Arun Gode

Others

2  

Arun Gode

Others

हिमनदीची यात्रा.

हिमनदीची यात्रा.

3 mins
55


         मला लहानपना पासुनच बर्फ सोबत अनेक प्रकारचे खेळ करण्यात आनंद येत होता. जेव्हा-केव्हा अकाळी पाउस येतांना लहान-मोठ्या गारी पडत होत्या. तेव्हा त्या आम्ही पावसात ओले होवुन जमा करत होतो. कोण सगळ्यात जास्त आणी मोठया गारपिठ्याच्या गारी जमा करतो याची स्पर्धा होत होती. त्या खेळाचे व दिवसाचे वर्णण सारखे कित्येक दिवस आम्ही करत होतो. जसे –जसे आम्ही मित्र मोठे होत गेलो आणी आमच्या ज्ञानात भर पडत गेली होती. तेव्हा आम्हाला वाटायंचे की आम्ही जर हिम प्रदेशात जन्माला आलो असतो तर किती छान झाले असते !. दुरुन डोंगर नेहमी हिरवे दिसते हे जरी कटु सत्य असले तरी हिमप्रदेशाची ओढ कधीच शांत झाली नव्हती. चित्र पटात जेव्हा बरेच छाया चित्र हे हिमाचल व कश्मिरचे दिसत होते. तेव्हा ती चित्र आम्ही सारखे टक लावुन बघत होतो. सर्कत्र पसरलेली बर्फाची चादर, पांढरे शुभ्र, चकाकनारे ते उंच-उंच पर्वत शिखर आणी त्यावर खेळनारे पर्यटक बघुन आम्ही फार रोमांचित होत होते. त्या भागात पाउस पडत नाही. नेहमीच बर्फचा पाऊस पडत असतो. हे ऐकुन विलक्षण आनंद आणी ते बघायला भेटले तर किती मज्जा येईल असे सारखे आमच्या टोळीला वाटत होते !.

       हे सर्व बघण्याची संधी मला मी नौकरी करत असतांना मिळाली होती. सर्वात प्रथम हिमाचल प्रदेशात सिमला येथे मिळाली होती. त्या नंतर मी कश्मिर मधे आपल्या परिवारा सोबत गुलमर्ग, सोनमर्ग आणी पहेल गांवला पण जावुन आलो होतो. पहेलगांवचे आकर्षक दृष्य कित्येक चित्रपटात रेखाटले अर्थात चित्रित करण्यात आले होते. गुलमर्गला गोंडालाचे विशेष आकर्षन व श्रीनगर मधे शिकारा मधे बसुन संपूर्ण डल झिलचे मनमोहक ,मनोहर नैसर्गिक दृष्य बघुब खरच जगात कुठे स्वर्ग असेल, तर तो फक्त आणी फक्त कश्मिर मधेच याची प्रचिति होत होती. डलझिल मधील बोट हाऊसेस मधे राहण्याचा आगळावेगळा आनंद होत होता. बोट हाऊसचा मालक त्याच्या ग्राहकांन साठी भल्या सकाळी गरम पाणी सोडत होता. जेव्हा स्नान करायचे तेव्हा अतिथंडीच्या गारठ्य मुळे अंगावर घेतलेले पाणी लगेच डाट धुक्या मधे रुपांतरीत होत होते. जुनु स्नान घर हे धुकाचे स्नान घर बनत होते. कित्येक पर्यटक ईथे येतात. त्यांना माहित नाही कि मृत्यु नंतरते स्वर्गात जाणार की नाही. पन पृथ्वी वरली स्वर्गा सारखे कशमिर बघुन धन्य नक्कीच होतात. प्रकृतिने मानवच्या मनोरंजना साठी अनेक प्राकृतिक धरोहर त्याला भेट केल्या आहे. श्रमिकांना त्यंना चांगला आकर देवुन अधिक सुंदर व आकर्षक बनवले आहे.पण प्राकृतिक धरोहरांना मानवाचीच द्रिष्ट लागली आहे असे वाटते.

      जलवायु परिवर्तनानामुळे आपाल्या पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत चालले आहे. हा सारखा तापमानाचा वाढता दर हीच मोठी चिंतेची बाब मानवी अस्तीत्वा साठी हाणीकारक ठरनार आहे !. चैन आनी भौतिक सुखासाठी मानव आज अनेक प्राकृतिक संसाधानांचा मोठया प्रमाणार दोहन करित आहे. आनी यातुन निघना-या विषारी वायु-उत्सर्जानामुळे पृथ्वीचे सरासरी तापमानात सारखी वाढ होते आहे. आणी जागो-जागी या जलवायु परिवर्तनाचे गंभिर हाणीकारक परिणाम दिसत आहे. जसे अचानक अतिभारी वृष्टि ज्यामुळे महानगरात मोठे संकट येते.आम्ल वर्षा,जलभराव यामुळे तीथे नुसती अव्यवस्था आणी गोंधळ उडलेला दिसतो. अन्य क्षेत्रात पुर-पाण्याचे थैमान पसरलेली असते. आज मानवी अनावश्क गरजा भागविन्यासाठी जो औद्दोगिकरणाचा सपटा आणी जंगल कटाई यामुळे वातावरनाचे संतुलन सारखे बिघडत चालले आहे. याचा मोठा खामियाना येणा-या पीढीला भोगावा लागणार आहे !. पुढची पीडी आपल्या वाडवडिलांना यासाठी कधीच माफ करणार नाही !.

       हिमक्षेत्र आणी त्यातुन निघणा-या अनेक नद्या, उदारणार्थ, गंगा, यमुना. या नद्या हिंदु संस्कारासाठी व समुचे भारतवासीयां साठी पवित्र मानल्या जातात. या नद्याच्या किना-या वर कित्येक सभ्यता विकसित झाल्या आहे. आज त्या आनी अन्य नद्या कित्येक देशवासीयांनसाठी जीवनधारा बनल्या आहेत. त्या सारख्या प्रदुषित होत आहे. त्यांचे प्रदुशन थांबवण्यासठी होणार उपाय, ईच्छाशकित नसल्यामुळे अल्प पडत आहे. याचे गांभिर्य समजने आवश्यक आहे.

         हिम क्षेत्रात असलेला हिमाचा साठा आणी हिमक्षेत्र दिवसेंदिवस सारखे घटत आहे. त्यातील बर्फाचा साठा सारखा अधीक औसत जागतिक तापमान वाढत असल्यामुळे पाण्यात रुपांतर होत आहे. त्याच मोठा गंभ्रिर परिणाम सागरी जलस्तर वाढण्यात होत आहे. जर चक्र थांबले नाही तर एक दिवस सर्व हिमक्षेत्र वितळुन जातील. तेव्हा सर्वच उपसागर, सागर आणी महासागर आपाली सिमा लांघल्या शिवाय राहणार नाही !. आणी संपूर्ण पृथ्वी जलमग्न होईल यात तीळ भर ही शंका नाही. मग या पृथ्वीवरिल सर्वात बुध्दिमानी मानव जातीची अवस्था तशीच नक्की होणार, जेव्हा केधी आकाशगंगेतील एखादा तारा कृष्ण विवर मधे गेल्यावर लुप्त होतो आणी त्याचे नामोनिषाण पण राहात नाही, मग तसीच मानवी जात अन्य प्राण्या सोबत जलमग्न अर्थात जल-कृष्ण विवर मधे लुप्त झाल्या शिवाय राहणार नाही !.


Rate this content
Log in