arun gode

Others

3  

arun gode

Others

गोंडोला प्रवास

गोंडोला प्रवास

5 mins
181


      बहुतांश जम्यु-कशमिरला जाणारे पर्यटक हे श्रीनगर, गुलमर्ग व पहेलगाम व परितीच्या वेळेस वैष्णो देवीचे दर्शन घेवुन वापस येतात. हे जम्यु-कशमिर मधील अनेक प्रख्यात प्रेक्षणीय स्थळ आहेत.तसे पाहिले तर कशमिरला अनेक असे नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळ आहेत. ज्यांचा अजुन राज्य सरकारने त्यांचा पर्यटक स्थळ म्हणुन विकास केला नाही.हे आम्हला सोनमर्गच्या प्रवासात आढळले. बहुतेक प्रर्यटक सोनमर्गला जातच नाही. पण आम्हाला या वेळेस चांगला गाईड करणारा ड्राईवर मिळाला होता. त्याने बरेच माहिती या राज्या विषयी सांगितली होती. सोनमर्ग हे स्थान भारत पाक सिमेवर आहे. हा भूभाग अक्षरशाहा बर्फाच्या चादरेने ओढला गेला आहे. जिकडे पाहाल तिकडे सर्वत्र बर्फच –बर्फ दिसते. जुनु असे वाटते कि एक मोठा समुद्र येथे बर्फात बदलला आहे . जिकडे पाहाल तिकडे- बर्फच दिसतो. जुनु निसर्गाने सोनमर्गच्या जमिनीवर बर्फाची कारपेट प्रवासांच्या स्वागता साठी अंथरली आहे. जगातल्या सर्वच मानवाचे भेदभाव न करता ही कारपेट त्याचे स्वागत करत असते. जवळ-पास असेच मनोहर दृष्य बर्फने बहरलेला गुलमर्ग ला पण आहे. दुस-या टप्यात आम्ही गुलमर्गला पोहचलो. तीथे पण खुप थंडावा होता. सर्वजन बर्फाच्या गारठ्यामुळे अक्षरशाह गारठले होते.तीथे पोहचल्या वर गारठ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी व गुलमर्गचा नैसर्गिक आनंद घेण्यासाठी सर्वांनी प्रथम कशमिररी पेय म्हणजे कहवाचाय घेतला. कहवाचाह घेतल्या वर लगेच सर्वांन मध्ये स्पुर्तिचा संचार झाला होता. इथेले मुख्य आकर्षण म्हणजे गोंडोला ने प्रवास करायचा असतो. जवळ-पास दहा-बारा किलोमीटरचा प्रवास एका स्थानावर दुस-या स्थानावर बर्फिली जमिनीच्या वर एका लांब दौराच्या साह्याने गोंडला जात असतो.तो जात असतांना फार हर्ष होतो.

     गोंडोलाने प्रवास करण्यासाठी आम्ही नियत जागी गेलो. टिकेट्स विकत घेतल्या वर आमच्या नंबरची अधीर होवुन वाट पाहत होतो. केव्हा एक्दाचे त्या गोंडाल्यात शिरते असे होवुन गेले होते. पी हळद ,अन हो गोरी. हळू-हळू त्या दिशेने आमची वाटचाल सुरु होती. आणी ती घटका आली, आमचा गोंडोला ने प्रवास सुरु झाला. या गोंडोला ने प्रवास करण्याची सर्वांची पहिलीच वेळ होती. प्रवास करण्याची जसी हाउस होती तसीच थोडि फार मनात भीति पण होती. गोंडोला मधुन प्रवास करतांना रमनिय प्राकृतिक दृष्याचे देखावे दिसावे म्हणुन याला संपुर्ण काच लागले होते. त्यातुन सगळे दृष्य एका-मागे-एक दिसत होते. त्या भागात काही सैनिक, कर्मचारी व काही स्थानीय लोकांचे विखरलीले अशंता बर्फाने ढकलेले घर दिसत होते. हे सर्व माणसे अशा कठीन परिस्थितीत कशे राहात असेल याच विचाराने शरिरा वर रोमटे उभे राहत होते. शेवटी आम्ही त्या दर्शनिय स्थाना वर पोहचलो. जीथे अनेक पर्यटक प्राकृतिक सौंदर्याचा आनंद घेत होते. त्या स्थाना पासुन अवघ्या आठ किलोमीटर वर पाकिस्थानची सिमा लागत होती. काही पर्यटक गोंडोला ने त्या सिमे पर्यंत जावुन येत असे. विशेष प्रकारचे बुट घालुन आम्ही इकडे- तिकडे फिरत होतो. दुपारचे सुर्यकिरणे तेथील पसरलेल्या बर्फाच्या चादरी वर पडत होते. कुठे खुप घन दाट बर्फ तर कुठे थोडा हलका बर्फ पडलेला होता. प्रकाशाच्या गुनधर्माप्रमाणे त्याचे प्रतिबिंब दिसत होते. जसा –जसा सुर्य वर जात असे .त्यामुळे सुर्य प्रकाश किरणांचे कोन बदलत होते.व तसे तसे निरनिराळे प्रतिबिंब प्रवासांना पहायाला मिळत होते.ते पाहुन पर्यटकाच्या मनात निश्चितच कुतुहल निर्माण होत असे. व त्याला त्याचा आनंद मिळत होता.फिरतांना आम्हाला काही ठिकानी गरम पाण्याचे स्त्रोत पण आढळले होते. याच्या मागे पण वैज्ञानिक कारन नक्कीच आहे.साधारन पर्यटकांना ही अचंबित करणारी गोष्ट आहे.

