सुमित बारी

Children Stories Fantasy

5.0  

सुमित बारी

Children Stories Fantasy

चिमणा, चिमणी व कुंभारीन ताई...

चिमणा, चिमणी व कुंभारीन ताई...

2 mins
405


     एक होता चिमणा व एक होती चिमणी, चिमणाला जायचे असते गावाला, तो चिमणीला कुंभारीन ताईकडे ठेवतो. कुंभारीन ताई नाही म्हणते, अरे बाबा तुझ्या चिमणीचे काही झाले तर मी जबाबदार नाही,चिमणा म्हणतो तशी माझी चिमणी हुशार आहे. कुंभारीन ताई म्हणते चालेल. चिमणा चिमणीला कुंभारीन ताईकडे ठेवून गावाला निघून जातो, कुंभारीनताईने आपले दाने सुकवायला ठेवलेले असतात, चिमणी ते दाणे टिपायला लागते, हे पाहून कुंभारीन ताई म्हणते एकतर मी या चिमणीला सांभाळत आहे वरतून ही माझे दाणे टिपत आहे, मग ती चिमणीला दगड मारते व चिमणी मरून जाते. चिमणा गावावरून परततो, तो कुंभारीन ताईला विचारतो माझी चिमणी कोठे आहे? मग कुंभारीन ताई म्हणते, तुझी चिमणी मला नाही माहित. चिमणा म्हणतो ताई मी माझ्या चिमणीला तुझ्या जवळ ठेवून गेलो होतो, मग ती कुंभारीन ताई चिमणा जवळ खोटे सांगते की ती तुझी चिमणी गेली उडून.

         चिमणाला एक बाई सांगते की तुझ्या चिमणीला या कुंभारीन ताईने मारले. चिमणा तिथे रडायला लागतो व तेथून निघून जातो. तो ठरवतो की कुंभारीन ताईला आपण धडा शिकवू व तिच्या तोंडानेच तिला कबलवू. मग तो एक लाकडाची गाडी बनवतो त्याला दोन बोकडांची जोडी लावतो त्यावर स्वारी करून कुंभारीन ताईकडे चिमणी चा बदला घ्यायला निघतो, मग त्याला रस्त्यात साप,विंचू,उंदीर व वाघ एक एक करून भेटतात, ते त्याला विचारतात तेव्हा तो सर्व हकीकत सांगतो व म्हणतो लाकडाची गाडी बोकडाची जोडी चला कुंभारीन ताईकडे भांडण करायला. मग सर्व मित्र त्याच्यासोबत गाडीत बसून कुंभारीन ताईकडे जातात. उंदीर घराच्या सऱ्यात बसतो, विंचू मटक्यात बसतो, साप चुलीत बसतो, वाघ वाड्यात बसतो मग कुंभारीन ताई रात्री झोपते तेव्हा उंदीर सऱ्यातून बरोबर माती तिच्या कानाजवळ पाडतो ,मग ती म्हणते अरे हे काय पडत आहे असे म्हणून ती मटक्यात पाणी प्यायला जाते, तिथे विंचू हाताला डंक मारतो तेव्हा ती ओरडते विंचू चावल्यामुळे तिला रात्रभर झोप येत नाही. सकाळी ती चुलीतून राक काढायला जाते तेव्हा तिला साप चावतो ती ओरडते तरी तिच्या मदतीला कोणीच येत नाही. मग केर टाकायला ती वाड्यात जाते तेव्हा तिला वाघ पकडतो. ती ओरडते परंतु तेव्हाही तिची कोणीच मदत करत नाही, तेव्हा ती चिमणा जवळ माफी मागते व सांगते मीच तुझ्या चिमणीला मारले. चिमणा वाघाला म्हणतो जाऊदे मित्रा, तेव्हा वाघ म्हणतो अरे या कुंभारीन ताईने तुझ्या चिमणीला मारले तरी तू तिला वाचवत आहे. चिमणा म्हणतो ताईला एवढे समजले असते तर तिने चिमणीला मारले असते का? जाऊदे.मग सर्व तिथून निघून जातात.


Rate this content
Log in