SWATI WAKTE

Children Stories Inspirational

4  

SWATI WAKTE

Children Stories Inspirational

हरविलेले हसु

हरविलेले हसु

2 mins
497


राजलक्ष्मी एक खुप श्रीमंत घरातील मुलगी असते. ती खुप श्रीमंतीत वाढलेली असते. ती 12 वर्षाची सातवीत शिकणारी मुलगी असते. तिला सर्व गोष्टी मागण्याच्या आधीच मिळतात त्यामुळे तिला कसलेच कुतूहल किंवा आश्चर्य नसते. ती तिच्या कुटुंबासोबत पूर्ण जग फिरलेली असते.. ह्या सर्व गोष्टीमुळे तिला कळत नाही की खरा आनंद काय असतो. लहानपणापासून तिला होम ट्युटर शिकवायला येतात ते तिच्या कडून वेळेवर व्यवस्थित अभ्यास करून घेतात. तिची बुद्धी तल्लख असल्यामुळे ती लगेच अभ्यास करून घेते.. ती वर्गात नेहमी पहिलीच राहते.. त्यामुळे तिला त्याचेही नवल किंवा आनंद होत नाही. ती खुप कमी हसते. तिला मित्र, मैत्रिणीही एक, दोनच असतात.. ती हसत नाही आनंदी दिसत नाही ह्यामुळे तिचे पालक काळजीत असतात. त्यांना कळत नाही की बाकी मुलं राजलक्ष्मीच्या वयाचे आनंदी राहतात तशी ही का राहत नाही.. ते तिला विचारण्याचाही प्रयत्न करतात पण आनंद काय असतो हेच तिला कळत नाही... तिचे पालक तिला मानसोपचार तज्ञाकडे काउनसेल्लिंग ला नेतात तर तिच्याशी बोलल्या वर त्यांना कळते की हिनी दुःख म्हणजे काय हे पहिलेच नसल्यामुळे तिला आनंद कळत नाही. त्यामुळे मानसोपचार तज्ञ तिला सांगतात हिला अनाथ, गरीब मुलं दाखवा. अनाथ आश्रमाला भेट द्या हिच्या हातून नेहमी त्या मुलांना दान देत रहा. त्यांच्या समस्या हिला समजावून घेऊ द्या म्हणजे हिला कळेल की आनंद काय असतो.. तिचे पालक तिला अनाथ आश्रमात घेऊन जातात.. अनाथ आश्रमातील मुलं कुणीतरी आले हे बघून खुप खुश होतात..ते इतके आनंदी होतात की राजलक्ष्मीशी स्वतःहून बोलायला येतात.राजलक्ष्मीला बघून हाय, हॅलो करतात.. तिला आश्रम दाखवतात.. ते आश्रमात शिक्षणासोबत स्वतःची कामे कशी करतात हेही सांगतात. तसेच त्यांना आश्रमात स्वकमाई करण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार वस्तू बनवून त्याची विक्री करणेही शिकवतात.. त्यांनी आश्रमाजवळ एक बाग स्वतः कशी फुलवली हे दाखवतात.. त्यांना आई बाबा नसतानाही सर्व आपले समजून कसे राहतात हेही सांगतात.. आणि ते खुप आनंदी राहतात हे सर्व बघून राजलक्ष्मीला खुप छान वाटते व नविन मित्र, मैत्रिणी मिळाल्याचा आनंद होतो.. ती तिच्या आई बाबांनी आणलेली गिफ्ट सर्वांना देते व पुढच्या वेळी मी स्वतः तुमच्या साठी माझ्या हातानी काही तरी बनवून आणेल असे सांगते.. आश्रमातील मुलंही तिला त्यांनी बनवलेली गिफ्ट देतात.. तिला सर्व काही मिळत असते पण ते गिफ्ट घेऊन तिला खुप आनंद होतो..हे बघून तिचे पालक खुप खुश होतात.ती तिच्या पालकांना सांगते की आपण दर वीकएंड ला इथे येऊ.. ती स्वतः वस्तू बनवून घेऊन येते.. आणि त्यात तिला खरा आनंद मिळतो.. आता ती अभ्यास करून गिफ्ट बनवते आणि त्या मुलांनी दाखवल्या प्रमाणे स्वतःच्या घरासमोरच्या बागेचीही काळजी घेते.. आणि राजलक्ष्मी आता सतत खुश, हसतांना दिसते...

तिचे हरविलेले हसणे गवसते..


Rate this content
Log in