Dr.Smita Datar

Others

3  

Dr.Smita Datar

Others

हेप्पी बर्थडे

हेप्पी बर्थडे

3 mins
15.9K


 वाढदिवस .. आयुष्यातला एक वाढलेला दिवस...इतका महत्वपूर्ण झालाय न हा दिवस. वाढदिवसाने नक्की काय वाढत ? शरीर की मन ? शरीर वाढत म्हणजे जुन होत , थकत. त्याचा इतका आनंद का साजरा करायचा? की आदिकाळापासून माणसाच्या जीवनाची शाश्वती नव्हती, जंगली श्वापद खातील याच भय होत, म्हणून कोणी वाढदिवस साजरे करायचे का ? छे.. पण तसं असेल तर आदिम अवस्थेतला माणूस सण साजरे करत असला पाहिजे , त्याला कालगणनेच ज्ञान असलं पाहिजे, नाही का ? तेव्हा तर माणूस एक जनावर होता.

    चूक. माणूस आजही एक जनावर आहे. माणसाच्या वेशातला पशू आज ही  जिकडे तिकडे हिस्त्र होऊन फिरतोय. माणसाच्या जीवाची शाश्वती तेव्हाही नव्हती आणि आताही नाहीये.म्हणून एक वर्ष आपण जगलो, नुसते जगलो असं नव्हे, तर चांगले जगलो, खाल्ल, प्यालं , ल्याल , कसं बुवा ? त्याचं उतराई होण्यासाठी वाढदिवस साजरा होत असेल.

    वाढदिवसाला ग्लामर दिल, इंग्लिश आणि हिंदी चित्रपटांनी. भला मोठ्ठा केक , त्यावर लावलेल्या मेणबत्त्या, सजवलेलं टेबल, जमलेले लोक, आपल्या वाढदिवसाचा आपल्यापेक्षा त्यांनाच झालेला खोटा खोटा आनंद.त्या आनंदाच्या सर्वत्र लटकनाऱ्या झिरमिळ्या. आणि मग हेपी बर्थडेटू यू चे सूर.आणि मेणबत्त्यांवर मारलेली फुंकर, हे चित्र इतकं ज्याच्या त्याच्या हृदयाशी खोल रुतलं, की प्रत्येक चित्रपटातून ते पार घराघरात पोहोचलं. भरीला भर म्हणून वाढदिवसाच्या दिवशीच नायक, नायिका मीलन, तिने किंवा त्याने नकार किंवा होकार देणे. त्याच दिवशी ही बातमी इतरांना कळणे, अश्या महत्वपूर्ण घटना घडू लागल्या. संदर्भ...संगम ते सैराट.

     हा हेपी बर्थडे नंतर सरळ चाळी चाळीत, झोपड्या झोपड्यात पोहोचला . उच्चभ्रूंचा केक फाईव स्टार हॉटेलच्या बेकरीतला ( बेकरी नाही, कंफेकशानारी ) असेल, तर सामन्यांचा लोकल बेकरीतला, फारफार तर मोन्जीनीज मधला. पण “ हेप्पी बड्डे” दणक्यात साजरा होऊ लागला. आपल्या दर वर्षीच्या जगण्याला काहीतरी कारण मिळालं. आता तर रात्री बारा वाजता वाढदिवस साजरे होऊ लागलेत. अरे, झोपू द्या की राव, कशाला रात्री उठवता बे , सकाळी बोलू ना , वाढदिवस, गिडदिवसाचं...पण नाही. मित्र मंडळींचा जथ्थाच दाखल होणार झोपमोड करायला. आणि दुसर्यांची दखल आपण ही रात्री बारा वाजता घेतली नाही, तर त्यांना वाटणार, आपण best फ्रेंड नाही. या सगळ्या गोंधळात , बिचारी निरांजनाची वात कोपऱ्यातून डोळे लुकलुकत पाहतेय आणि अक्षता , कुंकुमतिलक हिरमुसलेत, हे कोणाच्या गावीही नसत.

      पण या हात पाय पसरलेल्या बड्डे ने केक, फुलं, फुगे, डिश आणि स्नेक्स वाल्यांची चलती झाली.हा एक बिझिनेस नक्की ट्राय करावा नवोदितांनी. म्हणजे बघा, भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज, ३० % जनता शहरात रहाते. आणखी २० % जरी ग्रामीण असली तरी वाढदिवस साजरे करते. असं मानलं तरी ५० कोटी वाढदिवस कुठेच गेले नाहीत ना भाऊ ? चला, हा एक धंदा करून पहायला हरकत नाही.

      तर असा हा हेप्पी बड्डे. फक्त स्वतःचा विचार करण्याच्या संस्कृतीतून जन्माला आलेला. अरे, जिने तुला हा दिवस दाखवला, त्या आईचा सन्मान करा की या दिवशी.

     पण असो, बर्थ डे , बर्थ डे है भैय्या. नाहीतर आपला पण सोलोमन ग्रांडी व्हायचा. सोलोमन ग्रांडी बोर्न ओन मंडे , क्रीश्चंड ओन चूसडे....असं करत सोलोमन ग्रांडी रविवारी बरी होतो. तसं व्हावं असं वाटत नसेल तर वाढदिवसाच्या एनर्जी ला पर्याय नाही.

      मग काय तर आण केक, लावा मेणबत्त्या , फुंका आणि विझवा दिवे, हा...होऊन जाऊ द्यात , “ हेप्पी बर्थ डे टू यू."

                                                                                                 


Rate this content
Log in