चिराग का जीन
चिराग का जीन
आम्ही एकदा राजस्थानमधील छोट्याश्या गावात सहली साठी गेलो होतो. तेव्हा आम्ही तेथे भल्या मोठ्या राजवाड्यात थांबलो होतो. राजस्थानमधील जेवण, लोकनृत्य, लोकांचे राहणीमान फारच सुंदर आहे. मी आणि माझा भाऊ राज, आम्हा दोघांना फिरायला आणि नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडते. आम्ही रात्रीचे जेवण झाल्यावर वाड्यामध्ये खेळत होतो. तिथे एका खोलीतून विशिष्ट प्रकारचा प्रकाश येत होता. आम्ही त्या खोली जवळ गेलो. तेवढ्यात तिथे एक काका आले.
(काका आणि आमच्या मधील संवाद)
काका-उस दरवाजे के पास क्या कर रहे हो?
मी-उस दरवाजे के अंदर से रोशनी बाहर आ रही है,क्या आप हमे बतायेंगे की ये रोशनी किस चीज की है?
काका-उस दरवाजे के अंदर एक जादुई पेटी है|उसकी ही रोशनी इस दरवाजे से बाहर आ रही है| वो पेटी बरसो से यहा पे है लेकीन आज तक उसे कोई खोल नही पाया|तुम लोग अब अपने कमरे मे जाओ|
त्या नंतर ते काका तिथे एका बेड वर जाऊन झोपले आणि एक चावी त्यांनी त्यांच्या उशिच्या खाली ठेवली आणि नंतर आम्ही आमच्या खोलीत जाऊन झोपलो. राज शांत पणे झोपी गेला पण मला मात्र झोप येत नव्हती. मी त्या खोलीत नक्की काय असेल, ह्या बद्दलच विचार करत होतो.विचार करता करता मला कधी झोप लागली मला समजलंच नाही.सकाळी उठुन आम्ही फिरायला गेलो. आम्ही त्या दिवशी उंटावर बसुन सफर केली. पुन्हा आम्ही वाड्यात आलो. जेवताना मी राजला सांगितला की,"आज रात्री सगळे झोपले की आपण त्या खोलीत मध्ये जाऊया आणि बघु या त्या पेटीत काय आहे."
आम्ही रात्री सगळे झोपल्या नंतर त्या खोलीच्या बाहेर येउन पोहचलो.ते काका तिथेच बाजूल बेड वर झोपले होते.आम्ही त्या दरवाज्या जवळ गेलो तेव्हा त्या दरवाजाला भला मोठा कुलुप लावला होता.आम्ही विचार करत बसलो आता ह्या कुलुपाची चावी कुठुन आणायची.तेवढ्यात राजच्या लक्षात आले की काका त्यांच्या उशी खाली एक चावी ठेवतात.आम्ही ती चावी घेण्यासाठी बेड जवळ गेलो.काका गाढ झोपी गेले होते.मी त्यांच्या उशी खाली हळुच हात टाकला तेवढ्यात राजचा धक्का मागे ठेवलेल्या फ्लॉवर पॉटला लागला.फ्लॉवर पॉट हलु लागले आणि ते पडणारच होतं तेवढ्यात राजने ते सावरले.तेव्हा आमच्या जिवात जीव आला.नंतर मी काकांच्या उशी खालुन ती चावी काढली आणि तो दरवाजा उघडला.
दरवाज्या उघडताच त्या पेटीचा प्रकाश कमी झाला आणि ती चमकू लागली.त्या खोलीत सगळी कडे जाळी होत्या.त्या तोडत तोडत आम्ही त्या पेटी पर्यंत पोहचलो. त्या पेटीचा प्रकाश पुर्ण खोलीत पसरला होता.खोलीत वेगवेगळ्या महाराज्यांची चित्रे लावली होती.त्यांच्या वर धुळ लागली होती.एका रिंगणात ती छोटीशी पेटी ठेवली होती.ती पेटी कदाचीत सोन्याची असावी तिचा प्रकाश काही केल्या थांबत नव्हता.आम्ही ती पेटी उचलण्याचा प्रयत्न केला तर ती आम्हाला उचलताच येत नव्हती.त्या पेटीच्या चारी बाजुला एक विशिष्ट प्रकारची आकृती कोरली होती.आम्हाला वाटले कदाचीत त्या आकृत्या अश्याच पेटी ची शोभा वाढवण्यासाठी कोरल्या असाव्यात.ती पेटी सुद्धा बंद होती तिला खोलण्यासाठी आम्हाला एका चावीची गरज होती.पण आमच्याकडे चावी नव्हती.
