" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

हार जीत..

हार जीत..

1 min
181


हार जीत असतेच , विजय सर्वांचाच नसतो.. कोणीतरी जिंकणार कोणी तरी हारणार... पण लक्षात ठेवा लोकांनी तुम्हाला जिंकून दिलंय म्हणजे.. निश्चितच त्यांच्या काही अपेक्षा असतील.. अपेक्षा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही... लोकांना, गावाला वेध लागलेत विकासाचे..गावाची, लोकांची गरज ओळखावी.. विकासासाठी सरकारचा भरमसाठ निधी येतोय. त्याचं प्रामाणिक नियोजन करून.. गावाच्या गरजा पूर्ण केल्या तर खरंच विकास फार दूर नाही... गावाचं निश्चितच नांव होईल.. गावात बंधुभाव, एकात्मता जोपासून ग्रामसभा, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून पारदर्शक कारभार व प्रामाणिक प्रयत्न, नियोजनातून गावाचा खरा विकास येत्या पाच वर्षांत पहायला मिळावा...

लोकांचा निश्चितच भरोसा आहे तुमच्यावर म्हणूनच निवडून दिले आहे तुम्हाला गावच्या विकासासाठी.. दिलेल्या आश्वासनांला, दिलेल्या वचनांला जागा...

गावांसाठी अच्छे दिन, चांगले दिवस यावेत हीच अपेक्षा...


विजयी उमेदवारांना ग्रामविकासासाठी अगावूच्या , अगोदरच शुभेच्छा... पराभूत उमेदवारांना पण सांगू इच्छितो भावांनो गावच्या भल्यासाठी कार्य करण्यासाठी तुम्हाला कधीच कोणी रोखणार नाही.. तुमचं कार्य हीच तुमची ओळख असेल..

गावांसाठी विशेषतः नाल्या रस्ते, पाणी, विज, शिक्षण, आरोग्य, शांतता, सुव्यवस्था या गोष्टी महत्त्वाच्या आहेत..त्याचा भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत पाण्यासाठी जाणारा रस्ता, डांबरी सडक दलित वस्ती सुधार योजना इत्यादी कामे प्राधान्याने होणे आवश्यक आहे.. म्हणून पुनश्च शुभेच्छा..


निवडून दिलंय तुम्हाला

लागा आता कामाला,

जागा दिलेल्या वचनांला

मतदान केलंय तुम्हाला...


विकास व्हावा गावाचा

व्हावे तुमचं नाव,

अभिमान वाटावा सर्वांना

असं असावं हे राजाचं गावं..


Rate this content
Log in