Arun Gode

Others

3  

Arun Gode

Others

दक्षिणायण

दक्षिणायण

4 mins
290


       जसा सूर्य दर वर्षी वर्षभरात उत्तरायण आणी द्क्षिणायन स्पष्ट दिसनारा पण खोटा प्रवास करत असतो. वास्तविक तो एका ठिकाणी स्थिर असतो व पृथ्वी तीच्या अंडाकृती कक्षेत परिक्रमा करत असते. तशिच आमची या वेळेस दक्षिण भारत भ्रमण करण्याची ईच्छा झाली होती. म्हणुन मी आणी माझे कुटुंब दक्षिण भारताच्या प्रवासाला निघालो होतो. माझी दोन्ही मुले फार आनंदात होती. त्यांचा आनंद बघुन आम्ही पती-पत्नि पण फार सुखावलो होतो. सर्वप्रथम आम्ही तिरुअनंतपूरमला गेलो होतो. तीथे पदमनाभन स्वामी मंदीरात दर्शन घेतले व नंतर त्यालाच लागुन असलेला घोडा राजमहल बघितला होता. मोहनराजा स्वाथी द्वारा निर्मित या राज महालात दक्षिणी कडच्या छ्ताला बाहेरच्या भागाल एकुन 122 घोडे एक सारखे एका रांगेत कोरलेले आहेत. त्यामुळे त्याला घोडा राजमहल पण म्हणंतात. राज महालात जवळ-पास तेवीस पेक्षा कदाचित जास्त दालान किंवा कमरे आहेत. प्रत्येक कम-याची विशेशता म्हणजे त्या कम-याचे वेग-वेगळे नक्षीदार छ्त जे खरचं अतुल्य कारागिरीचे काम आहे. एका कमर-यात त्याच वंशातील राजाचे फार मोठे छायाचित्र आहे. त्याची विशेषता अशी आहे कि पर्यटक ज्या कोणातुन किंवा बाजुने ते छायाचित्र बघाल,तेव्हा राजा तुम्हच्या कडे बघुन राहिले असे दिसते. छायाचित्र बनवना-याला सलाम किंवा मानाचा मुजरा !.

      दुखाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हा महल बनवला होता. ते या महलात राजे फ्क्त एकच वर्ष जीवंत राहु शकले होते. या महलाचे मुख्य प्रवेश व्दार हे दक्षिणीला आहे. व त्याचमुळे त्यांचा असमयी मृत्यु झाला असा विश्वास होता म्हणुन ते व्दार नेहमी साठी कायमचे बंद करण्यात आले आहे. केरळ मधील अन्य प्रेक्षणीय स्थानांचा प्रवास करुन, मग कन्याकुमारी व रामेश्र्वरमला भेट दिली होती. आमचा शेवटाचा टप्पा होता जगातील सर्वात धनवान देवाचे पावन दर्शन, ज्याची ख्याती जगभरात धनकुबेर म्हणुन आहे. ज्या देवाने मानवाला घडवले व पृथ्वी वर त्याला आपले कर्म करण्यासाठी पाठविले आहे. भक्तांच्या कर्माचा लेखा- जोखा ठेवण्यासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्वर्गात आहे. व त्याचा मुखियां यमराज आहे. जसे करावे तसे भरावे. ज्याचे कर्म व वेळ संपते त्याला आपाल्या मंत्रालयाच्या रिपोर्ट प्रमाने, त्याचे शेवटचे गंतव्य स्थान निश्चित करुन, त्याला स्वर्गात किंवा पाताळ्यात अर्थातच नरकात पाठवतात असा पौराणिक विश्वास आहे. पौराणिक मान्यतानुसार या मंदिरात धन वर्षाव करने शुभ समजले जाते. 

     तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी, वेळ वाचावा,व देवाचे शिघ्र दर्शन व्हावे, म्हणुन आम्ही सर्वांनी एक ईलेक्ट्राँनिक बेल्ट घेतला होता. वेळेनुसार आम्ही तीथे पोहचलो. व देव-दर्शणासाठी रांगेत उभे राहलो. तबल एक घंट्या नंतर आम्ही पहिला कठड्यात प्रवेश केला होता. तीथे रांगे सोबतच समांतर बेंचची पण व्यवस्था केली आहे. भक्तांना जर विश्रांतीची आवश्यकता भासली तर ते त्यावर विसावा घेवु शकतात. कठड्यातील भक्तांना थोड्या-थोड्या वेळने व सिमित संखेने समोरच्या कठड्यात प्रवेश करण्यासाठी सोडतात. अशे बरेच कठडे ओलांडल्या नंतर धनकुबेर यांच्या मुख्य मंदिरात प्रवेश मिळणार होता. काही भक्त विशेष मार्गाने दर्शन घेण्यासाठी धन खर्च करुन दर्शन घेत असतात.त्याला आपल्या साध्या भाषेत वी.आय. पी. दर्शण म्हणतात.

    साधारण परिवारातील भक्त हे रांगेतच उभे राहतात. त्यामुळे आमच्या सबोत एक मध्यम,शिक्षित पारिवार होता. इतक्या वेळे नंतर मैत्री होने स्वाभाविक होते.परिवार आमच्या सारखा शिक्षित व सुशिक्षित असल्यामुळे ब-याच विषाया वर चर्चा चालु होती. चर्चेचा मुख्य ध्येय वेळ घालवने मात्र होता.त्या परिवारातील सर्वांनी आपले केश तिरुपतीला धार्मिक मान्यता नुसार दान केले होते.बहुतेक सर्वच भक्त केस दान करतात.आजु-बाजुला अशा भक्तांची संख्या खूपच जास्त असते. पण आमच्या परिवारातील एकाही सदस्याने केस दान केले नव्हते. म्हणुन आम्ही तीथे विदुशका सारखे सर्वांच्या डोळ्यात खूपत होतो. अति शाहणा त्याचा बैल रिकामा. वेळेची कमतरता असल्यामुळे आणी माझा या अशा रुढी वर फार विश्वास नसल्यामुळे तो कार्यक्रम मी टाळला होता. याची खंत माझ्या अर्धांगिनीला पण होती. पण वेळे अभावी आम्ही तसे करु शकलो नव्हतो. त्यामुळे आमच्या सोबत असणा-या परिवाराला हे विचारण्याची नेमकी उसुकता लागली होती. त्याला जेव्हा चर्चा करता-करता संधी मिळाली होती. तेव्हा मोठ्या मार्मिकतेने मला प्रश्न केला की साहेब आपल्या पारिवाराने इतक्या दूर येवुन सुध्दा केस दान केले नाही.हा प्रश्न जेव्हा मला करण्यात आला, तेव्हा मी त्याला सहज उलट प्रश्न केला.केस दान करने कां आवश्यक आहे ?. त्यावर परिवारातील सर्व सदस्यांनी एकमताने उत्तर दिले .केस दान केल्याने आपले सर्व पाप गंगेत जावुन नष्ट होतात. ते म्हणाले अशी इथे श्रध्दा व प्रथा प्रचलित आहे. धार्मिक श्रध्देचा विरोध न करता.मी प्रश्नाचे उत्तर न देता टाल-मोटल करण्याचा प्रयत्न करित होतो. कदाचित त्यांना मी नास्तिक असावा असे वाटले असावे !.पण मी जे कष्ट घेवुन देव- दर्शनासाठी तबल सहा घंट्या पासुन उभा होतो. त्यामुळे मी नास्तिक नसावा याचा पण क्षण भर विचार त्यांनी केला असावा. 

       चर्चा करता-करता आम्ही धनकुबेराच्या मुख्य गाभा-यात पोहचलो होतो. आयजीच्या जिवावर बायजी उदार, तीथे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले व माझ्या पत्निने तीच्या ईच्छेनुसार दान पेटीत दान केले होते. सर्वभक्त फार श्रध्देने दर्शणासाठी येतात.पण गर्दीमुळे धनकुबेराचे क्षणातच दर्शन घ्यावे लागते व इतर भकतांन साठी मार्ग मोकळा करवा लागतो. भव्य-दिव्य मंदिर व तीथे कॅश मोजनारे कॅशिरांना कॅश मोजतांना पाहुन हा जगातील खरचं धनवान देव आहे याची प्रचिति झाल्याशिवाय राहत नाही. तेथील काचेचे धन मोजनारे कक्ष पार करुन आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो.व वापसीच्या प्रवासाला दुस-या दिवशी विश्रांती नंतर निघालो.


Rate this content
Log in