DrSujata Kute

Others

3  

DrSujata Kute

Others

एक मैत्री अशी ही

एक मैत्री अशी ही

7 mins
646


अपर्णा आज खूप रागात होती.तिला आज आपल्या नवऱ्याला (महेशला )पार्कमध्ये भेटणाऱ्या स्त्री विषयी विचारायचं होतं.ती तो ऑफिस वरून घरी येण्याची वाट बघत होती.तिचं मन मात्र महेश दोषी नसल्याचं कौल देत होतं.पण ती तरी काय करणार शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये तिने महेश आणि नलीनीच्या पार्क मध्ये भेटण्या विषयीची कुजबुज ऐकली होती. त्यामुळे महेशची वाट पहात ती दर सेकंदाला घड्याळीकडे पाहत होती. 


महेश घरी आला,नेहमीप्रमाणेच आल्या आल्या फ्रेश होऊन हॉल मधील सोफ्यावर चहाचा कप हातात येण्याची वाट बघत बसला.चहा काही आला नाही म्हणून महेशने अपर्णाला आवाज दिला.... उत्तर मिळाले नाही.... आता महेशला काहीतरी बिनसलंय हे लक्षात आले.तो अपर्णाला स्वयंपाक घरात शोधायला गेला. तिथे ती दिसली नाही म्हणून तो बेडरूम कडे वळाला तर अपर्णा बेडरूम मध्ये झोपलेली दिसली.... असं ती तेव्हाच करायची जेव्हा ती महेशवर चिडलेली असायची. .... 

महेशला आता लक्षात आले की अपर्णाला आपला कसलातरी राग आला आहे.... 


महेश :अपर्णा काही चुकलं आहे का माझं? तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार मला?

हे प्रश्न ऐकून अपर्णा ताडकन उठून बसली....आणि म्हणाली वा रे वा चोराच्या उलट्या बोंबा..... म्हणे माझे काही चुकले का? 


महेश :अगं काय झालं? इतकं तर सांगशील? 


अपर्णा :खरंच तुम्हाला माहिती नाही? 


महेश :हे बघ प्लीज असं कोड्यात नको बोलूस... 

अपर्णा :तूम्ही पार्क मध्ये कूणाला भेटलात? कोण आहे ती सटवी? 


महेश :सटवी? ओह असं आहे तर, अगं ती नलिनी आमच्या ऑफिस जवळ तिचे घर आहे.... आणि तिचं इतकं चांगलं नाव असताना तू सटवी का म्हणतेस? 


अपर्णा :सगळीकडे चर्चा झाली की तूम्ही दोघे चोरून भेटता म्हणून.. 


महेश :लोकं तर बोलतात त्यांची नजर तशी.... पण तू मला चांगली ओळखतेस ना.... मग तू असं कसं विचार करू शकतेस.तसं तर मी तूला... चांगला आठवडा होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.... तूच मला वेळ देत नाही आहेस.... 😡 महेश पण थोडा रागात आला. 


अपर्णा :अरे हो..... सॉरी रे..... मला काय माहिती तूला असे काहीतरी सांगायचे आहे. 


महेश :असे काहीतरी म्हणजे?? असे तसे काही नाही मी तूला अगदीच पहिल्यापासून सांगतो...... मला आता माझ्या या ऑफिसला जॉईन झाल्यापासून तीन वर्ष झाली आहेत.... माझ्या ऑफिस च्या पहिल्याच दिवशी मी ऑफिस सुटल्यावर घराकडे येत होतो.... 


महेश :ऑफिसच्या कोपऱ्यावर एक घर येते.मी त्या घराजवळ आलो की मला एक पुरुष एका स्त्रीला मारहाण करण्याचा आवाज येत असे आणि तो तिला काही बाही बोलत असे.त्यांच्या आवाजावरूनच ते दोघेही नवरा बायको आहेत हा अंदाज बांधता येत होता. सुरुवातीला मी या गोष्टीकडे काना डोळा केला.वाटलं एखादा दिवस होत असेल असे भांडण नवराबायकोचे. पण अगदी रोजच तिला मारहाण होत असे आणि तिचा ओरडण्याचा आवाज येत असे.... खरंच तिथून जाताना रानटी भागातून जात आहोत असा भास होत असे. कधी कधी तर लहान मुलाचाही आवाज येत असे..... बाबा मारू नका ना आईला..... मग त्या मुलावरही शिव्यांचा वर्षाव होत असे. 


