STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

आळस

आळस

3 mins
373


आळस...


  मुल जन्माला येत. साधारण सहा सात महिन्यात तर रांगायला शिकतं. वर्षभरात चालायला लागतं. हळूहळू वरण, भात,भाजी,पोळी खायला सुरुवात करतं. तुम्ही म्हणाल आळसाशी असा काय संबंध...

  हो तस बघायला गेलं तर आळसाशी संबंध आहे तसं बघायला गेलं तर अजिबात नाही.

   हे लहान मूल जन्माला आल्यानंतर उलथपालथ व्हायला लागतं. त्याच्या मर्जीप्रमाणे ते होत असतं. आपण त्याला हालचाल करण्यासाठी मदत करत असतो. पण बरीच बाळ अशी आळशीच असतात. काही बाळ चपळ असतात पटकन आपली रिएक्शन ओळखून आपल्याशी रिऍक्ट होत असतात. त्याप्रमाणे कृती करत असतात.

   आता जरा मोठ्या मुलाकडे आपण जाऊया. ही मोठी मुलं आहेत ना आपल्या मनाप्रमाणे करत असतात. आई बाबा कितीही रागावले तरी त्याचा त्यांच्या मनावर काही परिणाम होत नाही. काही मुलं आईने सांगितलेल पटकन ऐकतात तर काही मुलं आळशी असतात.

 सकाळी शाळेत जायचं आहे अशा वेळेला आई खूप हाका मारते पण मुल आळशी असल्याने लवकर उठत नाही. मग शाळेला जायची खूप घाई होते. त्याविरुद्ध एखाद मुल आहे ना ते आईचं पटकन ऐकतं आणि अंघोळ करून छान तयार होतो शाळेत जाण्यासाठी.

   हे अगदी साधे उदाहरण तुम्हाला मी दिलं. अशी खूप उदाहरणं आहेत. मुलं जेवताना आळस करतात, खेळताना खेळायचा देखील आळस करतात, शिक्षकांनी सांगितलेल्या अभ्यासाचा कंटाळा, आईने सांगितलेला कामाचा कंटाळा, कंटाळा म्हणजे काय आळसच ना! तर असा हा आळसाचा दिवसेंदिवस मानवी शरीरावर परिणाम होत जातो. माणूस मग आळशी होतो. त्याला कामाचा उत्साह राहत नाही.

   आता मुल कॉलेजला जायला लागले आहे. कॉलेजला गेल्यानंतर एखादे संकल्पना तो आपल्या वडिलांपुढे मांडतो. त्याला एखादा बिजनेस सुरू करायचा असतो. अभ्यासाचा जरा कंटाळा आलेला असतो. तर अशा वेळेला आई वडील त्याच्या मनाप्रमाणे कृती करतात. एक छोटासा बिजनेस त्याला घालून देतात. पण मूळचा त्याचा स्वभाव आळशी असल्याने तो नीट अभ्यासाही करू शकत नाही. आणि धड आपल्या बिजनेस कडे लक्ष देऊ शकत नाही. आपल्या मित्रांमध्ये रमामाण

होतो. अशावेळी काय तर, बिझनेस मध्ये नुकसान होते. आणि अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. म्हणतात ना "ना घर का न घाट का.." त्याचे असे होऊन जाते. केवळ अंगी आळस आहे म्हणून ह्या सर्व नुकसानीला त्याला सामोरे जावे लागते. आई वडील आपले विचारच करत राहतात. मुलगा आज सुधारेल, उद्या सुधारेल वाट पाहत राहतात. पण मुलगा सुधारण्याचे नावच घेत नाही. अशा वेळी आई वडिलांच्या मनाची स्थिती खूप वाईट असते. तर मुलांनो आपल्या आई वडिलांच्या मतांचा आदर करा. अंगातला आळस झटका. अभ्यास करून छान मार्क मिळवा. आणि छान उच्च पदस्थ नोकरी करा. जर बिझनेस मध्ये तुम्हाला छान पुढे जायचं असेल तर बिझनेस हा देखील अभ्यासपूर्वकच करावा लागतो. हेही लक्षात ठेवा. "आळसे कार्यभाग नासतो" अशी एक म्हण आहे. तर या म्हणीचा विचार करा आणि अंगातला आळस झटकून टाकून कामाला लागा.

  आपल्या मोठा माणसांचे सुद्धा असेच आहे. काही जणांना आपल्या शारीरिक संपत्तीची अजिबात काळजी नसते. खाणार आणि पिणार मस्त राहणार. व्यायाम करणार नाहीत. कारण व्यायाम करायचा कंटाळा. आळशीपणामुळे झोप उशीर पर्यंत घ्यायची. मग व्यायामाची वेळ निघून जाते. दिवसभर नोकरीचे व्याप आहेतच. बिझनेसचे व्याप आहेतच. मग मी व्यायाम कधी, कसा करू? असा प्रश्न ते मनालाच विचारतात. त्यामुळे त्यांचे हे विचार पूर्ण होतच नाहीत. पण हल्ली स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणारे अनेक लोक आहेत. आळशीपणा त्यांनी झटकून टाकलेला आहे आणि स्वतःच्या सौंदर्याकडे तब्येतीकडे लक्ष देत आहेत. छोटे छोटे व्यायाम प्रकार करत आहेत.  

    आपल्या गृहिणी आहेत त्यांनी जर का म्हटलं की मला कंटाळा आलाय घरातल्या कामांचा, स्वयंपाकाचा, मुलांचे डबे तयार करण्याचा तर काय होईल हो! सर्व ठप्प होईल घरातलं! पण ह्या गृहिणी अजिबात कंटाळा न करता आळस न करता दररोजचा दैनंदिन व्यवहार घरातला खूप छान संभाळत असतात.

  तर आता मी थांबते आळस या विषयावर खूप काही बोलता येते पण मी आता इथे थांबते आणि आपली रजा घेते...

  थांबला तो संपला, झटकून टाक जीवा आळशीपणा मनाचा...


 वसुधा वैभव नाईक 


Rate this content
Log in