छोटासा यश
छोटासा यश
पंधरा मार्चला अचानक सर्व शाळांचे कामकाज बंद झाले. विषाणूचा कहर झाला.
पंतप्रधानांनी लाॅकडाऊन जाहीर केले.अन सर्व व्यवहार ठप्प झाले.
शाळा ,काॅलेजचे शिक्षण तात्पुरते थांबले.
माझा वर्ग इयत्ता पहिली अ.शाळेचे शैक्षणिक वर्ष संपत आलेले असतानाच अचानक शाळेचे कामकाज थांबले. मुलं आणि शिक्षक दोघेही बेचैन झाले.
आकारिक मूल्यमापन चालू होते.लेखी परीक्षा म्हणजेच संकलित परीक्षेची तयारी चालू होती.अन सर्व थांबले.
नंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले..आधीपासून व्हाॅटसॅपवर अभ्यास देणे चालू होते.त्यामुळे मुलांना हे नवे नव्हते.
एप्रिल,मे,जून ,जुलै,ऑगस्ट एवढे महिनेझाले पण माझा यश काही व्हाॅटसॅपवर अभ्यास करत नव्हता.
चार वेळा फोन झाले .बोलणे झाले पालकांशी.घरभेटी तीन वेळा झाल्या.पण पालक दुर्लक्ष करतात असे आढळून आहे.
त्याला परत फोन केला शेवटचा प्रयत्न करावा हा विचार केला.
फोन झाला आणि मी भाजी आणायला बाहेर पडले. सोसायटीच्या बाहेरच चक्क यश दिसला मला. खूप आनंद झाला. त्यालाही आनंद झाला.
यशला म्हटले "काय रे बाळा कसा आहेस?" यश जरा हळवा झाला व मला बिलगला .मी ही त्याला जवळ घेतले आणि विचारले "काय झाले रे"? तो म्हटला "बाई, मला भाजलं पाठीला."
मी पाहिले मलाही वाईट वाटले.
तरी त्याला विचारले "बाळा ,तू अभ्यास का करत नाहीस?" तो बोलला "बाई,आईच सांगत नाही मला .मी रोज विचारतो "
&nbs
p;तेवढ्यात त्याची आई आली . त्या म्हणाल्या "बाई!"
मी म्हटले "बोला यशची आई कशा आहात?"
"मी छान"त्या बोलल्या.
मग मी मूळ विषयावर बोलले ."यशचीआई ,त्याचा अभ्यास गेली पाच महिने आला नाही मल व्हाॅटसॅपवर ,का बर?"
त्या म्हणाल्या "बाई,खरं सांगू का याच्या अभ्यासाकडे मी मुद्दाम लक्ष देत नाही. दोन मोठी मुलं आहेत .याच्यापेक्षा .. त्यांचा अभ्यास असतो ताईची वेळ आठ ते बारा अन दादाची वेळ बारा ते पाच. मी यशचा अभ्यास त्यामुळे घेवू शकत नाही. sorry बाई खरच."
मी त्यांना म्हटले "एकच मोबाईल आहे का?"
त्या म्हणाल्या "दोन आहेत,पण त्याचे बाबा office ला जातात घेवून एक मोबाईल ते सकाळी नऊला जातात रात्री नऊला येतात. या पुढे जेवण,आवरण घरातल. त्यामुळे याचा अभ्यास राहतो."
मी म्हटले,"बर!असे करता येईल आपल्याला .त्याचा अभ्यास म्हणजे,पाढे,वाचन,लेखन,गणिती क्रिया,अंक वाचन लेखन,इंग्रजीचा अभ्यास आहे हे करून घ्या.आणि व्हाॅटसॅपवरील अभ्यास जरा पाहून ठेवा .लिहून घ्या आणि जमेल तसे घेत जा.हे ही नाही जमले तर माझ्या घरी पाठवा दोन तास रोज."
यशची आई खूश झाली.यश बोलला "बाई, मला समजल मी काय करायचे ते,आता दुसरीच्या अभ्यासाला लागतो."
यश खूश झाला आणि खूशीत नाचतच पुढे जावू लागला.आई पण खूश झाली आणि म्हणाल्या "बाई ,यशला उद्यापासून तुमच्या घरी सोडते."
आणि मी पण पुढे निघाले.मनात आले चला यश तर सुधारेल,अभ्यासाला लागेल...
माझा छोटासा यश दुसरीच्या अभ्यासाला लागेल.