शब्दसखी सुनिता

Children Stories Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Children Stories Inspirational Others

एक सरप्राइज असेही

एक सरप्राइज असेही

4 mins
185


     अयांश या वर्षी आठ वर्षांचा होणार म्हणून त्याचा वाढदिवस मोठा साजरा करायच अस अथर्व आणि स्वरालीने ठरवल होत. अथर्व आणि स्वराली यांना एकच मुलगा अयांश खुप लाडाचा होता. आजी आजोबांचही प्रेम त्याला मिळत होत. तो स्कुलमध्ये जात होता. त्याला छोटेसे त्याच्या वयाचे खुप फ्रेंन्ड्स मिळाले होते. रोजच त्याचा स्कूलमध्ये छान दिवस जायचा. यंदा त्यांचा वाढदिवस जवळ आल्यावर त्याने सर्वांना आधीच सांगून ठेवल होत. माझ्या बर्थ डे ला तुम्ही सर्वांनी माझ्या घरी यायच हं, आपण सगळे खूप एन्जाॅय करू " मित्रांनीही त्याला येण्याच कबुल केल. मग अयांशने आई बाबालाही आधीच सांगुन ठेवलेल. एकुलता एक मुलगा म्हटल्यावर त्याचा वाढदिवस जवळ आला होता. तेव्हा अथर्व आणि स्वराली अयांशची आई त्याच्या वाढदिवसाची तयारी करत होती. आजी बाबाही खुप खुश होते. त्यांनी नातेवाईकांनाही आधीच सांगुन ठेवलेल. वाढदिवसाची छान पार्टी करायची. त्यानिमित्ताने वर्षांतुन एकदा सगळे रिलेटीव्ह भेटत होते. छान प्लॅनिंग केल होत. सर्वांना वाढदिवसाच सांगीतल होत. तयारीही जवळजवळ पूर्ण झालीच होती.


आपले आई बाबा आपल्यासाठी इतक करतात हे पाहून अयांश खुप आनंदात होता. त्याने वाढदिवसाच स्वप्न खुप दिवसांपासून पाहील होत. नेमका कोरोना नावाचा विषाणू त्याच वेळेस आला होता. त्यामुळे रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्याच्यावर योग्य ती लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे लोकांमध्ये भितीच वातावरण होत. लोक विनाकारण बाहेर जाण टाळू लागले. सरकारने सुचना केल्या होत्या. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडत जा. तसच चालू होत. अचानक राज्यामध्ये खुप कोरोना रूग्णसंख्या वाढली. अयांशच्या जिल्ह्यात तर कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट पाहायला मिळाला. कहर पाहायला मिळाला. हाताबाहेर परीस्थिती जाऊ लागली. लोक काही केल्या नियम पाळत नव्हते. अजूनही गांभीर्याने बघत नव्हते. मग शेवटी व्हायचे तेच झाले. सर्वत्र जिल्हाबंदी झाली आणि संपूर्ण देशात लाॅकडाउन जाहीर झाला. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडता येत होत. लहान मुलांना तर खुप जपाव लागत होत. त्यात त्यांना समजावण अजुनच कठीण होत कारण कितीही केल तरी ते लहान आहेत. अयांश चा दोन दिवसांनी वाढदिवस होता. तो या सगळ्या परिस्थितीमुळे आपले फ्रेन्ड्स घरी बर्थ डे सेलीब्रेशन साठी येऊ शकत नाही मग काय फायदा ? म्हणून अयांश नाराज झाला.     


स्वराली आणि अथर्वलाही खुप वाईट वाटल की एवढी सगळी तयारी केली नि हे अस लाॅकडाउन झाल सगळ पण त्यांना ही परिस्थिती समजत होती. तेव्हा त्यांनी अयांशला समजुन सांगितल. कोरोनामुळे काय होऊ शकत. परमीशन नाही आहे अस सगळच सोप्या शब्दांत स्वरालीने त्याला समजुन सांगितल पण त्याने तोंड खुप बारीक केल. त्याला छान नाही वाटल. आजी आजोबा त्याला समजवतात, " कोरोनामुळे तुझे फ्रेन्ड्स जर आपल्या घरी आले तर ते आजारी पडतील आणि त्यांना त्रास होईल. तुला अस झालेल चालेल का ? " अयांश नाही म्हटला. मग आजीने त्याला जवळ घेतल . तिच्या हाताने खाऊ पिऊ घातल त्या दिवशी अयांश आईजवळ झोपायला गेलाच नाही. तो आजीजवळच झोपी गेला. यामुळे स्वरालीला आपण अयांशसाठी काहीतरी सरप्राईज देऊ दोघेही ठरवतात. त्या रात्री ते दोघे ऊद्या त्याला वढदिवसाला कस सरप्राईज द्यायच, हसवायच आणि त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद परत कसा आणायचा ते बघतात. दुसर्‍या दिवशी सकाळी अयांश उठतो. आजी त्याची तयारी करते. देवाला नमस्कार करायला लावते. त्याची आई त्याच्यासाठी घरीच त्याच्या आवडतीचा केक बनवते. तिला केक बनवता येत होता. तसेच आजी आणि आईने मिळून दुपारी साठी सगळ त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले.