महेश :अपर्णा तूला माझ्या मोठया बहिणी विषयी माहिती आहे ना...... तिला असाच अत्याचार सहन करावा लागला. पण तिने आम्हाला काहीच कळू दिले नाही.... आणि आत्महत्या करून हे जग सोडून गेली..... नंतर तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले तिच्या होणाऱ्या छळाबद्दल........ खूप वाटायचं तिने वेळेवर सांगितले असते तर? तिला आत्महत्या करू दिली नसती..... हेच आता जेव्हा जेव्हा मी मारहाण ऐकायचो तेव्हा वाटायचे ताईवर असे अत्याचार झाले असतील खूप राग यायचा लालबुंद व्हायचो 😡पण मी फक्त ऐकून खरा अंदाज कसा बांधणार?


 अपर्णा :मग पुढे काय झाले?? 


 महेश :एक दिवस हिम्मत करून मी त्यांच्या घराची बेल वाजवली....... उगाचच कुणाचा पत्ता विचारायला म्हणून..... तेव्हा योगा योगाने फक्त ती स्त्री आणि तिचा छोटा 4 वर्षांचा मुलगा दिसत होते......ती स्त्री दिसायला खरंच खूप सुंदर होती... लागलीच चिडू नकोस.....पण जे खरं आहे ते तूला सांगतो आहे.... आणि तिचा मुलगा पण अगदीच तिचं प्रतिबिंब होता...... तिने आम्हाला माहिती नाही..... असं उत्तर देत घाई घाईने दरवाजा बंद केला.... 


अपर्णा :मग ही ती नलिनी का? पुढे काय झाले आणि तुम्ही असं कसं कुणाच्याही घरात डोकावू शकता..... माझा विचार आला नाही का मनात?


महेश :अगं अपर्णा त्या वेळी मला ताईचा विचार मनात आला.... जर तिला कूणी थोडी तरी मदत केली असती तर आज ती या जगात असती.... म्हणून वाटलं थोडया मदतीने तिचा जीव वाचला तर काय वाईट..... नाहीतर अश्या घरगुती हिंसाचाराचा अजून एक बळी.... आणि हो हिच ती नलिनी.....तीन ते चार महिन्यापूर्वी मी इकडे यायला बस स्टॉप वर उभा होतो तर ती एका बस मधून भाजीची पिशवी घेऊन उतरली.... बरोबर विरुद्ध दिशेने तिचा नवरा आला आणि त्याने तिला वेळूने मारत मारत घरी नेले. ती नुसती मार खात होती..... तोंडातून आवाज ही काढत नव्हती जणू काही तिला अश्या रानटीपणाची सवयच झाली होती ..... 


म्हणून मी ठरवलं आता तिला यातून बाहेर काढायचे.....तरच माझ्या ताईच्या आत्म्याला शांती मिळेल..... पण हे तूझ्या सोबती शिवाय शक्य नाहीये..... तू साथ देशील ना अपर्णा?


अपर्णा :अहो तुमचं सगळं खरं आहे.... पण आपण कश्याला कुणाच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायचा.... करायला जाऊ एक आणि होईल एक.... 


महेश :अगं तेच ना दुर्लक्ष करत करत तीन वर्ष झालेच ना.....पण काय झाले माहिती का?? अंदाजे महिना झाला असेल मी ऑफिस च्या site वर गेलो होतो..... ती site म्हणजे एकदम डोंगराळ भागात होती.आणि त्या डोंगरावर मला एकदम खाली उडी मारण्याच्या (आत्महत्याच्या) तयारीत असलेली स्त्री आणि तिचा मुलगा दिसले..... मी पळत जाऊन त्यांना आडवलं आणि पाहिलं तर तीच नलिनी आणि तिचा मुलगा दोघेही होते. मग नलिनी बोलायला लागली 


नलिनी :कोण तूम्ही?? कश्याला अडवता आम्हाला?? आम्ही आमचं काहीही करू. 


