जिवाभावाची मैत्रीण
जिवाभावाची मैत्रीण
एका गावात राधिका नावाची बाई राहत होती.राधिकाचा नवरा आणि राधिका बाजारात भाजीपाला विकून मिळालेल्या पैशात आपली उपजीविका भागवत असत.एक दिवस राधिकाचा नवरा मोटारसायकल ने भाजीपाला मार्केट ला घेऊन जात असताना अचानक भरधाव ट्रकने उडवले.राधिकाच्या नव-याला जब्बर दुखापत झाली.मेंदूतून खूप रक्तस्राव झाला होता.तातडीने तीन ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितले होते.राधिका बिचारी पार हादरून गेली.तिला काहीच समजत नव्हते.राधिकाने त्यांच्या भावाला पैसे मागितले.पण भावांनी पैसे देण्यास नकार दिला.राधिकाजवळ जेवढी जमापुंजी होती ते सर्व जमा करून पहिले ऑपरेशन झाले होते.दुस-या ऑपरेशनची चिंता राधिकाला लागली होती.राधिकाला तिच्या मैत्रिणीची आठवण झाली.तिने गोपिका नावाच्या मैत्रीणींकडे धाव घेतली.झाला प्रकार सांगितला.गोपिकाने सोने नाणे मोडून,सर्व जमापुंजी राधिकाच्या नव-याच्या ऑपरेशन साठी दिले.राधिकाच्या संकटाच्या वेळी तिचे कोणीच नातेवाईक धावून आले नाही.पण राधिकाची जिवाभावाची मैत्रीण गोपिका देवासारखी धावून आली.आणि राधिकाच्या नव-याचे प्राण वाचले.राधिकाने कष्ट करून हळूहळू गोपिकाचे पैसे परत दिले....
तात्पर्य: चांगला मित्र संकटकाळी धावून येतो.म्हणून मैत्री ही चांगल्या गुणावरून टिकते. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं श्रेष्ठ
