जिजाऊ
जिजाऊ


मुघलांविरुद्ध मराठ्यांचे राज्य उभारले ते राजे महान शिवाजी होते..
त्यांच्या ह्या यशात सर्वात मोठा वाटा जो आहे तो त्यांची आई जिजाऊ चा.. त्यांचे बाबा शहाजी मुघलांच्या दरबारात सेनापती होते.. आई जिजाऊ शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न दाखवत असे.. त्यांना राम, कृष्णाच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न बिंबविले.. ते लहानपणीच त्यांचे सवनगडी मावळे जमवून लढाया, तलवारबाजी सारखे खेळ खेळत.. आणि मावळे कमी असून गनिमीकावा करून कसा शत्रूवर विजय मिळवायचा हेही शिकले..
शिवाजी महाराजांचे वडील सतत मुघलांच्या दरबारात असल्यामुळे बाहेर असतं.. त्यामुळे त्यांचे सर्व बालपण हे आईच्या सान्निध्यात गेले.. जिजाऊंनी त्यांना स्त्रियांचा आदर करणे, सर्वांशी मिळून मिसळून वागणे, कुणावरही अन्याय होऊ न देणे, ईश्वरावर श्रद्धा, दूरदृष्टी ह्यासारखे संस्कार दिले, . गनिमीकावा करून युद्ध लढणारे शिवाजी महाराज पहिले राजा होते..
ह्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून मावळ्यांच्या मदतीने वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा जिंकला.. त्यांनी प्रजेसाठी स्वराज्य निर्माण केले आणि अखंड काम केले.. जिजाऊंच्या सानिध्यात शिवाजीचं नाही तर शूर संभाजी ही घडले..
अशीही माऊली जिच्या संस्कारांमुळेच मराठ्यांचे राज्य स्थापन करण्यात शिवाजीला यश आले. अश्या माऊलीला शतशः प्रणाम... धन्य ती जिजाऊ ज्यांना लाभला शिवाजी सारखा पुत्र.. धन्य ती रयत ज्यांना लाभले शिवाजींसारखे राजे, धन्य ते राजे ज्यांना लाभले स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे मावळे, एकजुटीचा संदेश देणारी अशी ही माऊली असेल तर शिवाजी सारखे राजा घडेलच....