Aruna Garje

Others

5  

Aruna Garje

Others

गजरा...

गजरा...

1 min
613


ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे ती बसस्टॉपवर येऊन थांबली. एवढ्यात एक छोटी मुलगी तिला म्हणाली - 

"ताई, फुलांचा गजरा घ्या ना. तुमच्या काळ्याभोर लांबसडक केसांत खूप शोभून दिसेल. "


लग्नानंतर तो देखील अगदी असेच म्हणायचा. पण ते आता कसे शक्य आहे? 


"बरं दे एक छानसा गजरा. वाहीन देवीच्या चरणाशी ." 


Rate this content
Log in