SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

गावातील सुट्टी

गावातील सुट्टी

2 mins
572


अनु ही मुंबईतील मुलगी.. गाव तिने कधी पहिलेच नाही.. सर्व नातलग ही मुंबईतच.. म्हणून तिच्या बाबांनी एकदा ठरविले की त्यांचा एक मावस भाऊ आहे जो गावात राहतो.. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनुला सात दिवस गावी घेऊन जाऊ.. अनु आईबाबा सोबत गावी जाते तेव्हा तिथली जमिनीवर बांधलेली घर, प्रत्येक घरासमोर सुंदर स्वच्छ अंगण, अंगणात सुंदर झाडें, गुलाब, पारिजात, मोगरा, शेवंती, शेवगा हे सर्व बघून खुश होते. तसेच प्रत्येकाच्या अंगणात रांगोळ्या आणि रोड वर काही वर्दळ नाही, लोक काही शेतात जाण्या साठी निघालेत ,काही लोक गाड्या घेऊन नोकरीं निम्मित बाहेर जाण्याची लगबग दिसली, काही लोक झाडांखाली गप्पा मारत निवांत बसलेली दिसली..सकाळी स्त्रिया घरकामात दंग दिसल्या, सर्वांच्या घराजवळ सुंदर, स्वच्छ गाई चा गोठा होता.. 


हे सर्व अनु कुतूहल तेने बघत होती.. जसे सर्व तिच्या मावस काकांकडे गेले तिथून सुंदर अगरबत्ती चा सुगंध येत होता.. आरतीचा आवाज आला.. मावस काका ला जवळ पास तिच्याच वयाची मुले होती.. तेही अनुला आश्चर्य ने बघू लागले.. अनुने गेल्यावर लगेच त्यांना हॅलो केले.. त्यांनी ही लाजत हॅलो म्हटले... काकूंनी त्यांना फ्रेश व्हायला सांगितले आणि लगेच मोठ्यांना चहा व अनुला दूध दिले, ब्रेक फास्ट ला पोहे दिले.. आणि सर्व वातावरण एकदम तिला उत्साहाने भरलेले वाटले, सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. ती लगेच त्या छोट्या मुलांसोबत बाहेर खेळायला गेली.. तिथे बिनधास्त बाहेर खेळू लागली. तिथे कुठलाच गाड्यांचा धूर नव्हता की वर्दळ नव्हती.. गाई, म्हशी निवांत रवंथ  करत होत्या.बैल, ट्रॅक्टर घेऊन लोक शेतात जात होते, नंतर खेळून दमल्या वर छान काकूंनी बनविले ले स्वादिष्ट जेवण करून सर्व तृप्त झाले. काकूने खाली जमिनीवर बसायला व थाळी ठेवायला पात दिला.. अश्या प्रकारे अनु पहिल्यांदा जेवत होती, रात्री सर्व जण उन्हाळा असल्यामुळे गच्ची वर झोपण्या साठी गेले.. तिथे खुप खेळले आणि चांदण्यात गप्पा मारत झोपले,. दुसऱ्या दिवशी काकांनी डब्बे घेऊन शेतात नेले... तिथे शेतात मोठी मोठी सावली देणारी कडू लिंबाचा झाडें, आंब्यांचे झाडें होते, सर्वानी छान कैऱ्या तोडल्या, मनसोक्त खाल्ल्या .. बाजूलाच सिंचन साठी विहीर होती... आणि झाडाखाली जेवले... सगळीकडे शांतता, पक्षांचे आवाज हे ऐकून मन अगदी प्रसन्न झाले.. काकांनी अनुला गावाची सम्पूर्ण माहिती दिली.. गावातील गोबर गॅस, सोलर प्रोजेक्ट दाखविले.. अनुला गावातील सर्वात जास्त आवडले ते सर्व लोक एकजुटीने राहतात, दिवस भर त्यांची दार उघडी असतात, कुणीही वाटेल तेव्हा कुणाच्याही घरी बिनधास्त जात , आणि भाजी, पदार्थ ह्यांची देवाण घेवाण करतात . 


हे सर्व अनुभवता जाण्याचा दिवस कधी जवळ आला हे तिला कळले च नाही.. जातांना तिच्या आई बाबांनी काका काकूला पुढच्या सुट्टीत येण्याचे निमंत्रण दिले.. 

अश्या प्रकारे अनुने पहिल्यांदा गाव बघितले.. 


आणि मुंबईला सर्व मैत्रिणीला आपल्या गावच्या ट्रिप बद्दल सांगू लागली.. Rate this content
Log in