आम्ही चावी पूर्ण खोली भर शोधली पण आम्हाला ती सापडली नाही.राज ने एका चित्राची फ्रमे काढली.आम्ही बघतो तो तर काय त्या चित्रा मागे एक दगड होते आणि त्या दगडावर नक्षीकाम केले होते.ते नक्षी काम पेटी वर एका बाजुला केलेल्या नक्षीकामा सारखे होते.मी तो दगड त्या पेटी जवळ घेऊन गेलो. पण आता त्या दगडाचं काय करायचं हे आम्हा दोघांनाही सुचत नव्हते.मग मी तो दगड पेटीच्या बाजुला ठेवला तर तो त्या नक्षीकाम केलेल्या बाजुच्या दिशेने आकर्षित झाला आणि त्याला जाऊन चिपकला.आम्ही हे बघुन अचंबित झालो.राज बोलला की हे उरलेले तिन दगड आता आपल्याला शोधायचे आहेत मग कदाचित ही पेटी उघडेल.मग आम्ही तिथल्या सगळ्या चित्रांची फ्रमे काढली तर आम्हाला ते तिनिही दगड सापडले.आम्ही एक एक करुन ते दगड त्या पेटी ला जोडले आणि एक जोरात आवज झाला आणि ती पेटी आकाशात उडू लागली.त्या पेटीचा दरवाजा अचानक उघडला.राज आणि मी खुप घाबरलो होतो.
त्या पेटीत एक नकशा होता आणि एक गोलाकार हिरा होता.आम्ही तो नकाशा उघडुन बघितला तर आम्हाला त्यातले काहीच कळत नव्हते.त्या नकाशात एका ठिकाणावर पेटी होती, एका ठिकाणावर सापाचे निशाण होते, एका ठिकाणावर बुद्धिबळाच्या पाठीसारखा निशाण होते आणि एका ठिकाणावर चिरागचा चित्र होता.आम्हाला काही कळत नव्हते.
मी-हे सारे एका खेळा प्रमाणे आहे.जर आपण हा खेळ जिंकलो तर आपल्याला तो चिराग मिळेल.
राज-हे चिराग आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला हा खेळ खेळावा लागेल.
मी-पण त्या चिराग चा काय उपयोग?
राज-आता ते आपल्याला तिथे गेल्यावरच समजेल.पण आता येथुन पुढे कसे जायचे.
मी-तो हिरा दाखव.मला वाटते की हाच हिरा आपल्याला पुढे घेऊन जाईल.
राज-शुभांकर बघ त्या पेटी खाली रिंगणाच्या मधोमध एक मोठे छिद्र आहे.
मी-हा आपण तो हिरा त्यात टाकुन बघुया का?
राज-हा टाक.
( तो हिरा त्यात टाकताच ते रिंगण खुले झाले आणि आम्ही त्याच्या आतमध्ये गेलो.)
आतमध्ये खुप काळोख होता.राज आणि मी फार घाबरलो होतो.राज ने त्याच्या सोबत आणलेली बैटरी चालू केली.आम्ही एका वेगळ्याच जागेवर पोहचलो होतो.आम्ही उठुन पुढे चालू लागलो.काही अंतरावर पोहचतात तिथे चार रस्ते दिसत होते.आम्हाला समजत नव्हते की कुठे जायचा.जर चुकीच्या रस्त्यावर गेलो तर आमच्या सोबत काय होईल हे आम्हाला पण माहीत नव्हते.म्हणुन मग मी तो नकाशा उघडला.नकाशा मध्ये चार रस्त्यां पैकी सगळ्यात शेवटच्या रस्त्या कडे बाण दाखवला होता.मग आम्ही त्या मार्गाने पुढे सरकलो.पुढे जाताच तिथे खुप सारे खांब उभे होते.आम्ही त्याच्या थोडा पुढे गेलो तिथे आमच्या समोर एक भला मोठा साप आला.आम्ही खुप घाबरलो.
