जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


प्रिय रोजनिशी
लॉकडाऊनचा आज बाविसावा दिवस. आज मला कामावर जायचे होते. सकाळीच सगळ्यांच्या पोळ्या करून घेतल्या. आज बसस्टॉपवरती एक तास उभे राहावे लागले. एक एक तासाने बस आहे. कामावर पोहोचल्यानंतर चार-पाच दिवस आतल्या पेंडींग गोष्टी, परिचारिकांच्या ड्युटी लावणे, काय कमी जास्त आहे ते पाहणे, इत्यादी इत्यादी. पण मला आजचा दिवस मूळ लिहावंसं का वाटलं याचे कारण जे रुग्ण आमच्याकडे एक एप्रिलला क्वारंटाइन केले होते, त्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला होता. पण बाकीचे सारे बरे होऊन आज व्यवस्थित कोरोनाची कोणतीही लक्षणे न दिसल्यामुळे आज त्यांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे आमचे रुग्ण देखील खुश आणि आम्हीदेखील खुश. वाईटातून चांगले म्हणजे एकमेकाच्या संपर्कात आलेली सगळीच माणसे कोरोनाबाधित होत नाहीत.