शिक्षक दिन
शिक्षक दिन
५ सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण भारतभर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो.
गुरुजन हे वंदनीय आहेत परब्रम्ह स्वरूप आहेत. या वंदनीय अशा गुरुजींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण राष्ट्रीय स्तरावर ५ सप्टेंबर हा 'सर्वपल्ली राधाकृष्णन 'यांचा जन्मदिवस साजरा करतो.
राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९८८ साली आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी गावी झाला. नेहमी प्रथम वर्गात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी प्राध्यापकाचा पेशा पत्करला. तत्त्वज्ञानावरील त्यांचे ग्रंथ व व्याख्याने देश विदेशात गाजली आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना खास धर्मनितीशास्त्र व तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यानांसाठी सन्मानपूर्वक बोलवले होते.
ते वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा होते.१९३१ ते १९३९ पर्यंत ते राष्ट्र संघात भारताचे प्रतिनिधी देखील होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. १९५२ ते १९६७ पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले.
धर्म व तत्वज्ञान यावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान आले पाहिजे आणि आपल्या विचारांची दिशा ठरवता आली पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा 'जन्मदिन' हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो.
अनादी कालापासून आपल्या देशामध्ये शिक्षकाचे स्थान अतिउच्च मानले आहे. शिक्षक हे उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्य देण्यासोबतच शीलवान,नीतिमान व राष्ट्र प्रेमाने प्रेरित युवा मने विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
ज्ञानदानाबरोबर उद्याचे संस्कारक्षम व जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य शिक्षक करीत आहेत. जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भावी पिढीला विज्ञाननिष्ठ जगामध्ये जीवनाच्या स्पर्धेत ठामपणे उभे राहण्याचे सामर्थ्य जर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचे असेल तर तो केवळ शिक्षक हे कार्य करू शकतो.
अशा या शिक्षकाच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मिळावी म्हणून डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. प्रत्येक शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. ठिकठिकाणी विविध पुरस्कारांचे आयोजन केले जाते.
अशा या महामानवाला माझे मनापासून वंदन.