राज-शुभांकर आता ह्याच्या पासुन कसे वाचायचे?
मी-मलाचं सुचत नाही आहे.
राज-लवकरात लवकर काय तरी कर नाही तर हा साप आपल्याला खाऊन टाकेल.
मी-idea! आपण ना.............................
1........ 2......... 3
तीन बोलताच आम्ही खांबांच्या दिशेने पळत सुटलो.तो साप ही आमच्या मागे आला.आम्ही त्याला खांबामध्ये अडकवण्याच्या प्रयत्न करत होतो.मी राजला left म्हंट्ल की राज आणि मी left ला वळायचो आणि right म्हंट्ल की आम्ही right ला वळायचो.आम्ही असा करुन त्याला त्या खांबांमध्ये अडकवले.तो आता हलू पण शकत नव्हता.तो सुटण्याच्या आधी आम्हाला पुढे जायचे होते.तो जिथे उभा होता त्याच्या मागेच दरवाजा होता.आम्ही त्या दरवाजा जवळ गेलो.तो दरवाजा आम्ही उघडण्याचा प्रयत्न करत होतो,मात्र तो आमच्या कडुन उघडला जात नव्हता.तेवढ्यात राज चे त्या दरवाजा वर लिहिलेल्या अक्षरांवर गेले.तिथे कोणत्या तरी भाषेत काही तरी लिहिलेलं.आम्हाला ते वाचता येत नव्हते.
राज-शुभांकर काय लिहिलं असेल रे इथे?
मी-मला काय माहीत नाही.
राज-ते टीवी मध्ये दाखवतात बघ 'खुल जा सिम सिम' म्हणाल्या वर दरवाजा उघडता तसा तर नसेल ना.
मी-नाही नाही.
(राज पुन्हा एकदा जोरात 'खुल जा सिम सिम' म्हणाला आणि झटक्यात दरवाजा उघडला.)
मी-राज,आज पहिल्यांदा तुझी अक्कल कुठे तरी कामाला आली.😂
(राज आणि मी हसु लागलो)
मग आम्ही पुढे गेलो.त्या रस्त्यावर वेगळ्या प्रकार चा आवज येत होता.आम्हाला खुप भिती वाटत होती.काही अंतर चालल्या नंतर एक बुद्धिबळाच्या पाठी सारखी जमीन दिसु लागली.राज आणि मी तिथे गेलो.
राज-शुभांकर,हे तर खुप सोप्पं दिसतय.आपण आरामात पुढच्या दरवाजाच्या कडे पोहचु.
मी-हे दिसतय तसं सोप्प नाही आहे.
राज-शुभांकर तु घाबरु नको रे थांब मी जातो.
मी-थांब राज.
(मी बाजूची काठी घेऊन त्या दगडांवर फेकली आणि लगेच ती फेकलेली काठी त्या दगाडाला स्पर्श होताच तो दगड दरवाजा सारखा उघडला आणि फेकलली काठी त्याच्या आत गेली.आम्ही हे बघुन आश्यर्यचकीत झालो.)
मी-राज बघितलस का त्या काठी सारखा तु देखील आत गेला असतास.😂
राज-शुभांकर बरे झाले तू मला वाचवलेस.
मी-पण आता ह्याच काय करायचं?इथुन पुढे कसं जायचं?
राज-आपण इथे शोधु कुठे ना कुठे काही तरी क्लू मिळेल.
मी आणि राज इकडे तिकडे काही क्लू सापडतो का हे पाहत होतो.राज ला तिथे एक मोबाइल सारखी फळी दिसली.त्यावर खुप धुळ साठली होती.आम्ही ती हातानी बाजुला केली आणि तिथे एक नंबर लिहिलेला."548297136" आम्हाला पहिल्यांदा काही समजलेच नाही नंतर आम्ही विचार केला आपण ह्या नंबर प्रमाणे त्या दगडांवर पाय ठेऊ.मग आम्ही घाबरत घाबरत पहिल्या रांगेतल्या पाचव्या दगडीवर पाय ठेवला.आम्हाला काही नाही झाले.ह्याच नंबर प्रमाणे आम्ही ते पार केले आणि पुढच्या दरवाजा पर्यंत पोहचलो.तो दरवाजाही आम्ही 'खुल जा सिम सिम' म्हणुन उघडला.आता आम्ही मुख्या दरवाजा समोर जाऊन पोहचलो.
