दसरा...
दसरा...
सरले दिवस नवरात्रीचे,
सोन्याच्या पावलांनी...
आला आला सण दसऱ्याचा
आपट्याच्या पानांनी,
सजल्या बाजारपेठा
झेंडूची फुलं, आंब्याची पाने
सजले दारावर तोरण
रांगोळी सजली दारात
घराघरात दरवळला,
पुरणपोळीचा घमघमाट
सरस्वती मातेच्या दर्शनाने,
झाली दिवसाची सुरुवात...!
हा आहे विजयाचा दिवस,
क्रोध, अहंकारावर, मत्सर
या वाईट विकृतीवर करू या मात,
देवाकडे घालते साकडे,
मिळू दे सर्वाना या वर्षी ,
आनंद, सुख- समृद्धी, घवघवीत यश.
विजयादशमीच्या सणाचा आनंद लुटू या
आपल्या प्रियजनात....!
