STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

गानसम्राज्ञी

गानसम्राज्ञी

1 min
101

  एक प्रसिद्ध गानसम्राज्ञी....

  लता मंगेशकर अवघ्या पाच वर्षांच्या असल्यापासून गाणे म्हणायला लागल्या.दीनानाथ मंगेशकर यांची ही कन्या. घरातच गायक असल्याने फार लहानपणापासून त्यांनी तंबोरा हाती घेतला. बाबांच्या सानिध्यात गायनाचा रियाज चालू केेला.

    त्या लहान असतानाच दीनानाथांना देवाज्ञा झाली.त्या घरातील मोठ्या म्हणून घराची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली.  " प्रभात" फिल्म इन्सिट्यूट मधे कामाला लागल्या.हळूहळू त्या मोठ्या गायक बनल्या.त्यांच्या मागे तीन भगिनी व एक भाऊ ,आई यांची जबाबदारी होती.वडिलांमागे त्यांनी घर छान सांभाळले.

     जवळ जवळ चारशे चित्रपटात त्यांच्या आवाजातील गाणी आहेत. त्यांच्या आवाज अति सुंदर ,त्या मुळे त्यांना "गान कोकिळा' हा पुरस्कार दिला .आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' या सन्मानाने त्यांचा गौरव केला. याची 'गिनीज वर्ल्ड बूक' मधे द झाली आहे.

   आज लता मंगेशकर वयस्कर झालेल्या आहेत जवळ जवळ नव्वदीच्या घरात त्या आहेत.त्या मुळे त्या सहसा घराबाहैर पडत नाहीत. गाणे गात नाहीत. यांना सर्वजण 'लतादीदी' या नावाने संबोधतात. या गानसम्राज्ञीला माझा शतशः प्रणाम


Rate this content
Log in