STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

I2...चला हवा येऊ द्या....

I2...चला हवा येऊ द्या....

1 min
221

12...आवडती विनोदी मालिका

चला हवा येऊ द्या....


चला हवा येऊ द्या या मंचाने किंव्हा किंबहुना मालिकेने एक वेगळे विरंगुळ्याचे दालन उघडले.निलेश साबळे आणि त्याच्या टीम ने मराठी माणसांच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले.थकून भागून आल्यावर चार मनोरंजनाचे क्षण अनुभवास मिळणे म्हणजे खरोखरच क्षीण घालविण्यासाठी उपयोगी पडणारे टॉनिक म्हंटले तर वावगे ठरणार नाही.योग्य समर्पक माफक आणि मुख्य म्हणजे हस्याची चिळकांडी उडवणारे लिखाण आणि सादरीकरण यामुळे "चला हवा येऊ द्या" ने इतिहास रचण्यास सुरुवात केली आणि अजूनही तितक्याच ताकतीने ती हवा खरोखरच टिकून आहे.मनापासून शुभेच्छा देण्या पासून कोणताही मराठी माणूस स्वतःस वाचवू शकत नाही हे या मालिकेचे खरे यश आहे. हिंदीचा सुद्धा प्रेक्षक खेचून मराठीच्या मागे लावण्याची शक्ती यांनी राखली आहे हे नक्की.अशीच मालिका सदैव आमच्या सारख्या मध्यम,उच्च,आसनी इतर सर्व थरातील प्रेक्षकांना जन्मो जन्मी हसवत राहो ही सदिच्छा...शेवटी मनात येते

चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या

बाबांनो मला लवकर

घरी जाऊ द्या...

वेळ झाली हसण्याची

स्वतःवरच स्वतः खुश होण्याची

चला हवा येऊ द्या पाहण्याची

घरी मस्तच मजेत सुखी होण्याची...



Rate this content
Log in