MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational

धाडसी तनु

धाडसी तनु

4 mins
246


     एका गावात एक सुखी कुटुंब राहत होते... खाऊन पिऊन सुखी समाधानी कुटुंब होते ....मुलांवर खूप चांगले संस्कार होते... तनु नावाची मुलगी फार गुणी आणि हुशार होती....ती शाळेत जाताना स्वतःची छोटी छोटी काम स्वतःच करायची... इयत्ता चौथीच्या वर्गात असणारी तनु स्वभावाने फार निर्मळ,सुंदर, खूप मन लावून अभ्यास करणारी, सर्व विद्यार्थ्यांना जीव लावून मिळून मिसळून राहणारी, सर व मॅडमची लाडकी तनु....

    एक दिवस तनु शाळेतून घरी निघाली... आणि तिला मैत्रिणींनी खेळायला, अभ्यास करायला मैत्रिणीच्या घरी नेले..... अर्धा तास अभ्यास करून लपाचीपी, लगोर, पाठीवरच्या उद्या, आणि आंधळी कोशिंबीर,काच, ई. खेळ सर्व मैत्रिणी दमून जाई पर्यंत खेळ खेळल्या.... सूर्य अस्ताला जाऊ लागला होता. हळूहळू अंधार पडू लागला... तनुला आईची आठवण आली की आता थोड्या वेळाने रात्र होईल आपल्याला लवकर घरी जायला हवं... म्हणून तनु लगबगीने घराकडे जायला निघाली.... पाठीवर दप्तर.... खेळून खेळून तनु पार दमून गेली होती.... धापा देत देत... पळत पळत घराकडे निघाली... रस्त्यावरून जाताना तनु ला फार भीती वाटू लागली.... संध्याकाळचे साडे सात झाले होते...तनु जीव मुठीत घेऊन निघाली....

    तेवढ्यात एक कार तनुच्या जवळ एकदम येवून उभी राहिली आणि तनु का काही समजण्याच्या आतच कुणीतरी तनु ला गाडीत ओढल.... तनु आरडाओरडा करणार तेवढ्यात तनुच्या तोंडाला चिकटपट्टी लावली गेली... तनु जीवाच्या आकांताने दोन्ही हात गाडीच्या काचेवर आपटू लागली ता लगेचच दुसऱ्या एका माणसाने तनुचे दोन्ही हात एका दोरीने घट्ट बांधून ठेवले .. आता मात्र तनु खूप घाबरली होती.... गडीमधल्या सर्व माणसांनी स्वतःच्या तोंडाला मास्क लावले होते....ते लोक कोण आहेत आणि तनुला काय करणार आहेत या विचारांनी तनु फार अस्वस्थ झाली..... तनु आतल्या आत रडून रडून बिचाऱ्या तनुचे खूप हाल झाले होते. थोड्या वेळाने एका चौकात एक दोन मजली घर होते तिथे गाडी वळली आणि गाडीतल्या एका माणसान तनुला उचलून घेतलं आणि वरच्या दुसऱ्या मजल्यात नेल होत.... तिथं गेल्यावर तनुला सारा प्रकार लक्षात आला.... तनु ल लगेचच कळाले की तनुच अपहरण झाले आहे.... तनु मुलगी कधी ही घर सोडून बाहेर न जाणारी. पण त्या रात्री बराच वेळ तनु घरी न आल्याने तनुचे आईवडील फार चिंतित होते.... तनु चे आईवडील घाबरून गेले आणि पोलिस स्टेशन ला जाऊन तनु हरवल्याची तक्रार केली....

     तनुची आई रडून रडून पार कोमेजून गेली होती... तिच्या काळजाचा तुकडा आज तिच्या नजरेसमोर दिसत नव्हता....काय झालं असेल तनु सोबत? कुठे असेल तनु? कशी असेल तनु? काय खाल्ल असेल तनुने? अश्या अनेक विचारांनी गोंधळ घातला होता....

   एका मध्यवर्गीय कुटुंबातली तनु मुलगी अत्यंत हुशार, चाणाक्ष होती....तिला एका खोलीत बंद करून ठेवलं होत... काय करावं कुठं जावं तिला काहीच कळेना झालं... लहानसा जीव पार हादरून गेला होता...पण तशी तनु धाडसी मुलगी होती... तीन रडणं थांबवलं... इकडे तिकडे शोधू लागली....पण तिला बाहेर जाण्याचा काहीच मार्ग सुचत नव्हता... बघता बघता संध्याकाळ झाली... आणि तिला किडन्याप केलेले माणसं रात्रीला त्या घोलीत परत आले.... त्यातले चौघे ही खूप पिलेले होते... इकडून तिकडे झोके खात होते त्यातल्या एकाने तनुच्या हाताला बांधलेली दोरी सोडली.... आणि ताट जेवायला समोर ठेवलं... तनु ला काहीच खायची इच्छा नव्हती पण बारा तास उलटून गेले होते आणि पोटात कावळे नाचत होते... तनु ने चार घास कसेतरी गळी उतरविले...असे करत करत चार दिवस निघून गेले...एक दिवस तनु टॉयलेट मध्ये आली आणि खिडकीतून बाहेर डोकावले तर तिला एक माणूस चप्पल नीट करणारा खाली बसलेला दिसला... तनु आवाज ही देवू शकत नव्हती कारण बाहेरच्या किडन्या प्र ल आवाज ऐकायला गेला असता...तनु का ज्या खोलीत बंद केलं होत ती चौथ्या मजल्यावर होती ....

      तनुला एक युक्ती सुचली.. एके दिवशी दुपारी खोलीत एकटीच तनु होती..ती इकडे तिकडे पहिली तिला कपटावर एक कागद व पेन दिसला... तनुने त्यावर लिहिलं मला वाचवा प्लीज....मी चौथ्या मजल्यावर बंदिस्त आहे... आणि तो कागद गोलामोळा केला आणि टॉयलेट च्या खिडकीतून खाली फेकला....आणि बरोबर त्या चप्पल नीट करणाऱ्या माणसाच्या अंगावर पडला....त्याला वाटल काय जमाना आला... आजकाल लोक खिडकीतून कचरा बाहेर फेकतात....त्या माणसाने वर पाहिले तर एका खिडकीतून एक मुलगी हात जोडून सोडवण्यासाठी रिक्वेस्ट करीत होती.... चप्पल नीट करणाऱ्या माणसाने कागद उघडून पाहिलं तर त्यावर मला वाचवा अस लिहिलं होत... सर्व त्याचा लक्षात आले आणि तो माणूस पळत पोलीस स्टेशन ल गेला आणि पोलिस गाडी घेऊन थेट चौथ्या मजल्यावर गेले तर आत तनु ल कोंडलेल होत.... किडन्यापर तनुला विकणार होते .. नशेत असलेल्या किडण्यापर ला पोलिसांनी ताब्यात घेतलं... घटनास्थळी आई बाबा पोहचले... आई ला घडला प्रकार पोलिसांनी सांगितला... आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले... आईने तनुला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली माझी धाडसी तनु बाळा....


Rate this content
Log in