हमारी अधुरी कहानी
हमारी अधुरी कहानी


अनिकेत सकाळी सकाळी खूप खूष होता. आज त्याचा नौकरीचा पहिलाच दिवस होता. मनासारखी नौकरी मिळाली होती.मस्त गाणे गुणगुणत तो तयार होत होता. जणू आज त्याचाच दिवस होता.पहिला दिवस उशीर नको म्हणून कॅब केली आणी वेळेच्या 5 मिनिट आधीच तो ऑफिसला पोहोचला.अवंतिका त्याची सहकारी होती. अगदी टपोऱ्या डोळ्यांची गोल चेहरा लांबसडक केस चेहऱ्यावर येणारी एक बट गोऱ्या वर्णाची पाहताक्षणीच कोणालाही आवडेल अशी. तिला पाहताच अनिकेत मनोमन सुखावला होता. त्याचा नीटनेटके पणा आणी साधेपणा अवंतिकालाही आवडला होता.
रोज ती त्याची ऑफिस ला येण्याची वाट पाहायची. तो आला की नकळत त्याला न्याहारायची. अचानक दोन दिवस झाले तीन दिवस झाले अनिकेत काही ऑफिस ला आलाच नाही. तिला खूप काळजी वाटायला लागली. तिचे कश्यात मन लागत नव्हते. पाच दिवसांनी तो आला. आणी तिचा जीव भांड्यात पडला. तीने त्याला विचारले तेव्हा तीला कळाले की त्याला ऑफिस ट्रैनिंग साठी मुंबई ला पाठवण्यात आले होते. अरेच्या आपण ऑफिस मध्ये चौकशी केली नाही नाहीतर आधीच कळाले असते. ती मनोमन हसली आणी कामाला लागली.
आज संध्याकाळी माझ्यासोबत डिनर ला येशील? अचानक अनिकेत ने अवंतिका ला विचारले. तिने लागलीच होकार दिला. ऑफिस सुटले की दोघेही सोबतच डिनर साठी निघाले. सोबत चालत असताना हलकेच त्याचा हात तिच्या हाताला स्पर्शून जात होता. तिच्या मनात आनंदाची उत्साहाची अशी लहर येत होती. हृदयाची धडधड वाढत होती. तितक्यात अनिकेत ने तिला अगदी फिल्मी style ने प्रपोज केले. गुढग्यावर बसून हातामध्ये अंगठी घेऊन..... माझ्याशी लग्न करशील? ती स्तब्ध झाली
तिला स्वप्न आहे की खरं आहे हेच समजत नव्हते तिने स्वतःला चिमटा घेतला. आणी तिने वेळ न दवडता होकार दिला. दोघांना अगदीच मनाचा जोडीदार भेटला होता. वेगवेगळ्या जातीचे असले तरी दोघेही एकमेकांच्या घरच्यांना ते आवडले होते. जास्त काही उशीर न करता त्यांचे लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडले. विवाह विधी सगळे सोपस्कार अगदी व्यवस्थित पार पडले.हनिमून साठी महाबळेश्वरला गेले. पहिल्या दिवशी प्रवासामुळे दोघेही खूप दमले होते.
आज आराम करू. उद्या फिरायला जाऊ अवंतिकाला जवळ घेत अनिकेत म्हणाला.आणी थकल्याने दोघेही गाढ झोपी गेले. थोड्याच वेळात अनिकेत ला त्याचा कोणीतरी गळा दाबत आहे असा भास झाला. आणी तो जागा झाला. पाहतो तर काय ती अवंतिका होती.वाचवा वाचवा मला हा मारून टाकेल असे म्हणून जोरजोरात ओरडत होती.अनिकेत चे धाबे दणाणले. त्याला काहीच कळत नव्हते.
अवंतिका अशी का वागत आहे त्याला काहीच कळत नव्हतं.अनिकेत ओरडला अवंतिका भानावर ये मी अनिकेत. तुझा अनिकेत, वाईट स्वप्न पाहिलेस का? ती एकदम स्तब्ध झाली. शांत झाली आणी रडायला लागली. अनिकेत ने तिला जवळ घेतले आणी थापटून पुन्हा झोपी घातले. ती झोपी गेली. अनिकेतची मात्र झोपच उडाली होती. सकाळी, सकाळी त्याला झोप लागली.
उठ ना आपल्याला फिरायला जायचे आहे ना अवंतिका अनिकेत ला उठवत होती. त्याच्यासाठी चहा व नाश्ता मागवून घेतला होता. अनिकेत उठला आणी अवंतिकाला न्याहाळू लागला. ती अगदी नॉर्मल वाटत होती.
काल काय झाले होते? अनिकेत ने अवंतिका ला चहा घेत घेत विचारले? ती म्हणाली कुठे काय?? छान झोप लागली.वाईट स्वप्न वगैरे पडले असे वाटून अनिकेत तयार होण्यासाठी उठला.
नंतर दोघेही फिरायला गेले. Viewer's पॉईंट वर गेले. तिथे पुन्हा एकदा अचानक अवंतिका जोर जोराने ओरडत होती. ए त्या मुलीच्या मागे जाऊ नकोस, माझा विश्वासघात केलास तू. मला धोका देतोस. पुन्हा अनिकेत अवाक झाला. हे काय आजूबाजूचे सर्व लोक त्याच्याकडे बघत होते. तो अवंतिका ला सांभाळत होता. आता तो पुरता गोंधळून गेलेला होता. हे काहीतरी विक्षिप्त आहे हे त्याच्या लक्षात आले होते. त्याने psychiatrist कडे जायचे ठरवले. महत्वाचे कारण सांगून तो तिला
अवंतिका ही त्याच psychiatrist रुग्ण होती. डॉक्टर आणी अवंतिका ने लागलीच एकमेकांना ओळखले.तेव्हा अनिकेत ला समजले की तीला स्चीझोफ्रेनिया schizophrenia नावाची बिमारी आहे.आणी खूप पूर्वीपासून तिची ट्रीटमेंट चालू आहे. तीने वा तिच्या घरच्यांनी या बिमारी बद्दल साधा उल्लेख ही केला नव्हता. त्याची फसगत झाली होती.
पण तो तिच्या अतोनात प्रेमात होता. त्याने ठरवले की जे काय आहे त्याचा स्वीकार करायचा आणी तीला बरे करायचे. पण हे ही जास्त काळ टिकणारे नव्हते. तिची बिमारी खूप जास्त होती. सारखे सारखे तीला दर चार दिवसाला झटके येत तेही औषधं घेऊन.बऱ्याचदा तीने आत्महत्या चा प्रयत्न केला होता आणी एका झटक्यात तीने आत्महत्या केली.
आता मात्र सगळेच चित्र पालटले होते.अवंतिकाच्या आईवडीलानी उलट अनिकेत वरच पोलीस केस केली की आमच्या मुलीला ह्यांनीच मारले. त्याला लागलीच पोलीस घेऊन गेली. त्याच्या आईवडीलांचा काहीही संबंध नसताना त्यांना देखील तुरुंगात जावे लागले. तुरुंगात अचानक अनिकेत ला psychiatrist आठवला. मग त्याने वकिलांना बोलावून घेऊन सगळे पुरावे गोळा केले आणी तुरुंगातून तो आणी त्याचे आईवडील सुटले.
"ह्या गोष्टी मध्ये एक गोष्ट स्पष्ट होते आहे की मुलींसाठी खूप कायदे आहेत. पण मुलांसाठी एकही कायदा नाही. "
जश्या पती पीडित स्त्रिया असतात तसेच पत्नी पीडित पुरुष ही असतात हे समजणे गरजेचे.
कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा