Author Sangieta Devkar

Children Stories

3.5  

Author Sangieta Devkar

Children Stories

गोष्टी आजी च्या

गोष्टी आजी च्या

2 mins
159


पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. घरात काका,आत्या,आजी आजोबा असायचे. लहान मूल ही एकत्र न भांडता राहत असत. शाळा ,अभ्यास आणि मग रात्री आजी किंवा आजोबांनी सांगितलेली गोष्ट ऐकून मुल झोपी जायची. दिवाळीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत हमखास मुल आपल्या आजोळी येत असायची. पूर्वी आजच्या सारखे मोबाईल गेम्स,किंवा टीव्ही ही नवहता. लहान मुलांना मैदानावर किंवा घरातच खेळत असायची. आजी आजोबा हे मुलांना अतिशय प्रिय असायचे कारण ते मुलांना छान छान गोष्टी सांगत असत. राजा राणी,जादुच्या गोष्टी,परीच्या गोष्टी, ऐकनात मुलांना आनंद वाटायचा. रामायण,महाभारत यातील गोष्टी आजी मुलांना सांगत असे त्यामुळे नकळतपणे एक प्रकारे मुलांवर संस्कार केले जात होते. चांगल्या गोष्टी आपोआप मुलांना त्या आजी च्या गोष्टी मधून शिकवल्या जात होत्या.

रात्री सगळ्याचे जेवण उरकल्यावर मुले आजी ची वाट बघत असायची. अंगणात चांदण्याच्या प्रकाशात बसून आजी च्या गोष्टी ऐकण्यात एक मस्त अस थ्रिल असायचे. कधी कधी भुताच्या गोष्टी ही आजी सांगत असे तेव्हा रात्री झोपेत सुद्धा तेच स्वप्न पडत असायचे. घाबरून मग आजी ला घट्ट पकडून झोपून जायचे. उन्हाळ्यात तर गच्चीवर चांदण्यात पडून गोष्टी ऐकण्या सारखे सुख दुसरे कोणतेच नाही. आजीच्या गोष्टीतील जादूगार,परी तिची जादू हळूहळू आपल्या मनावर पकड घेत असायची मग त्यातच कधीतरी झोप लागून जायची. आजी च्या गोष्टी ऐकून चांगले काय ? वाईट काय? हे ही समजत असे. लहान असल्या मुळे गोष्टीतील सगळं काही खर आहे असेच वाटत राहायचे. आपण ही मग तसच वागले पाहिजे ही शिकवण नकळत मनात रुजली जात होती. दिवसभर दंगा मस्ती करून रात्री गोष्ट ऐकण्याची ओढ काही औरच असायची. लहान मुलांना तर आजी गोष्टीतला राक्षस येईल बघ जर आई चे नाही ऐकले तर अशी भीती ही घालायची.


खूप सुंदर असे ते दिवस होते आणि आजी ची गोष्ट ही सुंदर असायची. हल्ली विभक्त कुटुंब पद्धती सगळीकडे आहे त्यामुळे आजी आजोबा अभावानेच पाहायला मिळतात. खर तर मुलांना आजी आजोबा हवेत

 गोष्टी सांगायला ,गोष्टीतुन संस्कार करायला. आजी चे गाव ही हवे सुट्टीत जायला. आजी च्या गोष्टी या नुसत्या गोष्टी नसून ती मुलांच्या जडणघडणाची एक पद्धत होती. मुलांना वळण लावण्यासाठी,चांगल्या गोष्टी


 रुजवण्यासाठी आजी आणि तिच्या गोष्टी हव्यातच !


समाप्त


Rate this content
Log in