत.. तिथे नैसर्गिक झरने होते त्या ठिकाणी 40फुटाचे तलाव किल्ल्यातील लोकांना पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आले.. त्या ठिकाणी हिंदूंसाठी मंदिर व मुसलमान साठी मसज्जित आहे.. तिथे शीश महल होते.. तसेच बाजारासाठी जागा, आणि एक भुयारी रस्ता आहे जो शत्रूने हल्ला केल्यावर जनतेला तिथून बाहेर निघता यावे म्हणून केला.. असा हा अजिंक्य किल्ला अजूनही दिमाखाने उभा आहे.. खरे तर हे सर्व गड किल्ले बघून त्या काळातील लोकांच्या ज्ञानाची कल्पना आपल्याला येते.. पण आपला हा इतिहास वर्षानुवर्षे टिकून राहण्यासाठी खरंच सरकारनी व जनतेनेही प्रयत्न करायला हवेत. त्यांची डागडुजी करून तिथे स्वच्छ ता ठेवायला पाहिजे..
मुले हे सर्व लक्ष देऊन ऐकत होते व मुलांनी आग्रह केला की आपण जन्जीराला शाळेची ट्रिप नेऊ या...
सर मुलांना घेऊन जन्जीरा ला गेला सर्वानी तेथील कचरा जमा केला व ट्रिपचा आनंद घेतला..