शब्दसखी सुनिता

Children Stories Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Children Stories Inspirational Others

ही आमची आई झाली

ही आमची आई झाली

4 mins
204


    प्रिती आणि गणेश दोघेही आपल्या गावापासुन थोड्या अंतरावर जाॅब करायचे. त्यांच्या घराच काम चालु होत. नोकरीमुळे ते दोघे दुर अंतरावर राहायचे. त्यांना दहा वर्षांची मुलगी प्रणीती आणि चार वर्षांचा मुलगा आर्यन होता. दोघेही मुले खुप समजदार होती. आईवडील दुर आहेत तर शाळेसाठी आजीजवळ राहायची. ते त्यांना सोयीस्कर होत. आजीही त्यांना प्रेमाने सांभाळायची. खुप लाड करायची. प्रणीती आणि आर्यन दोघेही बहीणभाऊ शाळेत जायचे. सगळ छान चालल होत. आजीही नातवंडांच प्रेमाने करायची. तिचाही छान दिवस जायचा. प्रिती आणि गणेश रोज आपल्या मुलांना फोन करायचे. आजीजवळ विचारपुस करायचे. आजी म्हणजे प्रितीची आई होती. प्रिती आणि गणेश आठवड्यातुन विकेंडला सुट्टी असली की मुलांना आणि आईला भेटायला गावी जायचे. अस त्यांच चालू होत. नोकरीही करण भाग होत. तिकडेच त्यांच्या घराच काम सूरू होत ते झाल की सगळे तिकडे शिफ्ट होणार होते. पंरतु मध्येच लाॅकडाउन जाहीर झाला. प्रिती आणि गणेशला काय कराव ते कळेना. तसे पैसे वगैरे त्यांनी आईला दिलेले होते. प्रत्येक आठवड्याला मुलांना काय लागत ते न्यायचे. पण आता लाॅकडाऊन झाला. कुणीही ईकडे तिकडे येऊ जाऊ शकत नव्हत. जिल्हाबंदी झाली. हे दोघेही अडकून पडले. एकीकडे आजी आणि ती दोन मुले होती.


प्रितीने आपल्या आईला " सांभाळून राहा, काळजी घे सांगीतल. " मुलांनाही आजीला त्रास देऊ नका, आम्ही लाॅकडाऊन उघडला की येऊ. थोड्या दिवस घरी नाही येऊ शकणार अस त्या प्रणीतीला समजावून सांगीतल. तिला सगळ समजत होत. तेच आर्यनला समजावल. तोही फार शहाण्यासारखाा वागायचा. आईबाबांची आठवण काढत नव्हता. दोन्ही मुले आणि आजी राहत होते. सगळ छान चालल होत. प्रिया आणि गणेश आपल ऑनलाईन काम सांभाळून सकाळ नी संध्याकाळ आपल्या मुलांना काॅल करायचे. त्यांना खुप काळजी वाटायची.      


चार दिवसांनी आजी मुलांच सगळ करीत होती. दोघांना घरातच खेळायला लावायची. तेही आजीच ऐकायचे. तिला थोडीफार मदतही करायचे. त्यांना सुट्ट्या लागल्या होत्या. पण लाॅकडाऊनमुळे मुलांना कुठेही पावर्षी गावी कींवा फिरायला जाता येणार नव्हत म्हणुन आजी त्यांना घरातच छान छान गोष्टी सांगायची. पुस्तक वाचणे, छान आणि मनोरंजनपर गोष्टी वाचुन दाखवायची. मुलेही आजीला जाॅक सांगायची. तिघेही हसायचे. आर्यन तर डान्सही करून दाखवायचा अश्या प्रकारे आजीचा लाॅकडाऊन मध्ये छान वेळ जायचा. कधी आजी सोबत गेम खेळायचे तर कधी मुव्हीज बघायचे. आजीही नातवडांना त्यांच्या आवडतीचे पदार्थ खाऊ घालायची. कारण बाहेरच सगळ बंद झाल होत. त्यामुळे मुलांनाही घरच जेवण आवडू लागल. आजी अंघोळीला गेली नी बाथरूममध्ये घसरून पडली. तिच्या हाताला लागल होत. हाताला लागल होत. तिने डाॅक्टरांना दाखवल. त्यांनी आराम करायला लावला. मेडीसीन दिले. आजी त्या हाताने काही करू शकत नव्हती थोड्या दिवस... हे आजीने मुलीला सांगितल. तेव्हा प्रिती आणि गणेशला खुप काळजी वाटत होती. प्रश्न पडला. अरे देवा ! आता काय कराव ? कुणी कामाला भेटतही नव्हत. कारण तिथे कुणाकडेही कामवाले येत नव्हते. रूग्णख्या वाढ जास्त होती. त्यांची पंचाईत होईल अस प्रितीला वाटायच. हे दोघे काय करायच ते बघत होते, मुलांना सांगितल आजीला त्रास देऊ नका. तिच्या हाताला लागलय. मुलांनाही समजल होत. तेव्हा प्रणतीने आजीला सांगितल की, " आजी तुला हाताला लागलय ना तर तु काही करायच नाही, तु काळजी घ्यायची हाताला जपायच. आराम करायचा. बाकी मी सगळ करेल. तु करू नको पण मला बसुन सांगु शकते ना काय कस करायच " "अरे बाळ माझ तु कशी करणार ग तु खुप लहान आहेस, कधीही तु केल नाही प्रणीती " आजीला तिने सांगितल की मला शिकायच आहे आणि मी करेल. तु आजी आता काही बोलू नको.


