STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

हंडा

हंडा

1 min
187

आज अमावस्या. नेहमी प्रमाणे तो मंदिरात नारळ फोडूनच ऑफिसमध्ये गेला. सायंकाळी घरी निघायला मात्र उशीरच झाला. बसने तो कसाबसा फाट्यापर्यंत पोहोचला. पुढे काही फर्लांग पायी चालत जावे लागणार होते. तो भराभरा चालू लागला. एवढ्यात छन् छन् आवाज कानावर पडला. त्याने चालण्याचा वेग वाढवला. तसा आवाजही वाढला.

     हंडा मागे मागे येतो अशा गोष्टी त्याने बऱ्याच ऐकल्या होत्या. तो घाबरतच घरापर्यंत पोहोचला आणि खाटेवर पहूडला. तशी खिशातील चिल्लर छन् छन् आवाज करीत खाली घरंगळली.


Rate this content
Log in