krishnakant khare

Children Stories

2.6  

krishnakant khare

Children Stories

गुरू चे महत्त्व

गुरू चे महत्त्व

5 mins
1.3K


माणूस या जगात येतो. पण जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला गुरू शिवाय पर्यायच नाही. मग तो, आईच्या रूपात असो मग तो वडिलांच्या रूपात असो मग तो भाऊ-बहिणीचा रूपात असो मग तो नातेवाईकांच्या रूपात असो मग तो इतर कोणाचाही रूपात असो गुरु हा गुरुच असतो. ज्या गोष्टी पासून माणसाला काही अर्थबोध होतो. शिकायला मिळतं, सामाजिक प्रबोधन होते. ती गोष्ट छोटी असो की मोठी ती गुरूच्या जागेवर म्हणून त्याचाही आदर असायलाच पाहिजे. जन्माने येणाऱ्या बाळाला या सर्वां कडुन त्याच्या पुढच्या भविष्यात संवर्धनासाठी गुरु प्रमाणे साह्य घ्यावेच लागते. 

गुरु कधीकधी स्वतः गोत्यात येतो. पण शिष्याला अडचणीत आणत नाही. अशाच प्रसंगातली ही एक गोष्ट एकदा होतं काय...... 


कृष्णा आणि शेजारचा दिनेश यादव आणि त्यांचे इतर चारपाच मित्र जंगलात पिकनिक साजरी करायचा बेत करतात.  पिकनिक बऱ्यापैकी पारही पाडतात. पण, दिनेशच्या धांदरटपणामुळे दिनेशला धबधब्याच्या खाली छोटी नदीसदृश्य पात्रात ऊडी मारताना डाव्यापायाला मुका मार लागतो, या आधी कृष्णा त्याला समजावत होता "देखना दिनेश,

इस नदी में लंबी छलांग कुदी मत मारना, और इससे तुझें समझ में नही आता तो वन विभाग का जो प्रोव्हिबिटेड बोर्ड लगाया है। उसे अच्छे से पढ लेना" और लंबी डोव्हिंग मत मारना। पण या वेळी दिनेश कृष्णाच्या या गोष्टी ऐकाच्या मनस्थितीत नव्हता. या आधी दिनेश कृष्णाला मोठ्या भावाप्रमाणे मानत होता. कृष्णा पण आपला छोट्या भावाप्रमाणे दिनेशला मानत होता. दिनेश एक मोठ्या भावाचा आदर म्हणून कृष्णाला नावाने हाक न मारता मोठा भाऊ अर्थात "अप्पा" असं हाक मारायचा. म्हणून कृष्णा सुद्धा त्याला मायेने त्याची काळजी घ्यायचा. त्याला कुठे कधी अडीअडचणी येऊ नये म्हणून गुरू प्रमाणे मार्गदर्शन करायचा.


दिनेश सुद्धा शिष्याप्रमाणे आदराने त्याच्या गोष्टी ऐकायचा. पण आज दिनेशला जंगल्यातल्या या नैसर्गिक धबधब्याचे,नदीचे आकर्षण फार वाटले. धबधब्याच्या पाण्यात व छोट्या नदीत खेळेन या आशेने दिनेशला फार आनंद झाल्याने कृष्णाचे इंस्ट्रक्शन्स ऐकायला दिनेशचे मन थाऱ्यावर नव्हते. आज दिनेश कसला कोणाचा ऐकायला, आणि ह्या पाण्यात जोशात किती वेळ तरी मित्रांबरोबर पाण्यात खेळत राहिला. शेवटी जे व्हायचे नव्हते तेच झाले.


एकदा दिनेशने खेळायच्या जोशात उंच उडी पाण्यात मारल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दिनेशच्या डाव्या पायाला जबर मुका मार लागला. त्याच्या असहनीय  वेदना वाढल्या.

 या जंगलापासून ते गावापर्यंत जायाला अर्धा-पाऊण तासाचा रस्ता, मग कृष्णा भडकतो आणि म्हणतो "मी ऊगाच नही बोललो, खरं तेच बोलेलो. दिनेश तुझे इसलिये पहले से यही समझा रहा था। आज तक किसी ने पंगा लिया है, आग से, पानी से,लाईट के बिजली से खेलने का? वही जल के राख हुवा है, मतलब कोई मौत से गया या कोई अपाहिज हुवा" लेकीन उसमें से हमीद ने कहा "वो तो ठिक है लेकीन अब दिनेश को घर कैसे लेके जाये?" तितक्यात जोन गोन्सालवीस बोलला इतना टेन्शन क्यों लेता यार कृष्णा संभाल लेगा.


कृष्णाचा राग काही थंड झाला नव्हता. तो म्हणाला "अब भुगते वो अपना करम का फल, मैं कब से जी तोडकर कह रहा था. अरे, ये पानी है यहा संभालके खेलों लेकीन नही. मेरे बात का कोई ध्यान दे तब ना"

पण एवढ्या वेळात कृष्णाचे बोलणे सगळ्यांना पटले होते. दिनेश मध्येच बोलला "सॉरी अप्पा गलती हुवी अब ऐसी गलती नही होगी " अशा दिनेशच्या चुक कबूल वृत्तीने क्षमा मागीतल्याने सातव्या अस्मानात चढलेला कृष्णाचा राग त्वरीत थंड झाला.