बाबांनी त्यांची एक खोली खूप छान मेहनत घेऊन सजवली होती. अयांशला हे सगळ काय चाललय माहीती नव्हत. दुपारी सगळ त्याच्या आवडतीच जेवण बनवलेल पाहून तो खुप खुश झाला. मग सर्वांनी त्याला एक घास त्यांच्या हातांनी भरवल. सकाळी त्याला बर्थ डे विश करू करून त्याला त्याच्या आवडतीच कॅडबरी दिली. आयांश खूप खुश झाला. मुलाचा मुड थोडासा ठीक झालेल बघुन स्वरालीला छान वाटल. सर्व त्याच्या मित्र - मैत्रिणींनी त्याला फोन करून, व्हीडीओ काॅल करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याला मनाला बर वाटल. खुप आनंदून गेला. त्यांच्या परिसर सोडला थोडस रस्त्याला लागल की डोंगराच्या तिकडे एक मंदीर होत. तिकडे नेहमी भक्त यायचे दर्शनाला, तिथे जवळपास खुप माकडे होती. झाडेही खुप होती. तर रोज त्यांना तेव्हा काही ना काही खायला मिळायच. पण लाॅकडाऊन कुणीही तिकडे जित नसल्याच अथर्वच्या लक्ष्यात येताच त्याने तिथल्या पोलीस अधिकार्‍याला

सांगितलं असता त्यांची रोजची खाण्याची सोय करण्यात आली. पण काही मिळत नसल्यामुळे माकडे सैरभैर झाली होती. जवळपासच्या झाडांची फळेही त्यांनी फस्त करून टाकली होती.जाऊन त्या माकडांसाठी फुटाणे व केळी असा खुप मोठा खाऊ घेतला व तेथील माकडांना तो देण्यात आला. स्वराली आणि अथर्वने तिकडे आपल्या अयांशसोबत अनोख्या पध्दतीने प्राण्यांना फळे खाऊ घालून अनोख्या पध्दतीने वाढदीवस असा साजरा केला. त्यांनी या बाबत एक मेसेजही दिला.


वन्यप्राण्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या माकडांची सोयही झाली. अयांशही खुप खुश झाला. ते घरी आल्यावर तो त्याच्या मित्राला हे सांगत बसला. तेवढाच वेळ त्याच्या आईबाबाने संध्याकाळी वाढदिवसाची तयारी केली. बाबांनी त्याच्यासाठी खुप मस्त आणि छान वाढदिवसाकरता रूममध्ये पूर्ण डेकोरेशन केलेल होत. आईने घरी बवनलेला केक... आजी - आजोबांनी सरप्राईज म्हणत अयांशला त्या रूममध्ये आणल... तिथे music सुरू होत... हॅपी बर्थ डे च... आणि इतक छान डेकोरेशन, लाईट्स बघुन त्याला खुप आनंद झाला. मग त्याचे आईबाबांनी ऑनलाईन सगळ ॲरेन्ज करतात. त्याला सरप्राईज देतात. त्याचे सगळे मित्र - मैत्रिण zoom वरून त्याचा वाढदिवस साजरा करतात. त्याला खुप आनंद होतो... तेव्हा आईबाबा त्याला विचारतात, " काय आयांश कस वाटल हे सरप्राइज.... ? " तो म्हणतो खुपच छान... मला खुप आवडल... सगळे माझ्यासोबत बर्थ डे सेलिब्रेट करत होते. तो आपल्या आईबाबांना थँक यु म्हणत त्यांना दोघांना मिठी मारतो. तेव्हा त्या तिघांचा आजोबा फोटो घेतात. सगळ छान पार पाडल्यावर त्याला सरप्राईज खुप आवडत. आयांशमुळे सगळे आनंदीत होतात. आयांश त्याच्या मित्राला सांगत होता. " हा माझा आजचा वाढदिवस खुप स्पेशल होता... आणि माझ्या नेहमी लक्ष्यात राहील. " " दरवर्षी आईबाबा छान छान गिफ्ट्स देऊन सरप्राइज देतात, मात्र यावर्षी माझा वाढदिवस त्यांनी गिफ्ट म्हणून मला असा वाढदिवस सरप्राइज दिला. मी विचारही करू शकलो नाही की असेही सरप्राइज असु शकते.  


Rate this content
Log in