महेश :मॅम.. आत्महत्या काही उपाय नाही.... आणि काय अधिकार आहे? तुम्हाला तुमच्या मुलालाही सोबत नेण्याचा.... 


नलिनी :मग काय त्या राक्षसजवळ ठेवणार?? इथे तरी एकदा मरण.... त्याला जिवंत ठेवलं तर रोज मरण.. 


महेश ने स्वतः जवळ असलेल्या पाण्याची बॉटल नलिनीला दिली आणि म्हणाला मॅम पाणी घ्या.... असं म्हणत मी तिला आत्महत्या करण्यापासून त्या दिवशी परावृत्त केले.... तिला थोडा वेळ तिथेच बसवले, ताईची गोष्ट सांगितली आणि म्हणालो ताई असंच लपवत होती तिला वाटायचं की उगाचच माहेरच्या लोकांना त्रास..... खरं सांगायचं तर इथेच चुकतो आपण.... मला नेहमी वाटायचं की एकदा तरी ताईने तिला होणारा सासुरवास सांगितला असता तर ती आज जिवंत असती...... पण मॅम तूम्ही ती चूक करू नका.... वाटल्यास मी तुम्हाला मदत करेन. 


त्यावेळेस माझे नाव नलिनी असे तिने सांगितले. 

मी नलिनीला विचारले आता तू काय करणार?? ती म्हणाली आज आधी माहेरी जाईन आणि सगळं सांगेन बघूयात काय फरक पडतो ते? 


तिच्यात एकदम झालेल्या सकारात्मक विचाराचं मलाच आश्चर्य वाटलं..... आणि ठरवलं नलिनीला या संकटातून बाहेर काढायचं..... पण तुझ्या परवानगीने..... कारण कितीही केलं तर ती कोणी माझी नातेवाईक नाही आणि जूनी मैत्रीण पण नाही. 

त्या घटनेनंतर नलिनी माहेरी गेली.... माहेरी सगळ्यांना विश्वास बसत नव्हता..... इतकी जादू केली होती त्याने सासरच्या लोकांवर...... पण तिच्या मुलाने सांगितल्यावर आणि नलीनीच्या अंगावर असलेल्या माराच्या खुणा पाहून तिच्या माहेरच्यांना विश्वास ठेवावा लागला.आता तिला तिच्या माहेरच्यांनी धीर दिला होता.... भाऊ तर म्हणाला तू आता सासरी जाऊच नकोस..... 


पण नलिनी खूप स्वाभिमानी होती आणि तिला माहिती होते की माहेरी राहून हे सगळं बदलणार नाही.... ती म्हणाली ही माझी लढाई आहे.... मला तिथे राहूनच लढावं लागेल..... हा तिचा दुसरा सकारात्मक विचार..... 


आणि काल जे आम्ही पार्क मध्ये भेटलो तो निव्वळ योगायोग होता.... ती त्याच्या मुलाला खेळवायला आली होती.... बाहेर रोड साईडला त्याला ती पाणीपुरी खाऊ घालण्यासाठी उभी असताना मला दिसली...... मी तिला ख्याली खुशाली 


विचारल्यावर ती मला सर्व सांगायला लागली..... साहजिकच आम्ही बराच वेळ पार्क मध्ये बसलो होतो आणि तेच या सज्जन लोकांना दिसले..... 


