रोजनिशी
रोजनिशी
रोजनिशी म्हणजे डायरी. या डायरीमध्ये आपल्या आनंदाच्या,सुखाच्या,यशाच्या प्रसंगांचे रेकॉर्डिंग कायम ठेवले पाहिजे. रेकॉर्डिंग म्हणजे आपले टिपण. व्हाट्सअपच्या या युगामध्ये आपण व्हॉइस टिपण करू शकतो. म्हणजेच रेकॉर्डिंग करून ठेवू शकतो, ऑडिओ करून ठेवू शकतो. तो मात्र आपल्या मेमरी मध्ये जपून ठेवला पाहिजे. म्हणजे आपल्याला हव्या त्यावेळी त्या मेमरीज परत बघता येतील. वाचता येतील,ऐकता येतील. त्यामुळे आपला मूड ठीक व्हायला मदत होईल.
आपल्या डायरितील नोंदिमुळे
गेलेला चांगला भूतकाळ स्मरून आपल्याला परत त्याचा आनंद मिळवता येतो. सुख उपभोगता येतं.त्या आठवणीत रमून जाता येते.
नकारात्मक भावनांमुळे आपले निगेटिव्ह ब्रेन होते,तो कचरा मनात साठेल अशा भावना आपण डिलीट करायच्या असतात. त्याचे लेखन करायचे नाही. आपल्या मेंदूला त्रास द्यायचा नाही.डिलिट करायच्या आपल्या मेमरीतून.
आपल्याला ज्या वेळी दुःख,निराशा, चिड,संताप, वैताग,राग, हेवे दावे,मत्सर अशा भावना मनात आल्या की आपण आपली डायरी काढायची आणि आनंदाच्या क्षणांमध्ये हरवून जायचे. हा मस्त मेंदूचा व्यायाम आहे.
आपल्याला आवडणारे विनोद,गाणी ऐकण्याची,पुस्तकं वाचायची,मित्रांबरोबर गप्पा करायच्या ,लहान मुलांची हसरी चित्र काढायची, लहान मुलात रामायचं,आपल्या यशाचे फोटो पाहायचे,आपला छान आलेला फोटो परत परत न्याहाळायचा, एखादा अविस्मरणीय प्रसंग आठवायचा इत्यादी गोष्टी केल्या की आपले मन प्रसन्न होते. मनातील निगेटिव्ह भावना निघून जाते. भावनांचा निचरा होऊन गेला की आपण आनंदी होतो. आपण सुखी होतो. यालाच ब्रेन डेव्हलपमेंट असेही म्हटले जाते.
आपल्या आयुष्यातील चांगल्या अनुभवांची यादी करावी. कोणी दिलेल्या कॉम्प्लिमेंट्स,प्रशंसा,केलेले कौतुक, पाठीवर मारलेली थाप,यश,मित्रांची मदत हे सर्व लिहून काढावं. ज्यावेळी आपण निगेटिव्ह भूमिका मध्ये जातो तेंव्हा हे सगळं वाचून आपलं मन पुन्हा स्थिर होतं. आणि या सर्व गोष्टीबद्दल आपण कृतज्ञता मात्र निश्चितच व्यक्त केली पाहिजे.
अगदी तुमच्या आवडीचे ठिकाण, आवडीचा रंग, प्रिय व्यक्तीची आठवण या सुद्धा मन सुखावून जातात...
जेंव्हा आपला मूड खराब होईल तेंव्हा या सगळ्यांचा वापर आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा आहे. आपली सुखाची ओंजळ भरून जाईल..
एकंदरीत काय तर स्वतः स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार व्हायचंय.
स्वतःच ब्रेन प्रोग्रामिंग स्वतःच करायचं आहे... निगेटिव्ह भूमिकेतून बाहेर पडायचं आहे. पॉझिटिव्ह विचारांचे स्वागत करायचं आहे.
नकारात्मक भूमिकेतून जो सकारात्मक विचार करतो तोच खरा शिल्पकार म्हणावा लागेल.
या कलावंताकडे जादूची कांडी आहे असे म्हणावे लागेल. अशी जादूची कांडी आपण प्रत्येक जण फिरवूया. जीवनाचा आनंद घेऊया. समाजात मानाचे स्थान मिळवूया.