      सर्वत्र फेर-फटका मारल्या नंतर आम्ही पुन्हा त्याच जागेवर आलो होतो. तीथे काही खाण्या-पिण्याची व्यवस्था होती. एका कशमिरी हॉटेल मध्ये जावुन प्रथम कहवा चाहची आर्डर दिली. कहवाचाह पिता- पिता आता काय घ्यायचे या वर मंथन सुरु होते. मग मि म्हटले कि कशमिर में आकर गुलमर्ग जैसे उचांई वाले स्थान पर ,कशमिरी हॉटेल में कशमिरी पुलावा ना खाये,तो यह बहुत नाइंसाफी होगी सांभा. असा डायलॉग मारल्यावर सर्वांनी एकमताने कशमिरी पुलावा जरुर खायेंगे असी आकाश गर्जना केली. ही गर्जना ऐकुन हॉटेलचा वाढ्प्या आमच्या जवळ आला. त्याला आम्ही चार प्लेट कशमिरी पुलावा आन्यासाठी सांगितले होते.तो म्हणाला आप तो छः है. और आप चार प्लेट कशमिरी पुलावा की मांग कर रहे. ये तो कशमिरी पुलावा के साथ बहुत नाइंसाफी होगी सांभा. आम्ही सर्वजन हासत- हासत म्हणालो. अरे भाई कशमिरी पुलावा के साथ नाइंसाफी मत होने दो. नंतर तो सहा प्लेट कशमिरी पुलावा घेवुन आला. म्हणाला आप इसे जरुर पसंद करेंगे. ये गब्बरसिंग का आप लोगो से वादा है. क्योंकि कशमिरी पुलावा यह गब्बरसिंग की पहिली पसंद है.

     पुलावाचा आनंद घेतल्या नंतर आता आपण परत निघालो पाहिजे.नियमा प्रमाने आता आपल्याला फार काळ ईथे थांबता येणार नाही. बाजारत तुरी, अन भट भटनीला मारी.माझी पत्नी म्हणाली समजा आपण गोंडोला प्रवास सुरु केला. मध्यंतरी गोंडोला बिघडला.मग कशे आपण वेळेत पोहचणार?. खरं पाहता,तीच्या जे म्हनात घर करुण बसलेली शंका ती बोलुन दाखवत होती. अरे असे काही घडत नसते. तीचे धाडस बांधत मी म्हणालो. ती फार भित्री आहे हे मला माहित आहे. ती मोठी हिम्मत करुन असा प्रसंग पार पाडत असते. ती आपल्या तगंड्या तोडुन सिढीने वर- खाली येत जात असते.ती कधीही लिफ्टचा या एस्केलेटर चा उपयोग करत नाही.

     आमचा वापसीचा गोंडोला ने प्रवास सुरु झाला होता. या वेळेस आमच्या सोबत माझ्या सहर्मिची मुलगी होती. गोंडोला वेगाने अंतर कापत होता. थोड्या वेळ्याने त्याची गती मंदावली होती. व तो एका ठिकाणी येवुन थांबला होता.जे म्हणात पेरले होते,तेच उगवले.मी म्हटले आपन फार लवकर आलो. लगेच माझी पत्नी आणी मुलीने म्हटले ,अजुन स्टेशन येण्यासाठी वेळ आहे.माझी पत्नी व ती मुलगी फार घाबरली होती.आता काय करायचे. बहुतेक गोंडोला मध्ये बिघाड आला असवा.आम्ही फार उंचावर होतो.जिकडे-तिकडे बर्फच-बर्फ दिसत होता. परंतु दुस-या रोप वरिल गोंडोला जात होते. ते आम्हला पाहुन हसत होते. माझी पत्नी घामाने ओलीचिंब झाली होती.पहिलेच तीच्या मनात भीती घर करुन बसली होती. मग असला प्रसंग आला. तीच्याकडे पाहुन मी विचार केली.अरे हीच ती बाई जी मला भर थंडीच्या दिवसात आपल्या संतापाने जेव्हा तीच्या मना सारखे घडले नाही की, तेव्हा मला कारण नसतांना घाम आनते. आता गोंडोला मध्येच थांबल्या मुळे घामने हीने आंघोळ केली. तीची अवस्था बघुन तीला धीर देत म्हणालो अग,काही होत नाही. कदाचित एका बाजुचा पॉवर खंडित झाला असवा. जनरेटर सुरु व्हायला वेळ लागतो. लगेच गोंडोला सुरु होईल चिंता करु नको.मैं हुना ना. शारुखखानच्या स्टाईल मध्ये मी म्हटले. तेव्हा तीला आणी मुलीला हसु आले होते.व त्यांची किंचित भीती कमी झाली होती. मग लगेच गोंडोला सुरु झाला. तीने लंबा श्र्वास घेत स्मित हास्य केले होते. मुलीचे आई-वडिल पहिलेच पोहचले होते. दुरुन आम्हाला बघुन ते पन खुश झाले होते. त्यांना पन काय झाले होते, कां उशीर झाला हे समजले नव्हते.उतरल्या वर आमच्या वर घटलेल्या प्रसंगा विषयी मुलीने त्यांना सविस्तर सांगितले, असा हा आमचा न विसणारा गोंडोलाच्या प्रवासाचा अंत झाला होता. म्हातारी गेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. जेव्हा-केव्हा हा प्रसंग आठवतो किंवा असे दृष्य समोर येते.आताही तीला घाम सुटतो.


Rate this content
Log in