(बघितलं खरंच आपल्याकडुन चुक झाली असेल तर लगेच कबुल करुन त्याबद्दल क्षमा मागण्याची वृत्ती ठेवली तर ना सगळ्या गोष्टी कशा सोप्या व पूर्ण टेंशन दुर गेल्यासारखं होतं. दिनेशला कृष्णा मोठा भाऊ म्हणून हवा होता. त्याला अशा छोट्यामोट्या चुका करुन नातं तोडायचं नव्हतं. म्हणून क्षमा मागून दिनेशने कृष्णाचे मन जिंकले होते. कृष्णाचा राग थंड झाला होता. दिनेशला पण पटले होते,मोठा भाऊ सारखा राहून कृष्णा गुरूच्या सारखाआपल्याला मार्गदर्शन करतो त्यात माझं भलं आहे. मी जर ऐकले असते अप्पाचे,तर हे संकट माझ्यावर आले नसते. )


कृष्णाने आपल्या बॅगेतला फर्स्ट एडचा बॉक्स काढला. कृष्णाला माहित होते, पिकनिक असो किंवा कुठलाही प्रवास असो बॅगेत फर्स्ट एडचा बॉक्स जवळ असलेला बरा. कृष्णाने फर्स्ट एड बॉक्स मधून वेदना कमी व्हायच्या गोळ्या दिल्या. आयोडेक्स मलम हळूवार लावलं. कारण मुका मार लागल्यावर मार लागलेल्या भागाला रगडून मसाज करायचं नसतं नाहीतर मुका मार बसलेल्या भागातल्या रक्तवाहिन्यांना, मुका मार बसलेल्या भागाला अजून इजा होऊ शकते. हे कृष्णाला पण माहित होते. दिनेशने गोळी घेतल्याने व मलम लावल्याने थोडं बरं वाटत होतं. आता सगळ्यांनी आपलीआवराआवर केली व आपल्या घरी जायला निघाले पण दिनेशला चालताना पाय दुखायचा ,तो पूर्णत:लंगडत चालत होता. आता बाकीचे त्याच्याच वयाचे चौदा पंधरा वर्षाचे त्यांना कुणाला दिनेशला उचलून घरी नेता आलं असतं, कृष्णाने हे पाहिले आपण यांच्याहुन आठनऊ वर्षाने मोठे आहोत आपण दिनेशला घरी उचलून घेऊन नेले पाहिजे.


कृष्णाला दिनेशची दया आली. आपण मोठाभाऊ आहोत हे समजून कृष्णाने दिनेशला खांद्या-कंबरेवर घेऊन घराच्या दिशेने निघाला. बाकीच्यांनी टाळ्या वाजून "गुरू अप्पा गुरू की जय हो! "असे बोलत घरच्या दिशेने रवाना झाले. पण वाटेत गावातला डॉक्टर त्यांना भेटला. दिनेशला खांद्यावर घेतलेला कृष्णाला बघितल्यावर डॉक्टर बोलले "ये क्या घोडागाडी जैसा लेके जा रहा है," हे ऐकल्या बरोबर कृष्णाला वाटलं काय हे मी दिनेशला उचलून घरी घेऊन चाललोय आणि हे काय मला डॉक्टर घोडागाडी बोलताय.


दिनेशला इथेच खाली ठेवू का असं झालं होतं. पण कृष्णा पटकन बोलला "डॉक्टर ,दिनेश के पैरों को मुकामार लगा है,उसे चलने को तकलीफ हो रही हैं इसलिए मैं उसे उठा के ले जा रहा हुं"लगेच डॉक्टर बोलले " शाबाश,अच्छा काम कर रहे हो,तुम्हारा छोटा भाई लगता है. शाम को क्लिनिक में ले आना. हे ऐकून कृष्णाला असं झालं की मी डॉक्टरांना कसं सांगू की दिनेश शेजारी जरी असला तरी तो छोट्या भावासारखाच चांगला आहे म्हणून. कारण दिनेश कधी पण माझ्या मदतीला येत असतो.


डॉक्टर आपल्या जॉगिंगसाठी पुढे निघुन गेले. कृष्णा,दिनेश मंडळी आपल्या घरी. म्हणून गुूरू आपल्या शिष्याला सावरण्याचा प्रयत्न करतो. पण जरी स्वतः बिकट परिस्थितीत असला तरी पण शिष्याला सांभाळून घेतो. मग ते नाते मोठा भाऊ व छोटा भाऊचे असू द्या. मग ते शेजारी शेजारी असू द्या. गुरूच्या महत्त्वाला एक वेगळाच दर्जा असतो. गुरूला मनाने पण मोठे व्हावे लागते वेळप्रसंग बाका आल्यावर, म्हणून तर गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.


Rate this content
Log in