दह्या-दुधाचे झाड.
दह्या-दुधाचे झाड.
एका राजाला एक राजकुमार एक राजकुमारी होते. दोघे बहिण-भाऊ खूप गोंडस होते. राजाची मुलं म्हटल्यावर त्यांचा खूप कोड कौतुक होत. त्यांची कपडे तर खूपच छान. राजा राणी पण राजकुमार व राजकुमारी ला पाहून आनंदीत होते. त्या दोघांना दूध दही खायला आवडत असे, ते दोघे दूध खाल्यावर राजवाड्याच्या मागील रिकाम्या जागेवर त्यांचे हात धुवायचे. त्यांचे हात दूध व दही चे भरलेले असल्याने ते तेथे हात धुवायचे म्हणून तेथे दोन वेगळीच छोटी झाडे रोपटे उदयास आले, ते रोपटे मोठे झाले. त्याचे झाड तयार झाली, झाड पाहून राजला आश्चर्य झाले, त्याला सुचले की हे झाड तर दूध व दह्याचे आहे, मग राजाला एक कल्पना सुचली.
राजाने शिपायांना गावात दवंडी द्यायला लावली की हे दोघे झाडे जो कोणी ओळखेल त्याला शंभर सुवर्णमुद्रा देण्यात येतील. गावातील सर्व लहान-मोठे, स्त्री-पुरुष तेथे आले परंतु त्या झाडांची नावे कोणीही ओळखू शकले नाही. राजवाड्याजवळ एवढी गर्दी पाहून तेथे दोन गरीब भिकारी भाऊ-बहीण आले त्यांनी चौकशी केली तर लोक त्यांना सांगू लागले की त्या दोन झाडांची नावे जो कोणी ओळखेल त्यांना राजा फार मोठे बक्षीस देणार आहे. मग ते भाऊ-बहीण पुढे आले लोक त्यांना हसू लागले पण राजा चांगला होता, दयाळू होता त्याने त्या दोघे भिकारी भाऊ बहिणींना तेथे बोलावून त्या झाडांना ओळखायला सांगितले त्यांनी पटकन सांगितले की हे दुधाचे व हे दुसरे झाड दह्याचे आहे. राजाला आश्चर्य वाटले या मुलांनी कसे ओळखले तर विचारल्यावर त्यांनी सांगितले राजकुमार राजकुमारी जेवण करून नेहमी येथे हात धुवायचे त्यांचे हात दही व दुधाचे असायची ते दूध दही पडून तीच झाडे उगली राजा खूश झाला त्यांनी गरीब मुलांना शंभर सुवर्णमुद्रा देऊन त्यांचा सन्मान केला.