नलिनी सांगत होती की..... तिचा जो नवरा आहे तो लग्नासाठी आधी खूप मागे लागला होता.... कारण ती दिसायला खूप सुंदर होती.... त्यामुळे हुंड्याविना त्याने लग्न केले.... काही दिवस खूप प्रेमाने वागवले..... आणि नंतर त्याचे खरे रूप कळायला लागले.... तो नौकरीही व्यवस्थित करत नव्हता.... जुगाराचे व्यसन होते, अधून मधून खूप दारू🥃 प्यायचा आणि एक एक वस्तू साठी तगादा लावत होता..... सुरुवातीला काही पैसे 💴💵 आणि वस्तू मी माहेरून आणल्या पण त्याची मागणी वाढत चालली होती.... खूप संशयी पण होता.... माझे सासू सासरे जिवंत नव्हते पण हा एकटा नवराच मला खूप सासुरवास करत होता...... माझ्यापर्यंत ठीक होतं पण या वेळी माझ्या मुलालाही त्याने खूप मारहाण केली होती.... त्यामुळे मी आत्महत्या करायला निघाले होते..... पण तूम्ही वाचवलंत आणि मला समजावलं.... तेव्हा मला तुमच्यामध्ये एक खरा मित्र दिसला.....


मी ज्या सकारात्मक विचाराने घरी गेले पहिल्यांदा मी त्याच्या माराला प्रतिकार केला.... आणि त्याला ठणकावून सांगितले पुन्हा मारलस तर याद रख..... तू ही मार खाशील.... माझा हा अचानक अवतार बघून तो ही नरमला..... आणि त्या दिवशीचा मार वाचला..... आज ही कडक बोलून घराबाहेर पडली आहे.... 


महेश :मी तिला घरी बोलावले पण आधीच खूप उशीर झाला आहे असं म्हणत ती घरी निघून गेली..... 


अपर्णा :इतकंच ना सरळ सरळ पोलिसात द्यायचं की त्याला... थर्ड डिग्री पडला की आपोआप जागेवर येईल... 

महेश :अगं अपर्णा ते इतकं सोपं नाहीये..... नलिनी ठरली परावलंबी.... तिच्या एकटीचं तिने कसही भागवलं असतं. पण तिचा मुलगा पण आहे ना...... आपल्याला असं काही करावं लागेल की तो ताळ्यावर येईल पुन्हा तिला त्रास देणार नाही त्यांच्याशी नीट वागेल..... 


अपर्णा म्हणाली मी यात काय मदत करू शकते?? 


महेश :तू फक्त तिच्या घरी जाऊन तिच्यावर होणाऱ्या घरगुती हिंसेचा video तिला बनवायला सांग.... तेवढेच खूप होईल. 

अपर्णाने घरी जाऊन नलिनीला महेश चा हा निरोप दिला.... पण नलीनीकडे साधा फोन ही नव्हता.... मग अपर्णा ने तिच्याकडे असलेला जुना video काढता येईल असा फोन तिच्याजवळ दिला. 

 

जेव्हा केव्हा नलिनीचा नवरा मारहाण करायला लागला तेव्हाचा video मुलाने त्याच्या नकळत बनवला...... नंतर तो व्हिडिओ अपर्णा आणि नलिनीने मिळून महिला आयोगाला दाखवला.....महिला आयोगाने मोर्चा काढून नलीनीच्या नवऱ्याला धमकावले..... पुन्हा जर मारहाण करशील तर गळ्यात चप्पलांचा हार घालून गाढवावर धिंड काढू..... 


आता मात्र नलिनीचा नवरा खूप घाबरला होता त्याला कळत नव्हते की नलिनीमध्ये इतका बदल कसा झाला...... नलिनी आणि तिचा मुलगा आता मोकळेपणाने वावरत होती...... आता तिचा नवरा चांगलाच वरमला होता...... शांत रहात होता..... नलीनीने शिकवणी घ्यायला सुरु केली..... त्या मुळे स्वावलंबी झाली...... चांगले आयुष्य जगायला लागली. 


नलिनी, महेश आणि अपर्णा यांची अजून घट्ट मैत्री जमली.... म्हणतात ना कोण?? कुठे?? कसं?? आणि कधी भेटेल?? आयुष्यात हे सांगता येत नाही..... 


कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा 


Rate this content
Log in