जीवन सरिता
जीवन सरिता


जगण्यात खरोखर जग जगते. जीवन म्हणजे काय मातेच्या उदरातून बाहेर पडताना जी पहिली किंकाळी बाहेर येते तिथे पासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास जन्मा वेळी च कोहम कोहम ची आरोळी हीच स्वतः ला विचारलेला प्रश्न 'को अहम' मी कोण?
हा जो प्रश्न आहे तो शेवटपर्यंत त्याचे उत्तर अलौकिक अर्थाने सापडणे कठीण माझा जन्म हा कलियुगतिल सांप्रत कोणता अवतार आहे ह्या अवताराचा उद्देश काय मी कोण? ह्याचे उत्तर जरी नाही मिळाले तरी सांप्रत मनुष्य आवतारात आहोत मनुष्यधर्म निभावून घेवू ही साधी गोष्ट कळण्याससुद्धा आयुष्य निघुन गेले असते.
आपण कुठे जन्म घ्यावा आपले पालकत्व कोणाचे हे जसे हातात नसते तसे आपल्या जीवनप्रवासामधे कोणी कोणी यावे हे सुद्धा योगायोगानेच कळत जाते, त्यालाच तर प्रारब्ध म्हणत असावेत. हा प्रवास मार्ग कोणाचा किती लांब किती कमी हे पण आपल्या हातात नाही. प्रवास कसा होईल सोबती कोणकोण असतील याचा ही मागमुस लागत नाही. प्रवास नेमका कोणत्या प्रदेशात होईल हे पण अनाकलनीय तरीपण जीवनप्रवास एखाद्या सरीतेप्रमाणे चालू असतो. सरीता येईल ती अडचणी पार करीत जाते. कधी नागमोड़ी होते, कधी उंचावरुन खाली येते, कधी प्रक्षुब्ध होते, कधी संथ वाहे कृष्णामाई... अशी विविध रुपे घेत असली तरी तिच्या पोटात काय दडले आहे हे पण कधी सांगत नाही. काहीवेळा ते गुपितच राहू पाहते तद्वत प्रत्येकाचा जीवनप्रवास पण पोटात कायकाय घेऊन जन्म करतो ते विधात्यालाच ठाऊक. पुढे काय वाढून ठेवले आहे ते येणारा काळ
ठरवत असतो तरीपण प्रत्येकाच्या मार्ग परीक्रमात काय असेल हे सांगणे कठिण.
जीवन हे असेच आहे कोण सुखी आहे कोण दुःखी-कष्टी आहे, कोण सरळमार्गी, कोण वाममार्गी, कोण खुशालचेंडू, कोण काबाडकष्टी... असे चित्रविचित्र कंगोरे दिसून येतात. प्रत्येक क्षण येतो-जातो तरी ही जीवनगंगा अखण्ड अबाधित निरन्तर चालू आहेच.
प्रत्येक व्यक्तीचे जीवनचरित्र हे कादंबरीसारखे भारलेले आहे. रामकृष्णही आले गेले, त्यांच्याविना जग का ओसची पडले....
जन पळभर म्हणतील हाय हाय... किंवा पुनरपि जननम जठरे शयनम... हा सिद्धान्तही कोणी लावू पाहतील. पण तो सिद्धान्तपण अनाकलनीय आहे.