STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

हसू

हसू

2 mins
5

*हसू*

 हसू ही माणसाला लाभलेली एक सुंदर दैवी देणगी आहे.फक्त ओठ प्रसरण की हसू चेहऱ्यावर. आपल्या चेहऱ्यावरचे हसू मनातला आनंद व्यक्त करतात. आणि जरी मनी दुःख असले तरी समाजात स्मित हास्य फुलवावेच लागते. हास्याची झुळूक चेहऱ्यावर आणावीच लागते. हसण्याने ताण कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. समोरच्याला आपला हसरा चेहरा बघितला की त्यालाही आनंद होतो. एक छोटंसं हसूही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवू शकतं. त्याच्या मनातला दुःखावर काही वेळ का होईना पडदा पडला जातो. हसऱ्या स्वभावामुळे नाती अधिक घट्ट होतात. नात्यांची वेळ मिळायला मदत होते. हसू हे कोणत्याही औषधापेक्षा प्रभावी असते. मनातल्या दुःखावर पांघरून घालण्यासाठी हास्याची अतिशय मदत होते. कठीण प्रसंगातही हसत राहणं ही मोठी ताकद आहे. हीच ताकद माझ्यामध्ये असल्यामुळे माझ्याकडे किती दुःख आहे, हे कोणाला समजतच नाही आणि या दुःखाचा शो का करायचा? आपल्या प्रत्येकाला आपापल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी, काही ना काही दुःख असतात त्यामुळे आपण आपलं दुःख घेऊन समाजामध्ये हास्याची लकीर फुलवावी हे मात्र निश्चित. आपल्या दुःखाचे कोणाला काहीही घेणे घेणे नसते हा स्व अनुभव आहे त्यामुळे समाजामध्ये वावरताना आपण इतरांना हास्याच्या फुलझडीने खुश करावे व हे मात्र निश्चित. हसण्यामुळे वातावरण सकारात्मक आणि आनंदी बनते. आपण स्वतः आणि समोरचा दोघेही खुश राहतात. हसू हे विनामूल्य असलं तरी त्याची किंमत अनमोल आहे. या हसण्याची किंमत कोणी दुःखा मधून फुलवलेली असते तर कोणी खरंच अतिशय सुखी असतो म्हणून तो हसतो. कोणाकडे हे दुःख आणि सुखाची पाठशिवणी असते पण ते हसरे असतात. म्हणूनच प्रत्येकाने हसत राहून जीवन सुंदर बनवावे. हे जीवन सुंदर आहे. वसुधा 🍫❤️🖊️


Rate this content
Log in