हो मी करते वायफट खर्च....
हो मी करते वायफट खर्च....
सायली ही उच्चशिक्षित, सासरी तिला प्रत्येक गोष्टीच स्वातंत्र्य होतं. जॉब तर चांगलाच असल्याने पगार ही चांगला होता. सायलीची एक वाईट सवय म्हणजे दिसेल ते नवीन घेणे. त्यात तर कपड्याचा ढीग असायचा कपाटात. चप्पल, पर्स, मेकअप चे प्रॉडक्ट, ह्याचा नुसता संच होता. कपडे आणले की पुन्हा तो वापरातही नसे. कपाट उघडताच कपडे कोसळायचे इतके ते साठले होतें. सायली जॉब करणारी असल्याने स्वतःचं ते खरं करणारी होती. त्यामुळे तिला समजवण्याचा कोणी प्रयत्न करत नसे. इतके कपडे पाहून नवऱ्याचे तर अक्षरशः डोकं उठायचं. त्यात ते कपडे कसेही ठेवल्याचा गलिच्छपणा पाहून महेशचीं खूप चीड चीड होयची. बायकोचा वारेमाप खर्च पाहूनही त्याला राग येई, पण ऐकेल ती सायली कुठली....?
एक दिवशी सायलीची नणंद निशा घरी आली. चहा नाश्ता झाला, सायली कामावर निघून गेली. घरात टाइमपास करण्यासाठी टीव्ही लावला. पण काही वेळातच बोर झाल्याने बंद केला. निशाला आता दादा, वहिनी येईपर्यंत कसा दिवस काढायचा कळत नव्हतं. तिला बालपणीच्या अल्बमचीं आठवण झाली. ती धावतच कपाटाकडे गेली आणि अल्बम काढण्यासाठी उघडलं. आणि सगळे अस्त्याव्यस्त कपडे क्षणातच खाली कोसळले. वहिणीचं नेटनेटका पाहून निशा गोंधळीच. शेवटी बिचारीने सगळे कपडे घडी घालून ठेवण्यास सुरुवात केली. चार, पाच हजाराशिवाय एक ड्रेस नव्हता. निशालाही अफाट खर्च, ठेवण्याची पद्धत पाहून वाहिनीचा राग आला होता. कपडे नीट ठेवताना जवळ जवळ दिवस कसा गेला, ते निशाच्या लक्षातही आले नाही.
कपडे व्यवस्थित लावून झाले की घडाळ्यात पाहिले तर, सहा वाजत आले होतें. अल्बम ऐवजी तिचा कपडे लावण्यात दिवस गेला होता. तिने स्वतःला चहा ठेवला. गरमागरम चहा घेत गॅलरी मध्ये जाऊन बसली. आई वडिलांची कमतरता तर तिला जाणवत होती. पण माहेरी एक दिवस पाहुणचार करायलाही कोणी नव्हतं. आईवडिलांची आठवणही तिला सतावत होती. विचारांच्या तंद्रीत असताना दरवरची बेल वाजली आणि निशा विचारातून बाहेर आली. दारात पाहिलं तर सायली होती.
निशाने वहिनीला समजवण्याचा प्रयत्न केला...!
"वाहिनी, अग किती कपडे खरेदी केलेस आणि कसे लावलेत तू....? निशाच्या बोलण्याने सायलीला राग आला. मी कमवते म्हणून घेते. मी थोडीच तुमच्या दादाच्या किशातील पैशाने घेते. वाहिनी घेत जा, पण कचऱ्या सारखं नको ठेवत जाऊस. तू घेत असलीस तरी त्या गोष्टीची किंमत ठेव."
"सायलीला निशाच्या बोलण्याचा खूप राग आला. ती फटकन बोलून मोकळी झाली. हा मी कमवते म्हणून तुम्हाला आवडत नाही ना...? तुम्ही तुमच्या नवऱ्यावर अवलंबून असता. निशाला वाहिनीच्या बोलण्याचा खूप राग आला, हो बरोबर आहे तुमचं....पण नवऱ्याने घेतलेल्या वस्तूंची मी किंमत ठेवते. मी घेतली काय.... माझ्या नवऱ्याने वस्तू घेतली काय...? संसार दोघांचा आहे ना...? यात तुझं माझं कोठून आलं...?
चला मी निघते.... करत निशा तिच्या घरी जायला निघाली. सायली काहीच बोलली नाही. पण निशाला गुर्मीत बोलण्याचा तिला बोलण्याचा पच्छाताप होत होता. कपाटाकडे वळाली तर कपाट निशाने बघण्यासारखं ठेवलं होतं. सायलीला तिची तिलाच लाज वाटत होती. तीने सॉरी म्हण्यासाठी निशाला कॉल केला. निशाने कॉल उचलताच... "सायली, सॉरी डिअर मगाशी काही पण बोलून गेले.
निशा मला माहितेय वहिनी नेहमीसारखाच तुझा कॉल येणार....? पण वाहिनी संसारात तुझं माझं करत होतं नाही. आपलं म्हणून होतो. रस्त्यावर येता जाता तुम्ही पाहत असाल तर गरीब लोकांचे कपडे, राहणीमान, त्यापेक्षा देवाने आपल्याला चांगलं आयुष्य दिलंय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची किंमत आपण करायला हवी. देवाचे आभार मानले पाहिजे त्या गरीब लोकांपेक्षा आपल्याला चांगलं आयुष्य दिलं म्हणून. पैसे कमवले तरी खर्च करताना विचार करूनच करायला हवा. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे म्हणतात कोणत्याही परिस्थितीत उतू नये, मातु नये. बाकी तुम्ही शिकलेलच आहात..!
बरोबर आहे ना निशाचे बोलणे...? परिस्थिती नेहमी माणसाला शिकवते. आज ती कशी आहे. पण उद्या कशी असायला हवी ते आपल्याच हाती असते. नेहमी परिस्थितीचीं जाणीव ठेऊन वागले पाहिजे. लेख कसा वाटला नक्की कळवा. कमेंट लाईक, शेयर, फोल्लो करायला विसरू नका.
