कटू सत्य
कटू सत्य
कठीण आहे पण सत्य आहे... ज्याच्याजवळ अमाप संपत्ती आहे तो खरच श्रीमंत आहे का? त्याला झोपण्यासाठी सुद्धा कदाचित गोळी घ्यावी लागत असेल . कारण ही संपत्ती कोणी चोरी केली तर? संपत्ती आहे पण स्वास्थ्य अजिबात नसते. बीपी,डायबेटीस,अंगदुखी काहीतरी किरकोळ कारणं चालूच असतात. त्यामुळे झोपेचे खोबरे होते.
फक्त श्रीमंतांनाच नाही तर सगळ्यांनाच हे चालू आहे. सर्वजण याला कंटाळले आहेत. हे सर्व प्रदूषणामुळे जास्त होते.
प्रत्येकजण पायाला चाक लावले असे काम करत आहे. जीवन जगत आहे. जीवनात उच्च स्थान मिळेपर्यंत सर्व कार्यरत आहे. पण सामाजिक कार्याकडे दुर्लक्ष होते. वृक्षारोपण करणे हे एक अतिशय उत्तम सामाजिक कार्य आहे. आणि याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. आपण कोरोना काळात पाहिले की ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून माणसं गेलेली आहेत.
प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. ते जोपासावे. एवढेच नाही तर प्रत्येकाने आपल्या गाडीमुळे होणारे धुराचे प्रदूषण टाळावे. गाडी वेळेवर रिपेअर करून घ्यावी . योग्य तो मेंटेनन्स ठेवावा.
रस्त्यावर केर कचरा करू नये. प्लास्टिक मुक्त अभियान जोपासावे. प्राणिमात्रांना सांभाळावे. हे सांगणे सोपे आहे. कृतीत उतरवणे अवघड आहे. पण समाजातील सर्वजणांनी जर याला हातभार लावला तर कठीण असे काही नाही.
आजकाल वृद्ध माता पिता त्यांची सेवा केली जात नाही. त्याला अनेक कारण असू शकतात. पण या कारणातून सुद्धा थोड्या वेळ आपल्या माता-पितांना द्यावा. तर आपल्यासारखे श्रीमंत कोणी नाही असे म्हणावे लागेल. कारण त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप मोलाचे असतात.
जो रोज लाखो रुपयांमध्ये खेळतो आणि जो आई वडिलांची सेवा करत नाही उर्मटपणे त्यांना वागवतो त्याला काय बरे म्हणावे?
त्याला खरंच सुख प्राप्त होईल का हो? आई-वडिलांचा आशीर्वाद मनापासून मिळतील का हो? आई ही आई असते आईचे आशीर्वाद मिळतीलच पण वडील?? कदाचित ते रागावतील. मनात राग असेल, पण चेहऱ्यावर दाखवणार नाहीत. तर प्रत्येकाने आपल्या आई वडिलांशी प्रामाणिकपणे वागावे. सुना -बाळांनी त्यांच्या सासू-सासर्यांची नीट वागावे.
म्हणजे घरात कुठलेच वादविवाद होणार नाहीत. सर्व घरात आनंदी आनंद असेल. आणि ज्या घरात आनंद नांदतो त्या घरात सुख नांदते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी जे लेखन करते ते माझ्या स्वअनुभवावरती असते.
आपण आपल्या लहान मुलांमध्ये लहान मुलं होऊन वागावे. हे समाधान खूप वेगळे असते. मुलांना देखील आनंद मिळतो. माझे आई बाबा माझ्याशी खेळतात, माझी खूप काळजी घेतात, हे मुलांचे विचार त्यांच्या मनाला आनंद देतात, समाधान देतात. मुलं बिथरत नाहीत.
अशा रितीने वागणारे जे कुटुंब आहे ते समाजामध्ये खूप नावारूपाला आलेले असते. समाजातील ते सुसंस्कृत,श्रीमंत कुटुंब म्हणून पाहिले जाते.
या कुटुंबातील विचार छान असतात. सर्व आरोग्य संपन्न असतात. बुद्धिमान असतात. एकमेकांना घेऊन पुढे चालणारे असतात.
असे जगातील सर्व कुटुंबे खूप खूप श्रीमंत असतात. धनाने नाही तर मनाने. आणि यांना सुखाने झोप सुद्धा येते. परिणामी आरोग्य छान राहते... चला तर मग आपणही असेच वागूया... जीवनाचा खरा आनंद घेऊया.. समाजातील आपले नाव कमवूया...
सुसंस्कारित कुटुंब म्हणून उदयास येऊ या...