हेच तिने आईबाबांना सांगीतल. त्यांना खुप आनंद झाला. दोघांनाही कौतुक वाटल की आपली लेक किति हुशार आणि समजदार आहे याच तिने परिस्थितीला समजुन घेतल. त्यादिवशी पासुन आजी प्रणितीला सांगायची. कुठल काम कस करायच. तर प्रणीतीला बरचस माहीती होत तर ती करायची. आजी तिला किचनमध्ये बसुन अगदी स्वयंपाकाचे धडे द्यायला लागली. प्रणीती सगळ शिकत होती. वरण भात लावायची. पोळ्या ही शिकत होती. आकार थोडा ईकदे तिकडे व्हायचा पण चालून जायच. रोज प्रगती करत होती. स्वयंपाक करायची. आपल्या आजीला व लहान भावाला वाढुन द्यायची. खाऊ घालायची. आजी नातीने केलल जेवण आवडीने आणि दोन घास जास्तच करायची. घरातील झाडलोट, कपडे, भांडे अस सगळच प्रणीतीने केल. आयर्नही आपली ताई आपल्यासाठी एवढ करते बघुन त्रास द्यायचा नाही. कचरा करायचा नाही. घर दोन्ही मुले टापटीप ठेवायची. आजीला त्रास नको म्हणून तिला आराम करू द्यायची. तिला औषध द्यायची. पाणी द्यायची आर्यनही हे करायचा. आजीला त्याचही फार कौतुक वाटायच. हे सगळ रोजच आजी प्रिया आणि गणेशला सांगायची. त्यांनाही आनंद वाटायचा. मुले खुप समजदारीने वागत होती. लाॅकाडाउनमुळे एक नवीन बदल झाला होता.    अस प्रणीतीने लाॅकडाऊन मध्ये आजीचा हात बरा होईपर्यंत सगळ काम केल.


ती रोज नवीन काहीतरी शिकत होती. तिलाही छान वाटायच. थोड्या दिवसांनी प्रिया आणि गणेश घरी परमीशन घेऊन आले. दोन्ही मुले आपल्या आई बाबांना जाऊन  बिलगली. प्रणीतीने आपल्या लाडक्या लेकीने सगळ निभावल आजीचा हात दुखत होता म्हणून समजून घेतल. तिच कौतुक केल. तिला जवळ घेतल. तिलाही आईबाबांना इतक्या दिवसांनंतर भेटुन खुप आनंद झाला. तेव्हा आजी त्यांना सांगते की, " ही आमच्या दोघांची आई झाली होती "  हे ऐकून प्रणीतीला खुप छान वाटत. कोरोना काळात ती पण शिकली होती की आपल्या माणसांची काळजी कशी घ्यावी. पण क्षाज प्रणीती लाॅकडाऊनमध्ये जे शिकली तिला ते आयुष्यभरासाठी उपयोगी पडणार होत.  


Rate this content
Log in