इगो
इगो
*इगो*/ *अहंकार*
माणसाला अहंकार कधी होतो तर,त्याने चांगले,वाईट कृत्य करतो तेव्हा मीपणा जागृत होतो. यालाच आपण इंग्लिश मध्ये लिहू असे म्हणतो.
उदा- मी असं केलं, मी तसं केलं मी सर्व काही केलं आहे तो अहंकाराने म्हणतो. वास्तविक पाहता त्याच्याबरोबर बरेचसे लोक असतात. पण हे सगळे स्वतः मी केलं असेच म्हणत असतो. कोणतेही कार्य एकटा माणूस करू शकत नाही. पण कार्याच फळ मिळालं की तो म्हणतो की मीच केलेल आहे. तिथे त्याचा अहंकार निर्माण होतो. यालाच आपण इगो असे म्हणतो. हा इगो ना खूप वाईट आहे. तो माणसातला माणूस संपवतो.
अहंकार कधीच निर्माण होवू देऊ नये अहंकार कसा हि असू शकतो माणसाला अहंकार निर्माण होतो. तिथे त्याची माणुसकी संपुष्टात येते.
स्वतः चा अभिमान असावा, अहंकार नसावा.
आपला अहंकार आपल्याला जाणवत नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांना कळतो.
आपल्याला अहंकार कळतो आपल्या कडून काही गोष्टी वाईट घडतात तेव्हा आपला अहंकार कळतो. पण वेळ निघून गेलेली असते. आपलेच नातेवाईक आपल्या जवळचा मित्रपरिवार आपल्याला सोडून गेलेला असतो. मी पणा हा अहंकार केव्हाही वाईटच आहे.
अहंकार हा आपली उर्जा कमी करतो. ताकद कमी करतो.
स्वतः मी पणा जपावा. अभिमानाने जीवन जगावे. अहंकार सोडून द्यावा.
‘अहंकार’ हा माणसाचा फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला कर्तृत्वाचा अहंवार असतो. तो येता-जाता साऱ्यांना सांगतो, ‘मी शून्यातून जग उभ केलं आहे.’ अरे तू खरंच विश्वमित्र आहेस का? नवीन जग बनविणारा? कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, मत्सर यातून अहंकारी माणसाजवळ नम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं. त्यामुळे अशा माणसाला समाज आपोआपच दूर लोटतो.
अशा माणसाकडे समाज पाठ फिरवतो.
अहंकारात
अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही. ‘आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. ‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर माणुसकीचा धर्म जपावा. अहंमचा त्याग करावा.आपण सोSहं च्या मार्गावरून जातो.‘अहंकाराचा वारा न लागो मनाला’ असं समाजावलं की जगणं उज्ज्वल होतं. सफल होतं. समाजात कीर्तीचा झेंडा फडकवला जातो.
मानव हा भावनाप्रधान आहे. त्यातीलच अहंकार ही वृत्ती भावनाप्रधान आहे. या वृत्तीला सोडून देऊया. प्रेमाचे खत पाणी घालून मनं जपुयात.
"मी " , माझा ," हे शब्द अहंकार दर्शवतात. तेथे काही लोक आम्ही, आमचे शब्द वापरून अहंकाराला सौम्य करतात.
असेच आपणही आम्ही,आपला,आमचा, आमची असे शब्द वापरून आपण छान आदर्श समोर ठेवून अहंकाराला पळवून लावूया.
अभिमान, ताठरता, गर्विष्ठ, आपलेच प्रभुत्व दाखवणारा, मिजास असे अनेक शब्द अहंकार रूपीच आहेत. गरीब श्रीमंत, अडाणी सुशिक्षित यात अहंकार आपल्याला दिसतो. सर्व साधारण गरीब ,अडाणी हे अडचणीत असल्यामुळे अहंकार जपून वापरतात पण शिकलेला,श्रीमंत अहंकार अभिमानाने भरलेला असतो. हा ही अहंकार आपण हाणून काढूया. त्यांच्यातील चांगल्या वृत्तीचा विकास करूया.
"माझ्या सारखा मीचं "
" मला कुणाची गरज नाही "
"मी म्हणून सर्व काही केलं "
"माझ्या कडे सर्वकाही आहे तुझ्याकडे काय आहे "
आणि सर्वात महत्वाचे गर्वाची भाषा आणि मोठ्यांचा अनादर या सर्व गोष्टी माणसाचा अहंकार ( ईगो ) दर्शवतो.
हाच येऊ आपण समाजातून दूर करण्याचं वचन एकमेकांना देऊया व स्वतः पण समाजासाठी कार्य करूया आणि स्वतःचे गर्वहरण करूया.....
*वसुधा वैभव नाईक*