Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shobha Wagle

Others


5.0  

Shobha Wagle

Others


जेव्हा मी द्वेष केला

जेव्हा मी द्वेष केला

2 mins 707 2 mins 707

मी स्वभावाने स्पष्ट व्यक्ती आहे. कुणाचे चांगले आवडले तर मी कौतुक करतेच तसेच मला काही आवडले नाही किंवा बरोबर वाटले नाही तरी ही मी पटकन बोलून जाते. आता हे सगळ्यांना आवडत नाही पण मी जगाची पर्वा करत नाही. सहसा मी मुद्दाम माणसे जोडत नाही किंवा त्यांच्याशी मैत्री ही करत नाही. पण कधी आपोआप मैत्री होत असते. एकमेकांचे विचार पटतात व मैत्री होते आणि अशी मैत्री मी खूप जपते. आता ही नातेवाईकांमध्ये किंवा बाहेरच्या लोकांमध्ये ही अशा माणसांकडून कधी माझा अपमान झाला तरी मी सहन करते. 'जाऊ दे माफ करू' असे म्हणून त्या व्यक्तिने माझ्यासाठी बरंच काही चांगलं केलंय हे आठवून मझ्या रागाकडे दुर्लक्ष करते व समोरच्याला माफ करते. ह्याचा अर्थ असा नव्हे की मी लाचार झाले. माझी परिस्थिती आड आली. पटकन माणसें तोडणे मला आवडत नाही. मी समोरच्याला खूप संधी देते. त्याने केलेले गुन्हे माफ करते.


पण सहनशक्तीला ही काही सीमा असते. आता ही सीमा संपते तेव्हा माझा राग उफाळुन येतो आणि त्या माणसाचा मी द्वेष करू लागते. हा द्वेष एवढा विकोपाला जातो की मी कुणाचेच काही ही ऐकुन घेत नाही. एकदा त्या माणसाला तोडले की पुन्हा त्याला माझ्या आयुष्यात स्थान नसते. कुणी ही किती ही विनवण्या केल्या तरी  त्या व्यक्ती बद्दलचा माझ्या मनातला द्वेष कमी होत नसतो.


माझा स्वभाव प्रेमळ, मायाळू आणि भावूक ही आहे. आणि ह्या स्वभावामुळे मी बऱ्याच वेळा द्वेषाकडे दुर्लक्ष केलेले असते. पण हा सगळा साठवून ठेवलेला द्वेष गोळा होऊन मला कठोर बनवतो. माझं मन पोलादी बनतं. जे मवाळ लोणी होतं ते आता अत्याचार सहन करून कठोर दगड बनतंय आणि नंतर ह्या दगडाला पाझर फुटणे अवघड असते व ह्यावर माझा द्वेषच मात करतो.


Rate this content
Log in