# जबाबदारी...
# जबाबदारी...
"दीपा ऐ दीपा, अग उठतेस का ...! किती वाजलेत बघ...?? दीपा आणखीनच पांघरून ओढून आई काय ग...! तुझी सकाळी सकाळी कटकट असते. झोपू दे मला...दीपा अगदी ओरडूनचं बोलली. आजी तिला तिकडून बोलू लागली, हा आता झोपा काढ. सासू बरोबर जिरवते अशा पोरींची. आजी रागानेच बोलत होती..., "दीपाला
दीपाची आई रागानेच निघून गेली किचनकडे. तिलाही दीपाच्या आळशीपनाचा खूप राग येत होता. दीपा लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी. अती लाडाने तिच्या अंगात भयंकर आळस शिरला होता. कधीही कॉलेजला जायचं, कधीही उठायचं, अभ्यासाशी तर काहीही संबंध नव्हताच. काटावर पास होत आलत्या मॅडम...! जबाबदारी तर कोणतीच घेईला नको. वडील नेहमी म्हणत, "असुदे ग लहान आहे अजून..! सासरी गेल्यावर करेल सर्वकाही....!!"
"आहो पण अशीच राहिली तर, आपल्यालाच सासरकडची नावे ठेवतील. लहान काय आता लग्नाचं वय झालं तीच," आई काळजीच्या स्वरात बोलत होती.
आजी दोघांचं बोलणं ऐकत होती, हा तू ठेव लाडवून म्हणजे अजून काही दिवसांनी डोक्यावर मिऱ्या वाटेल. असं दोघांना बोलून, आजी रागानेच तिच्या रूम मध्ये निघून गेली.
दीपा दहा वाजता उठली, कॉलेजचे दोन लेक्चर तर गेलीच होती. काम निवांतच चाललं होतं तीच. आईने केलेला चहा नाष्टा उरकला. जाग्यावरच चहाचा कप आणि नाश्त्याची डिश ठेवून कॉलेजला निघून गेली. तिच्याकडे बघून जाताना आजीने तोंड वाकडं केलं. तरीही ती आपल्याच विश्वात हसत निघाली. आईला जाग्यावर ठेवलेला चहाचा कप आणि डिश पाहुण खूप राग आला.
आईने दीपाला स्थळ पाहुयात. आणि चांगलं असेल तर लग्न करुण टाकुयात.... असा तगदा लावला होता . जवळच नात्यातील स्थळ दीपाला सांगून आलं. लग्न म्हणजे जबाबदारी ह्याविषयी दीपा अलिप्त होती. तसें पाहिले तर दीपाचीही पुढे जाऊन काही करण्याची इच्छा नव्हती.
तो दिवस ठरलाच दीपाला पाहायला पाहुणे आलेच. दीपाच्या घरातल्याच्या मनासारखं सुयोग्य स्थळ होतं. दीपालाही मुलगा आवडला. जवळचाच मुहूर्त पाहुण लग्न झाले. नव्याचे नव दिवस आता संपले होतें. एकत्र कुटुंब असल्याने दीपाला आता पुढे येणाऱ्या जबाबदाऱ्या समजणार होत्या.
दीपाला एका प्रतिष्टीत भल्यामोठ्या घरात दिले होतं. कुटुंबामध्ये दोन दीर दोघांचीही लग्न झाली नव्हती.सासू सासरे, आणि दीपा आणि दीपाचा नवरा ... त्यामुळे दीपा थोरली सून म्हणून घरात आली होती.
दीपा इकडे ये जरा तुझ्याशी बोलायचे आहे. दीपा मी घरातील सगळ्या जवाबदाऱ्या मी तुझ्याकडे सोपवणार आहे, "दीपाची सासू दीपाशी बोलत होती......, तर उद्यापासून पहाटे पाच वाजता उठायचं. दीपाला तर ऐकूनच अंगावर काटा आला. पुढे सासू म्हणाली, "आपल्या घराची ती सवयच आहे सकाळी उठण्याची...!! त्यानंतर अंघोळ केली की देवाची पूजा करायची. नाष्टा मी सांगेल तोच करायचं. टिफिन लवकर झाले पाहिजेत, "सकाळी दहाच्या आधी तुला आवरलं पाहिजे, आणि हो फरशीला आणि भांड्याला कामवाली आहे. तुला सर्वांचे कपडे धुवायचे आहेत.
दीपाला हे पण काम म्हणजे..., दीपाला ऐकूनच घाम फुटला होता. सासूबाईं रोज सकाळी चालायला जात त्यानंतर त्या योगा क्लासला जायच्या. त्यामुळे त्यांचा घरात हातभार कशालाच लागणार नव्हता.रोज सकाळचे दीपाच रुटीन चालू झालं. कपबशी न उचलणारी दीपा आता घरातील सर्वांच्या जबाबदाऱ्या उचलताना दमून जायची. कधी कधी तिला पळून जावं वाटत. पण तशी तिने हिम्मत केली नाही. आजीचं, आईचं बोलणं, रागावणे तिला सारख आठवत. त्यांच्या चिडण्यामागचं कारणही तिला समजलं होतं. काम करताना तिला आईची खूप आठवण येत. आठवणीने नकळत डोळ्यांच्या पापण्या ओल्या होतं. आईला खूप त्रास दिल्याचा पच्छाताप ही....!
आज नवीन आलेल्या जबाबदाऱ्यांनी तिच्या आयुष्यातील चूक तिला समजली होती. आळशीपणाने तिच्या आयुष्या्तून पळ काढला होता. तिची चूक तिला उमगली होती. त्याची जागा आदर्श गृहिणीने घेतली होती.
