Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Shubhankar Malekar

Children Stories Fantasy


4.9  

Shubhankar Malekar

Children Stories Fantasy


गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

3 mins 296 3 mins 296

   दरवर्षी माघ महिन्याच्या चतुर्थीला आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होते.गणपती बाप्पा घरी येताच घरात प्रसन्न वातावरण तयार होते.आईच्या हातचे स्वादिष्ट उकडीचे मोदक खायला मिळतात.संपुर्ण परिवार एकत्र येउन बाप्पाची पुजा करतात.लहान मुलांचे आणि बाप्पाचे नाते एका मित्रा प्रमाणे असते.माघ चतुर्थीच्या आधल्या दिवशी मी आणि माझ्या बाबांनी मिळुन बाप्पाला बसण्यासाठी छान अशी सजावट केलेली.बाप्पा उद्या आपल्या घरी येणार ह्याचा मला खुप आनंद होता.बाप्पा आपल्या घरी येणार ह्या खुशीत मला रात्री झोपच लागत नव्हती.


           सकाळी उठुन आम्ही छान अशे कपडे घालुन बाप्पाला आणण्यासाठी गेलो.ह्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे गणपती बाप्पाचे आगमन साध्या पध्दतीने झाले मात्र सगळ्यांच्या मनात तोच जोश आणि उत्साह होता.गणपती बाप्पा मोरया..... मंगल मूर्ती मोरया..... च्या गजरात बाप्पाचे आमच्या घरी आगमन झाले.बाप्पाला आम्ही सजवलेल्या आसनावर बसवले.बाप्पाचे ते सुंदर रुप पाहुन मन अगदी प्रसन्न झाले.बाप्पा उंदीर मामावर बसला होता,बाप्पाच्या एका हातात मोदक होते,एका हाताने बाप्पा आपल्या भक्तांना आशिर्वाद देत होता,दोन हाता मध्ये शस्त्र होती,बाप्पाने रत्नजडीत मुकुट घातले होते आणि पितांबर घातले होते.गळ्यात दागिने घातले होते.बाप्पाचे ते सुंदर रुप बघतच रहावे असे वाटत होते.

 

            पहिल्यांदा आई बाबांनी बाप्पाची पुजा केली.त्या नंतर आम्ही सगळ्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले.आत्या आणि काकी स्वयंपाक घरात जेवण करत होते.बाप्पाची पुजा झाल्यावर बाप्पाची आरती करण्यात आली.आरती झाल्यावर बाप्पाला 21 मोदाकांचा नैवेद्य दाखवण्यात आला.बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत.नंतर पाच केळीच्या पानावर जेवण वाढुन बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात आले.जेवनात पाच प्रकारच्या भाज्या,वरण,भात,जलेबी,मोदक,पापड,लोणचं होते.जेवण अत्यंत स्वादिष्ट होते.जेवण झाल्यानंतर आम्ही अंताक्षरी खेळायला बसलो.आई आणि बाबा एका टीम मध्ये,आत्या आणि काका एका टीम मध्ये,काका आणि काकी एका टीम मध्ये आणि आम्ही सगळे भावंड एका टीम मध्ये होतो.आम्हाला अंताक्षरी खेळायला खुप मज्जा आली.ह्या मध्ये आम्ही सगळे भावंड जिंकलो.


               काही वेळानी बाप्पाची पुन्हा आरती करण्यात आली.बाप्पाची आरती करुन मन प्रसन्न होते.आरती झाल्यावर लहान मुले प्रसाद वाटण्यासाठी तयारच असतात. माझ्या बाबांनी सगळ्यांना गणपती बाप्पाची कथा सांगितली.त्या नंतर आम्ही सगळे एकसाथ जेवायला बसलो.रात्री आम्ही खुप सारे खेळ खेळलो, नाचलो, गायलो. आम्ही खूप मज्जा केली.पुढच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन होणार होते.बाप्पा आपल्याला सोडून जाणार ह्याचे दु:ख आम्हा सर्वांनाच होते. सकाळी उठुन मी बाप्पाची पुजा केली.बाप्पा आपल्या सोबत असला की आपण सगळया संकटावर मात करु शकतो,म्हणुन मला असे वाटयचे की बाप्पाचे कधीही विसर्जन नाही झाले पाहिजे.काही वेळानी बाप्पाची आरती करण्यात आली.               

      बाप्पा आपल्याला सोडून जाणार म्हणुन लहान मुले रडु लागली.आम्हाला ही रडावेसे वाटत होते मात्र आम्ही व्यक्त नाही केले.मग बाबांनी आम्हाला समजावले की,"जर बाप्पा आज त्यांच्या घरी गेले तरच आपण त्यांना पुढच्या वर्षी आपल्या घरी आणु शकतो."त्या नंतर बाबांनी गणपती बाप्पाला गार्‍हाणं घातले की,"देशावर वर जे संकट आले आहे ते तुझ्या पाया खाली घे आणि सर्वांना सुखात ठेव."त्या नंतर गणपती बाप्पाची मूर्ती हलवण्यात आली.त्या नंतर बाप्पाला काकांनी डोक्यावर उचलून घेतले आणि आम्ही बाप्पाला तलावा जवळ घेऊन गेले.असे म्हणतात की, "बाप्पाच्या कानात आपण आपली इच्छा सांगतो ती बाप्पा पुर्ण करतो."मग आम्ही सगळ्यांनी बाप्पाच्या कानात आमच्या इच्छा सांगितल्या.सगळ्यांचे डोळयात अश्रु होते.गणपती बाप्पा मोरया........ पुढच्या वर्षी लवकर या...... या गजरात बाप्पाचे विसर्जन झाले.घरी आल्या वर घर खाली खाली वाटु लागले.पण मनात एक खात्री होती पुढच्या वर्षी जेव्हा बाप्पा येइल तेव्हा देशावरचे संकट टळलेले असेल आणि ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन होईल.


Rate this content
Log in