The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

किशोर राजवर्धन

Others

5.0  

किशोर राजवर्धन

Others

ह्रद्यस्पर्श मैत्री

ह्रद्यस्पर्श मैत्री

6 mins
1.4K


मैत्री हा शब्दचं जणु आयुष्यात गोडवा भरणारा आहे. कारण, मित्र आणि मैत्रिणी यांच्या सहवासात वेळ कशी क्षणभुंगार होऊन निघुन जाते हे कळतच नाही. कॉलेजची वर्ष मित्र आणि मैत्रिणी यांच्या सहवासात कधी संपली हे कळचं नाही.

आज मी एकटाचं ज्या ठिकाणी आम्ही चर्चा करण्यास जमायचो तेच उदयान आज मला एकट्याला पाहुन हसत होतं.

मला कधी वाटलही नव्हतं की, मी एकटा निवांत मित्रांचा विचार करत बसेल म्हणुन, कारण त्यांच्या सहवासात जणु मी स्वत:ला शोधत होतो. त्यांच्याशी वाद-विवाद करताना जणू मी त्या क्षणी कमी पडायचो. पण, आज असे दिवस येऊन उभे आहेत की, ते मला विचारतात:

“कुठे आहे तुझे मित्र …..? कुठे आहे तुझ्या मैत्रिणी…? जे तुला हसवायचे, जे तुला चिडवायचे.. ते मित्र - त्या मैत्रिणी, तुला वेडा म्हणुन तुझ्यातला शाहाणपणा जपण्याचा प्रयत्न करणारे……”

या प्रश्नाचे उत्त्तर देताणा मी म्हणालो :

“त्यांच्या आठवणी ते क्षण मी एखादया खाऊच्या डब्या सारखे ठेवले आहे. जसे लहान बाळ आपला खाऊचा डबा कुणाला माहित पडू नये म्हणुन लपवून ठेवते ना….! तसे, मी माझ्या मित्र – मैत्रिणीच्यां आठवणी वेळेच्या पूडीत बांधुन ह्र्दयाच्या डब्यात संभाळुन ठेवल्या आहे. जेव्हाही मला ह्या डब्यातील खाऊ खावा वाटतो, तेव्हा मी तो पूडी उघडून त्या डब्यातील खाऊ चाखण्याचा प्रयत्न करतो…………”


**************************************************


वा-या सारख तिचा तो खेळकर पणा, तारुण्याचं फुल फुलण्यासाठी तयार होणार तिच यौवन, काळ्या - तांबड्या रंगाचे रेशमी केस, काळेभोर डोळे, तीच्या शिवाय तीच्या मित्र-मैत्रिणी नां करमत नसे ती अंजली.

सुर्याच्या पहिल्या किरणा सारखा त्याचा प्रभाव, तारुण्याच्या वयात समावणारी खेळ्कर वृत्ती, झ-यातुन पाझरणा-या पाण्या सारखे पाणीदार डोळे, शांत सागरा सारखा स्वभाव तो राज.

राज आणि अंजली ह्या दोघांमध्ये खुप खोल मैत्री होती. ते दोघे एकाच बँचवर बसत असे...........हे दोघे एकमेकांशी खुप जवळीक पणे वागतात. ह्यात सांगायची गंमत म्हणजे राज एका मुलीच्या प्रेमात पडला. ती मुलगी त्याला दररोज स्टेशनला दिसते. ही गोष्ट त्याच्या काही मित्रांना माहित होती की, राज हल्ली जास्त वेळ स्टेशनवर तील पाहण्यासाठी काढत असे.

एकदा सर्व मित्रांन मध्ये चर्चा, मस्करी चालु होती. पण राज आज शांत बसला होता. तेव्हा सुमेशने त्याची मस्करी करण्याकरिता त्याची प्रेम काहानी सर्व मित्र - मैत्रिणी समोर उघड केली..... काही वेळ झाल्या नंतर "प्रेड ऑफ" असल्याने सर्वजन बसून कंटाळले...........जरा फिरुन येउया म्हणुन वर्गा बाहेर निघु लागले. तेवढ्यात अंजली ने राज चा हात पकडला.........तिच्या ओठात शब्द येऊन जणू गोठले होते. पण ती काहीच बोलत नव्हती......फक्त त्याच्याकडे पाहातचं होती. (ती जणू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. राजला हे जाणवल की, अंजलीला काही तरी बोलायचं आहे. पण त्याने तिला विचारलं नाही.) त्या क्षणी तिने हद्यातील कितीतरी अश्रु गोठण्याचा प्रयत्न केले हे तिलाच ठाऊक.......

