Yogita Takatrao

Others

2  

Yogita Takatrao

Others

गंमत

गंमत

2 mins
1.7K


प्रसाद: ए ऐक ना ," काय आहे गं" ? आजपण दिसली मला ती, काय गाडी चालवते यार.........आणि ड्रेसिंग स्टाइल तर विचारूस नको, "माशाअल्लाह"

नेहा : काय रे वेडया, काय एवढं कौतुक करतोस तिचं, कोण, कुठली, ओळखत पण नाहीस तिला, ते तर मरु दे, ती कुठे ओळखते तुला? तुझं माकडा सारखं तोंड बघणार पण नाही. प्रसाद: हो का महणुनच एका माकडीनीने लग्न केलं माझ्या बरोबर दहा वर्षांपूर्वी, तेव्हा फिदा होतीस हया माकडावर, " नेहा:तेव्हा गाॅगल लावून फिरायचे ना मी, मग माकडपण हिरो वाटायला लागलेला आणि आंधळया प्रेमाने फसवल रे माझ्या, आता काय आलिया भोगासी, असावे सादर............

प्रसाद:हो का?

नेहा:हो ना!

प्रसाद:अगं काही नाही गं, डोळे कसे हिरवे हिरवे गार होतात तिला बघून, जणु दुष्काळग्रस्त भागात खुप वर्षांनी पाऊस पडला आणि मी त्या पावसात आतुर चातका प्रमाणे चिंब भिजलोय....अहाहा काय मस्त नजरा दिसतोय डोळ्यांपुढे.

नेहा: अहो आतुर चातक, खूप मोठा आ वासला आहे, माशी जाईल ना तोंडात, आणि आज घरीच आहेस तर जरा सईला स्कूल बस मधुन पिक कर, इथे मी मरमर करते(दोन फटके प्रसादला लगावत) दिवस भर त्याच तर कोणाला काहीच नाही वर आतुर चातक म्हणे

प्रसाद (ओरडून): आ...आ......मारतेस काय, असं अमानुषपणे मारत का कोणी? पति परमेश्वराला?

नेहा: ऐ ड्रामेबाज, दोन चापटयाच दिल्यात,नौटंकी कुठला!

प्रसाद: सांगु का सासुला तुझ्या?(फोन हातात घेऊन नाटक करत) लावू फोन लावू? सांगु का ?

नेहा: ए गप्प बस रे तु जरा, (तोंड वाकडं करून)म्हणे फोन लावू का सासु ला?

कामं नाहीत का तुला? जा जरा लेकीची बस येईल! डोळे कसे हिरवे हिरवे गार होतात म्हणे तिला बघून!

प्रसाद: काहीतरी वास येतोय जळकट, जळु नकोस हो एवढी तिच्यावर!

नेहा:तु मार खातोस आता माझ्या हातंचा!

प्रसाद:ते काय जेवण आहे का खायला?

नेहा:(रागाने प्रसाद कडे कटाक्ष टाकत)प्रसाद ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!

प्रसाद:काय दुर्गा माते ? भसम् हो रहा हुं मै ,माते बक्ष दो मातें,बक्ष दो.

नेहा:तु निट बोलणार आहेस का,प्रसाद ? आणि प्रत्येक वेळी विनोद काय सुचतात रे तुला? कधितरी!..........कधितरी गांभीर्याने वाग रे!

प्रसाद: का, कोणी आजारी पडलाय का?

नेहा:तुझ्याशी बोलणं म्हणजे चित भी तेरी, पट भी तेरी! बर ऐक तु आज घरी आहेसच तर, मी जरा माझे डोळे हिरवे गार होतात का बघुन येते!

प्रसाद:काय??????????

नेहा: अरे जिमला जाऊन येते रे, बरेच दिवस जिमला जायला वेळंच नाही मिळाला, आणि घरी बसून माझे डोळे लाल लाल झाले आहेत ,ज्वाला निघत आहेत डोळ्यांमधुन, त्यांना थोडा थंडावा देऊन येते, आणि काय आहे ना, काय माहित मला बघून कोणाचे डोळे हिरवे हिरवे गार होतिल, किंवा माझे कोणाला तरी पाहून, बाय,हिरव्या डोळा आय मीन प्रसाद!

प्रसाद:(हे ऐकून, प्रसाद च्या डोळ्यांनी सगळेच रंग दाखवत, लाल रंगावर थांबायचा निर्णय घेतला) आआआआआआआ?

नेहा:तेवढं सईला आठवणीने दुध दे, ओटयावर हिरव्या हिरव्या मग मध्ये ओतून ठेवलं आहे. बाय डार्लिंग!

प्रसाद:करशील अजून गंमत करशील, गाढवा प्रसादा, मस्करी आली की नाही अंगाशी!

नेहा:(जाता, जाता) ऐकलं मी ऐकलं सगळंच!!!!

प्रसाद:(कपाळावर हात मारून)करशील हिरवे हिरवेगार डोळे करशील??


Rate this content
Log in