दोघांच्या भांडणात ३चा फायदा!
दोघांच्या भांडणात ३चा फायदा!


एकदा सिंह आणि अस्वलाने मिळून एका हरणाची शिकार केली. आता शिकारीच्या भागाबद्दल दोघांमध्ये वाद झाला. वादाने भांडणाचं स्वरूप घेतलं आणि अखेर ते दोघे मारामारीवर उतरले. दोघांमध्ये युद्ध बराच वेळ चाललं, परिणामी ते दोघे दमले. आता त्यांच्यात उभं राहण्याचीही शक्ति नव्हती. हा गोंधळ चालतच होता तेव्हा एक कोल्हा तिथे आला.
समोर हरणाची शिकार पडलेली पाहून त्याच्या तोंडात पाणी आले परंतु, शिकारी समोरच सिंह आणि अस्वल आहेत ते पाहून तो जाम घाबरला. तो तेथून जाण्याकरिता आपले पाउल उचलतच होता तितक्यात त्याचा लक्षात आले की सिंह आणि अस्वल दोघांमध्ये उभं राहण्याचीही शक्ति उरली नव्हती.
हे पाहून कोल्हा खूप खुश झाला आणि त्याने आनंदाने शिकारीला तोंडात धरले आणि तेथून त्याला खेचून घेऊन जाऊ लागला. हे पाहून सिंह आणि अस्वल एकमेकांकडे लाचारीने पाहून म्हणाले, “आपण पण किती मूर्ख आहोत जे आपसात भांडून ह्या कोल्ह्यासाठी शिकार तयार ठेवली!”