डॉ. बाबासाहेब आंबेडकर....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर....
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर... कुशाग्र बुद्धिमत्ता, अतिशय हुशार, जिद्द, व घेणारे व्यक्तिमत्व.... खरी साथ रमाई ने दिली.. म्हणून बाबासाहेब घडले.... प्रत्येक संकट वेळी बाबासाहेबांपुढे एखाद्या ढालीसारखी उभ्या राहिल्या ...सर्व त्याग सोसला... एकटीनेच दुःखावर दुःख झेलत राहिल्या... त्यामुळे बाबासाहेब घडले..... बाबासाहेब रमाईला रामू म्हणत असत.... बालपणापासून खूप अभ्यास करीत... पुस्तकच त्यांचे मित्र असत.... एकदा तर बाबासाहेब ग्रंधालयात पुस्तक वाचायला बसले होते... कधी रात्र झाली त्यांना कळलं पण नाही.... जेव्हां दुसऱ्या दिवशी ग्रंथालयातील शिपाय सकाळी उठून दरवाजा उघडतो... आणि पाहतो तर बाबासाहेब रात्रभर पुस्तक वाचत बसलेले दिसले.... पुस्तसारखा दुसरा मित्र नाही... असे बाबासाहेब नेहमी बोलायचे.....
समाजसुधारणाविषयक विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोण एकोणिसाव्या शतकातील नेमस्त सुधारकांपेक्षा गुणात्मकदुष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचविलेल्या सुधारणा विधवा विवाह, केशवपन, विवाहाची वयोमर्यादा इत्यादी कौटुंबिक सुधारणासंबंधी होत्या. त्यामुळे त्या सुधारणांमधून मूलभूत अशा सामाजिक सुधारणा झालेल्या नाहीत. मूलभूत प्रश्न सुटलेला नाही असे मत डॉ. आंबेडकरांनी या संदर्भात व्यक्त केले आहे. इतर लहान लहान सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांना वाटप होते. नेमस्त सुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचात आणखी एक मुख्यतः फरक म्हणजे नेमस्त सुधारकांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे. यावर मात्र डॉक्टर आंबेडकरांना विश्वास नव्हता. अस्पृश्यता मान्य करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाची त्यांनी होळी केली होती. त्या काळातील नेमस्त सुधारक आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या समाज सुधारणा दृष्टिकोणाबाबतचा आणखी एक फरक म्हणजे नेमस्तक सुधारकांचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता. मात्र हृदय परिवर्तनावर मर्यादा असतात असे मत डॉ. आंबेडकरांचे होते.
समाजसुधारणाविषयक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोण एकोणिसाव्या शतकातील नेमस्त सुधारकांपेक्षा गुणात्मकदुष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचविलेल्या सुधारणा विधवा विवाह, केशवपन, विवाहाची वयोमर्यादा इत्यादी कौटुंबिक सुधारणासंबंधी होत्या. त्यामुळे त्या सुधारणांमधून मूलभूत अशा सामाजिक सुधारणा झालेल्या नाहीत. मूलभूत प्रश्न सुटलेला नाही असे मत डॉ. आंबेडकरांनी या संदर्भात व्यक्त केले आहे. इतर लहान लहान सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांना वाटप होते. नेमस्त सुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचात आणखी एक मुख्यतः फरक म्हणजे नेमस्त सुधारकांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे. यावर मात्र डॉक्टर आंबेडकरांना विश्वास नव्हता. अस्पृश्यता मान्य करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाची त्यांनी होळी केली होती. त्या काळातील नेमस्त सुधारक आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या समाज सुधारणा दृष्टिकोणाबाबतचा आणखी एक फरक म्हणजे नेमस्तक सुधारकांचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता. मात्र हृदय परिवर्तनावर मर्यादा असतात असे मत डॉ. आंबेडकरांचे होते.
अशा थोर महामानवाला विनम्र अभिवादन....