एक दिवस संपुर्ण वर्ग रिकामा होता. दोघे लवकर आले होते. ते दोन तरूण हद्य एकाच बँचवर एकांतात गप्पा मारत बसले होते. त्याच्या बोलण्याचा आवाज त्या वर्गातील प्रत्येक कोप-याला स्पर्श करुन पुन्हा ऐकु येत होता. खिडकीतुन हिवाळ्यातील सकळचा गार वारा त्या वर्गातुन लपंडावाचा खेळ खेळत त्या दोन तरूण हद्यांना स्पर्श करून त्या वर्गात वावरत होता. दोन तरूण हद्य तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे होते. हे पाहुन त्या वर्गातील भिंतीनी जणु लाजाळु पण स्विकारल होतं.

अंजलीने राजला विचारले की, " ती दिसायला कशी आहे ? "

पण राज तीला त्या विषयापासुन दुर नेण्याचा प्रयत्न करत होता. हे अंजलीला जाणवत होत. (दोघे ही काही क्षण गप्प राहिल्यावर राजला वाटलं की, आपल्या हद्यातील दु:ख व्यक्त केल्या शिवाय पर्याय नाही.) म्हणुन त्याने अंजलीला सांगण्यास सुरुवात केली........

" एखाद्य फुला प्रमाणे सुदंर, इंद्रधनुष्या सारखं तिचं स्मित हास्य, गुलाबाच्या पाकळ्या सारखे नाजुक ओठं, तिच्या डोळ्यात पाहाताना माझ्या स्वप्नांच अस्तित्त्व त्यानां भेटत, ती साधी राहुन ही तीचं सौदंर्य फूलुन दिसणारी " (हे सर्व राज अंजलीला सागंत होता. ती, पृथ्वी प्रमाणे आकाशाच बरसण सहण करत होती. क्षणभर वेळ जणू स्तब्ध उभी होती...............)

तेवढ्यात अंजली उद्द्गारली " तु कधी तिच्या मनाचा विचार केलास का? " ह्या उत्तराने राज जरा विचलीत झाला. जणू क्षणभर त्याच विचार करण्याचं सामर्थ थाबंल. कारण त्याने कधी ही तीला समजण्याचा प्रयत्न केला नव्हता, तीच्या भावनांचा विचार केला नव्हता आणि हे सत्य त्याला त्याच्या बेस्ट फ्रेंड अंजलीने ठाम पणे सांगितल की, तु दुस-याच्या भावना समजण्याचा प्रयत्न करत नाही.( राज तिच बोलणं ऐकत होता. एकटक तो तीच्या कडे पाहतच होता. तिच्या चेह-यावरचे हावभाव निहाळताना, तिच्या मनातील सौदंर्य जाण्याचा तो प्रयत्न करत होता. क्षणभर तो तीच्या डोळ्यात पाहु लागला.) दोन तरुण मन एकमेकांना हात देत होते.......................पण तेवढ्यात सर्व मित्र - मैत्रिणी गोळा झाले. दोघं ही एकमेकांच्या भावना समजून ही दुर्लक्ष करत होते.


(आयुष्यात वेळ कधी थांबत नसते, त्याचं प्रमाणे बी.क़ॉमच शेवटचं वर्ष संपण्याचे दिवस जवळ येऊ लागले.................. परिक्षा झाल्या होत्या. काही दिवसांनी निकाल लागणार होता.)

निकालाच्या दिवशी सर्वांनी भेटुन पार्टी करायच ठरवलं. सुमेश ने सर्वांना फोन करुन कॉलेज मध्ये नेहमीच्या ठिकाणी भेटायच ठरवल.

ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी हे सर्व मित्र - मैत्रिणी चांगल्या टक्क्यांनी पास झाले. पुन्हा लवकर कधी भेट होणार किंवा नाही हे निश्चित नव्हतं. ह्या विचाराने साक्षीचे डोळे भरून आले. मित्र - मैत्रिणी यांच्या सहवासातले दिवस तीला आठवू लागले. सुमेश आणि अंजली तिला समजवू लागले. पण तीला समजवताना त्यांचे ही डोळे भरुन आले. एकमेकांच्या कुशीत रडू लागले. कॉलेजच्या दिवसात केलेली मौज,मज्या मस्ती त्यानां आठवत होती. तो दिवस आठवणीत राहावा म्हणुन त्या दिवशी त्यांनी हॉटेल मध्ये पार्टी केली, मरिनड्रायच्या किनारी फिरायला गेले. आयुष्यातले काही क्षण त्यांनी वेचले. जेव्हा वेग - वेगळे होण्याची वेळ आली. तेव्हा सर्व मित्र - मैत्रिणी एकमेकांना अखेरची भेट दिली आणि सर्वजन निघुन गेले. खुप दिवसा नंतर अंजली आणि राज हे दोन तरुण ह्द्य पुन्हा एकांतात सापडले. ती वेळ जणू त्या दोन तरुण हद्यांसाठी कातरवेळ सुरु झाली होती. दोघे गप्प होते.(पण एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते.)

तेवढ्यात अंजलीने राजला विचारले " तिचं नाव तरी सांग "

राज कोमजलेल्या स्वरात उद्द्गारला " तिचं नाव सांगुन आता काय करायचं ? "

अंजलीने विचारले " का काय झालं?"

राज कोमजलेलाच होता आणि म्हणाला "जाऊ दे अंजु.. "

(चालता - चालता दोघे अंजलीच्या चाळी समोर आले..........त्यांच बोलणं अर्धवट राहिल. पण राजच्या बोलण्यातुन प्रियाचा नकार हे अंजलीला स्पष्टपणे कळला.)

थोड वेळ अंजली राजला निहाळुन पाहत होती. राजला तीच्याशी खुप काही बोलायच होतं..............(उन्हाळ्यातील मुंबईची दमट हवा त्यांना स्पर्श करत होती. आजुबाजुच्या परिसरात काय? हालचाल चालु आहे. त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते.) तेवढ्यात अंजलीच्या चाळीतल्या मैत्रिणी तीला हाक मारली.

"अंजु..!" अंजलीने तिला थांबण्याचा इशारा केला आणि राजला bye..करण्यासाठी हात पुढे केला.. राजने हात मिळवला. त्या क्षणी तीच्या हाताच्या स्पर्शाने तो जणू फुलला होता. थोडा वेळ त्याला वाटले तीचा हात असाचं कवटाळुन ठेवावा. हि वेळ अशीचं थांबावी. (क्षणअर्धात तीच्या ही मनात हा विचार आला.) पण ती वेळ वाहणा-या पाण्यासारखी न थांबता निघुन जात होती. अंजलीने रस्ता ओलांडला आणि मैत्रिणी सोबत बोलत घरच्या दिशेने चालु लागली. चाळीत प्रवेश करताना अंजलीने मागे वळुन पाहिल. राज तिच्या कडे पाहतच होता. तीने त्याला गोड स्मित करत, पुन्हा हातवर करुन bye! केलं आणि ती घराकडे निघाली. तीच्या गोड हसण्याने राजच्या कोमेजलेला चेहरा फुलुन निघाला. राज तीच्या पाठमो-या आकृती कडे पाहत होता....................(राज घराकडे वळू लागला)

संपुर्ण रस्ता तो त्या हाताचा स्पर्श अनुभवत होता. तो क्षण त्याने मुठीत बंद ठेवला. त्याला अंजलीच्या सहवासात काढलेली प्रत्येक वेळ आठवणीत येऊ लागली. स्व:ताच हसत म्हणाला " ही खरी हद्यस्पर्श मैत्री " जी माझ्या चुका दुर करण्याचा प्रयत्न करते............................(आज तो तिला जीवनाच्या एका वळणावर सोडुन आला होता. त्या हाताच्या मुठीकडे पाहता -पाहता तो कधी घरी पोहचला हेही त्याला कळले नाही. अंजलीच्या ह्द्यातील शांत सागरात वादळे तयार झाली, त्या वादळात राजला आपलस केल. हे राजने आज जाणल...............) आणि आकाश स्व:ताच प्रेम पृथ्वीवर बरसण्यासाठी तयार झालं........................


Rate this content
Log in