जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


प्रिय रोजीनिशी,
आज पण सुट्टी होती. सकाळी उठून आमच्या ब्रुनोला फिरवून आणले. रस्त्यावरील इतर भटक्या कुत्र्यांना देखील खाऊ घातले. आम्ही रोजच अशा कुत्र्यांना खाऊ घालतो त्यांच्यासाठी स्पेशल डी-मार्टमधून बिस्किटे मागवतो. पण यावेळी कमी मिळाली, आणि आता तर त्यांना फीड करणे गरजेचे आहे कारण रोडवरील गाड्या बंद आहेत. मग कॉम्प्लेक्समध्ये येणाऱ्या पाववाल्याकडून पावाच्या लाद्या घेऊन त्या घातल्या.
घरी आल्यावर सकाळचा ब्रेकफास्ट त्याच्या सोबतीला रामायण व दुपारी जेवणाच्या वेळी महाभारत. बाकी रूटीन तेच ते. दुपारी थोडी वामकुक्षी. संध्याकाळी रामायण महाभारत रात्रीचे जेवण नातेवाईकांचे काळजीचे चौकशी करणारे फोन मुंबईच्या चाललेल्या हालातविषयी मनामध्ये चिंता इत्यादी इत्यादी...
थोडी ऑफिशियल कागदपत्रे सबमिट करायची होती. ती आमच्या येथील मेन ऑफिसला जाऊन सबमिट करून आले. दोघे मिळून आज मार्केटला जाऊन थोड्या भाज्या घेऊन आलो. मोठ्या मुलाचं वर्क फ्रॉम होम आणि छोट्यांचं हॉस्पिटलला डायलिसीस टेक्निशियन म्हणून काम करणे चालू आहे. श्रीमान जी घरात बसून कंटाळले आहेत. कधी एकदा लाॅकडाऊन संपतो असे झाले आहे. आता रोजनिशी लिहिणे आणि गुड नाईट...