जाणता राजा
जाणता राजा


जाणता राजा
निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारू अखंड किर्तीचा निर्धारु जाणता राजा
असे शिवाजी महाराजांचे वर्णन समर्थ रामदासांनी केले आहे शिवरायांचेकैसे चालणे,
,शिवरायांचे कैसे बोलणे
शिवरायांचे कैसे वागणे
सर्वांठाई
सर्वाठाई समान वृत्तीने वागणारा उत्तम नेतृत्व गुण असणारा आया-बहिणींची अब्रू साठी तळहातावर शिर घेऊन लढणारा घेऊन शत्रूच्या स्त्रिला देखील सन्मानाने वागवणारा सर्वांना हवाहवासा सर्वांना जवळचा वाटणारा ,तरीही शिस्तबद्ध कारभार करणारा, अगदी जवळची व्यक्ती असली तरी त्याच्या चुकीची गय न करणारा उत्तम लढवय्या समय सूचकतेची जाण असणारा सैनिकांची काय पण त्यांच्या कुटुंबाची देखील काळजी घेणारा असा हा जाणता राजा त्रिखंडात पुन्हा होणे नाही.
शिवरायांनी पाठविलेल्या पत्रांमधून या सर्व गोष्टी कळतात आपल्या मावळ्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला जरादेखील धक्का लावू नये तसेच जोरी जबरदस्तीने कोणाच्या शेतातील वस्तू आणू नये तर ती विकत घ्यावी.
एवढाच विचार न करता रात्री झोपताना दिव्याची वात विझवून जाऊन मग झोपावे अन्यथा उंदरांनी ती वात नेल्यास आग लागण्याचा धोका आहे, हे देखील ते आपल्या सैनिकांना सांगतात इतक्या बारकाईने प्रजेचा विचार करणारा राजा कोठे आढळत नाही. शिवरायांच्या संपूर्ण चरित्रातून त्यांनी स्त्रियांविषयी दाखविलेला आदर भाव मग ते मातोश्री जिजाबाई असोत सईबाई असोत किंवा शिक्के कट्यार बहाल केलेल्या सुनबाई येसूबाई असोत त्यांच्याशी केलेल्या वर्तणुकीतून हा आदर भाव दिसतो एवढेच काय प्रजेतल्या एखाद्या सामान्य स्त्रीसाठी रांझ्याच्या पाटलाचे हात तोडण्याचा हुकुम ते देतात.
गनिमी काव्या सारखे तंत्र हे शिवरायांनी शोधून काढले त्यामुळे कित्येक वेळा मुठभर मावळे घेऊन त्यांनी लढाई जिंकलेली आहे त्यातून त्यांचे उत्तम नियोजन दूरदृष्टी निडर वृत्ती दिसून येते.
चारही बाजूने प्रतिकूल परिस्थिती असताना शून्यातून निर्माण केलेले विश्व त्यांचे छोटेसे ते राज्य यांचे विश्वासू साथीदार जीवाला जीव देणारे मावळे यातून त्यांची माणूस पारखण्याची नजर आणि माणुस जोडण्याची कला या गोष्टी दिसून येतात.
आग्र्याहून केलेली सुटका व त्यानंतर ते महाराष्ट्रात कोणत्या मार्गाने आले आजतागायत तो मार्ग कोणाला सापडलेला नाही शत्रूचा देखील विश्वास संपादन करून किती बारकाईने त्यांनी नियोजन केले असेल?
एकूण महाराष्ट्रात त्यांनी 496 गड-किल्ले उभारले पण एवढ्यावरच न थांबता दक्षिणेकडे कर्नाटकात जिंजी येथे दुसरा रायगड उभा केला कारण त्यांची दूरदृष्टी अगदी उभा महाराष्ट्र जरी शत्रूच्या हाती सापडला तरी जिंजीकडे सुरक्षित पणे जाता येईल येईल हा विचार त्यांनी केला होता.
एक एक वर्ष एकेक किल्ला जरी लढवला तरी शत्रूला पाचशे वर्षे तरी महाराष्ट्र घेता येणार नाही.
या त्यांच्या दूरदृष्टीचा उपयोग त्यांच्या निधनानंतर सुद्धा झालेला आहे औरंगजेब सर्वशक्तीनिशी महाराष्ट्रात मराठेशाही बुडविण्यासाठी उतरला होता परंतु या महाराष्ट्राच्या मातीत त्याला गाडला यातूनच महाराजांनी आपल्या नंतर चे नियोजन देखील किती उत्तम केले होते हे दिसून येते.
महाराजांच्या नंतर संभाजी महाराज लढले त्यानंतर राजाराम महाराज लढले त्यानंतर ताराराणी लढले धनाजी संताजी लढले आणि सगळी प्रजा एकत्र होऊन इतकी मोठी स्वातंत्र्याची जिजीविषा त्यांनी लोकांच्या मनात पेरून ठेवली होती.
अश्वपति, गडपती भूपती हयपती असा हा सर्वांची मने जाणणारा, मने जिंकणारा वर्षानुवर्ष प्रेरणेचा श्रोत बनून राहिलेला जाणता राजा या त्रिखंडात पुन्हा होणे नाही.
अस्सा राजा झाला नाही पुन्हा नाही होणार
छत्रपती शिवराय हे नाव या जगी गर्जतच राहणार.