माणुसकी
माणुसकी
माणुसकी महत्त्वाची...
हिंदू,मुस्लिम, सिख, ईसाई
सब है भारत के निवासी
और सब है भाई भाई....
आपल्या सगळ्यांना नाक,तोंड चेहरा,डोळे एकसारखे शरीर दिलेला आहे देवानं. आपल्या प्रत्येकाच्या अंगातल रक्त सुद्धा लाल रंगाचच आहे. लाल रंगापेक्षा वेगळा रंग कोणाचाच नाही. आपले रक्ताचे गट वेगवेगळे आहेत. पण रंग मात्र एकच.
हल्ली जगामध्ये काय चाललंय हे आपल्या कोणालाही लपून नाही. जे आहे ते समोर आहे.youtube ला कळते. गुगलला कळते. पेपर मधील बातम्यांमध्ये कळते. टीव्हीवर दररोजच्या बातम्यांमध्ये कळते. बातम्या कळण्याची अनेक आता अनेक साधने आहेत.
तर मला एक सांगायचे आहे की आपण माणुसकीने वागूया. देवाने जर आपल्याला माणूस बनवला आहे तर हैवाना सारखं का वागायचं बरं.
माणसातली माणुसकी लोप पावत चाललेली आहे. कोयता,कुऱ्हाडीने समोरच्या माणसाला मारताना त्याला काहीच कसे वाटत नाही बरं.
त्याला वेदना होईल हे सुद्धा त्यांना जाणवत नाही. स्वतःला चिमटा बसला तरी त्रास होतो लोकाला आपण एवढा मारतो हा विचार कसा यांच्या मनात येत नाही.
चार वर्षाच्या मुलीवरती रेप होतो. किती लिंगपिसाट माणसं झालेली आहेत. यांना लहान बालिश मुलं कळत नाहीत. त्यांना त्यांची मुलं नाहीत का हो!
आई,बहीण, मुलगी, नात सगळं विसरलेले आहेत लोकं.
नाते संबंध म्हणजे काय? हे सांगायला लागणे ही फार कठीण बाब आहे आपल्याकडे.
शाळेसारख्या पवित्र ठिकाणी हे असे उद्योग चालतात खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे ही आपल्यासाठी.
शाळा आहे पवित्र तीर्थस्थान आहे ज्ञानाचं. पालक आपल्या मुलांना तिथे विश्वासाने सोडतात. पालकांचा विश्वासघात करायचा आपण. किती निर्लज्ज लोक असतात.. खरंच आता माणुसकी आहे की नाही हा प्रश्न पडायला लागलाय.
काही देव माणस जगामध्ये आहेत की खरंच त्यांना माणुसकीची जाण आहे. एकमेकांबद्दल आदर आहे. नम्रता आहे. प्रेम आहे. विश्वास आहे.
विश्वास म्हटलं तर हल्ली बापाचा विश्वास ठेवू शकत नाही अशा गोष्टी घडतात या जगामध्ये.
बाप आणि मुलीचं नातं किती निर्मळ आहे. पवित्र आहे. यालासुद्धा काळिमा लावणारे लोक आहेत या जगामध्ये. पवित्र नात्याची विटंबना केली जात आहे.
तुम्ही प्रेम करा. हैवान होऊ नका रे! असा विचार येतो आपली मुलं कोणाजवळ ठेवायची सेफ आहेत का? आपली मुलं? घरातली दोन चाक काम केलं तर आज पोट भरत आहे. हल्ली राहणीमान सुधारलेल आहे. या उच्चभ्रू राहणीमानासाठी पैशाची नितांत गरज आहे.पैसा कमवण्यासाठी घरातील आईबाप दोघे बाहेर पडतात.
मग अशा पालकांनी कोणावर विश्वास ठेवावा. खूप कठीण प्रसंगात माणूस पुढे जात आहे.
अरे अरे माणसा खुळा होऊ नको, विचार कर जरा तू, हैवान होऊ नको. आपल्या वेलीला आलेली फुले तोडण्यात काय अर्थ आहे. याची जाण घे. विचार कर.
माणूस म्हणून जन्माला आला आहेस तर माणसासारखे वाग.
दररोज पेपर उघडला तर बातम्या वाईट असतात. अगदी कमी बातम्या वाचनीय असतात.
त्यामुळे हल्ली पेपर वाचण्यास सुद्धा नको वाटते. सकाळचीच न्यूज आहे डोकं, हात, पाय तोडून नदीत टाकून दिले... ही बातमी वाचण्याचा अर्थ आहे. आपल्या विचारांना चालना मिळत नाही. विचार चक्र तिथेच खुंटले जातात.दिवस खराब जातो.
प्रसन्न सकाळी, प्रसन्न वातावरणात,प्रसन्न बातम्या वाचण्याचे मन असते. पण ह्या बातम्या येतातच समोर.
म्हणून हल्ली पेपर वाचणे सुद्धा नको वाटते मला. जाऊद्या आपण निगेटिव्ह भूमिका सगळ्या सोडून देऊया. पॉझिटिव्ह विचार पेपरमधून छान वाचूया. आपल्यामधे बाणवूया.
एक ऊटुंब मधील प्रार्थना आठवते..
हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे...
माणसाने माणसाशी माणसासम वागणे.... हीच आमुची प्रार्थना