आम्ही त्या दरवाजा जवळ गेलो मात्र तो दरवाजा ही आम्हाला उघडता आला नाही.त्या दरवाज्याच्या बाजुलाच 15,8,12,4 असे आकडे होते आणि त्या वर एक काटा होता.आम्हाला पहिल्यांदा वाटले की ते काटे तितक्यांदा फिरवायचे आहेत.आम्ही ते काटे दिलेल्या आकड्या नुसार फिरवले.मात्र त्याचा काहिच उपयोग झाला नाही.आम्ही खुप वेळ विचार केला.
राज-आपण हे काटे घड्याळाच्या नंबर प्रमाणे लाऊ मग बघु हा दरवाजा उघडतो का!
मी-हा ठिक आहे.
आम्ही ते काटे घड्याळाच्या नंबर प्रमाणे लावले आणि नंतर दरवाजा उघडला.आम्ही दोघे ही खुप खुश झालो.आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि आत शिरलो.तिथे एक विलक्षण असा चिराग हवेत तरंगत होता.आम्ही तिथे गेलो आणि तो चिराग हातात घेतला.आम्ही तो निरखुन पहिला.आमचा हात नकळत त्या चिरागला घासला गेला.त्यातून एक माणुस बाहेर निघला.त्याच्या डोक्यावर शेंडी होती, अंग पूर्णपणे निळसर होते, त्याला पाय नव्हते,अंगावर कोट घातलेला.आम्ही खुप घाबरलो.तो आळस काढत होता.
आम्ही-कोण तु?
जीन-मी जादूई जीन.मी तुमचे केस गायब करु शकतो,मी तुम्हाला मांजर करु शकतो.मी तुमच्या 3 इच्छा पुर्ण करणार.
आम्ही-खरच.तुला आम्ही जे काय सांगु ते तू करशील का?
जीन-हो अगदी खरं.मी तुम्ही सांगाल त्या 3 इच्छा पुर्ण करेल.
.
.
.
राज-मग आम्हाला आम्ही जेथुन आलो तेथे पाठव.
(मग जीन ने 'जो हुकुम मेरे आका' म्हणत टाळी वाजवली.मग आम्ही जीन सह आमच्या वाड्यात जाऊन पोहचलो.)
आम्ही दोघेही त्याची जादु बघुन अचंबित झालो.
जीन-होशियार!आता तुम्ही आता फक्त 2 च इच्छा पुर्ण करुन घेऊ शकतात.
मी-राज बघ आपण 1 इच्छा तर मागितली आता 2 बाकी आहेत त्यातली एक तु माग एक मी मागतो.
राज-हा ठिक आहे.
मी-माझी इच्छा अशी आहे की मला असा पेन पाहिजे जो माझा सगळा अभ्यास पूर्ण करेल.
('जो हुकुम मेरे आका' म्हणत त्याने पुन्हा टाळी वाजवली आणि माझ्या हातात अचानक पेन आला.आम्ही दोघेही खुप खुश झालो.)
जीन-सावधान!आता तुम्ही एकच इच्छा मागु शकतात.
राज-मला एक डब्बा पहिजे त्याच्यातली chocolate कधी ही संपली नाही पाहिजे.
('जो हुकुम मेरे आका' म्हणुन त्याने पुन्हा टाळी वाजवली आणि राजच्या हातात एक डब्बा आला.जीन पुन्हा त्याच्या चिराग मध्ये शिरला आणि चिराग गायब झाला.)
आम्ही दोघेही खुप खुश झालो.आम्हाला अजुन ही हे एका स्वप्ना सारखेच वाटत होते.आम्ही दोघांनी ही आम्हाला मिळालेल्या गोष्टी वापरल्या.
राज आणि शुभांकर लहान होते म्हणुन त्यांनी तश्या इच्छा मागितल्या.जर त्यांच्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही काय मागितले असते? नक्की कमेंट करुन सांगा...
