चालाक परोपकारी गंपू
चालाक परोपकारी गंपू
जर आपण समाजातील लोकांचा अभ्यास केला तर आपणासं वेगळे-वेगळ्या विचारधारांचे माणसे दिसतात. काही फार स्वार्थी प्रकारचे माणसे असतात. ते नेहमी आपले हित साधन्याच्या प्रयत्नात सतत असतात. त्यांचा व्यवहार नेहमी गोगलगाय अन पोटात पाय असाच असतो.काही माणसे सतत दुस-याची मदत करण्यासाठी प्रयत्नशिल असतात.अशे अनेक प्रकारचे मानवी चरित्र नेहमी आपल्या आस-पास वावरत असतात. काही दिसतात वेगळे आणी असतात वेगळे, सुर्य लाजेल अन चंद्र लपेल अशी त्यांची थोरवी अस्ते. अशी नानाप्रकाराच्या मानसे भेटली म्हणजे आपल्याला निरनिराळे प्रकारचे अनुभव येत असतात.
एकदा मला फार अडचणीच्या गांवाला जाण्याच्या प्रसंग आला.हे गांव फार दुर्गम ठिकाणी असल्यामुळे ईथे दळनवळणाची साधने फार सिमित होती.एखादी सरकारी बस एकदाची निघाली कि मग तुमच्या जवळ फक्त निजी वाहना शिवाय काही दुसरा पर्याय राहतच नाही. उन्हाळ्यात लग्नसराई मुळे खुप भीड जमत असते हा सर्वांचाच अनुभव आहे. अशीच भीड त्या दिवशी जमली होती. दुष्काळात तेरावा महिना , भीड पाहुन मी अक्षरशाहा हादरुन गेलो होतो.निजी बस जशी आली. तसिच बस मधे प्रवेश करण्यासाठी झुंभड उडाली होती. आली अंगावर तर गेतली शिंगावर, जो-तो कसा-बसा, बसच्या आत मधे प्रवेश करण्याचे प्रयत्न करत होता. या प्रयत्नात प्रवाशांची भांडने पण झाली. माझे पण एका प्रवाशा सोबत भांडन झाले. शेवटी आम्ही दोघेजन गाडिच्या समोर उभे राहिले.निराश झालो. आता आपल्याला जाण्यासाठी काही साधन उरले नाही. शेवटी आम्ही गाडी चालवना-या वाहन चालकाला विचारले. अरे भाऊ आता या नंतर दुसरे काही साधन आहे कां?. त्याने आपली मुंडी हालवत सांगितले,उद्या मिळेल. हे ऐकताच आमच्या पाया खालची जमिनच सरकली होती.
आता आपण काय करायचे असा बिकट प्रश्न आमच्या समोर उभा राहिला.शेवटी त्या वाहन चालकाला आमची दया आली. त्याने आम्हाला त्याच्या केबिनमध्ये जिथे पहिलेच काही प्रवाशी बसले होते.त्यात अडजस्ट होण्यासाठी सांगितले.माझ्या सोबत जो प्रवाशी होता तो लगेच मी सामान आवरे पर्यंत कैबिन मध्ये वाहन चालकाच्या शेजारी कसा –बसा बसला. मग एकदम शेवटी दरवाजा नसलेल्या कैबिन मधे जीव धोक्यात टाकुन मी बसलो. उन्हाळ्याची दुपारची वेळ होती. गर्मिने सर्वजन त्रस्त झाले होते. मग एक गांव आले. जीथे एका प्रवाशाला उतरावयाचे होते. म्हनुन मी खाली उतरलो. माझ्या सोबत सगळेच खाली उतरले होते. वाहन चालक काही कामासाठी समोरच्या दुकानात गेला होता.त्यामुळे आम्ही सर्वजन त्याची प्रतिक्षा करत होतो. जेव्हा त्याचे येण्याचे संकेत मिळाले.तेव्हा आम्ही बसण्यासाठी वाटचाल केली.
ज्या प्रवाशा सोबत माझे भांडन जुंपले होते.त्या प्रवाशाने मला मोठ्या नम्र पणे आग्रह केला, साहेब आपन फार जोखिम असलेल्या जागी बसले आहे. तुम्हाला अशा जागी प्रवास करण्याची सवय दिसत नाही. आणी तुमचा प्रवास फार लांबचा आहे.मला ईथेच जवळ-पास उतरायचे आहे.आपण वाहन चालकाच्या शेजारी बसावे. मी तुमच्या जागी बसतो.पण त्याची चलाकी माझ्या लक्ष्यात आली नाही. सुसर बाई तुझी पाठ किती मऊ, आपले हित साधन्याचा त्याचा कट होता. त्याचा असा नम्र व्यवहार बघुन मी त्याच्या प्रस्तावाला हामी भरली. मी मनात त्याचे आभार मानले. थोड्या वेळापूर्वी आपण या मानसाविषयी किती चुकिचा विचार करत होतो. मग मलाच स्वतःची खंत वाटायला लगली.
मी बस सुरु झाल्यावर सारखे त्याच्याकडे बघत होतो.पण तो माझ्या नजरेला-नजर मिळवत नोव्हता. चोराच्या मनात चादणं असते, तरी मला वाटले कि त्याला आपल्या केलेल्या व्यवहाराची लाज वाटत असावी. म्हणुन तो माझ्या कडे दुर्लक्ष करत असावा. आमचा प्रवास सुरु झाला होता. मी थोड्या वेळ्याने अनुभव केले की वाहन चालकाच्या बाजूने असणाऱ्या मोठ्या फटीमधुन गरम वाफा इंजिन व्दारा उसर्जित होऊ लागल्या. जशी –जशी बसची गति वाढायला लागली, तशी-तशी असाह्य अशी अति गरम वाफांचा सामना मी करत होतो. हे बघुन माझ्या शेजारचे प्रवासी माझ्या वर स्मित हास्य करु लागले होते. कुठली कोण अन बिळातली कोण, याची जानीव मला जाली. जाने माझ्या वर हे संकट नम्र पने ओढवले होते तो एक्दम सारखा बाहेरच्या भागला बघत होता. ब-याच वेळे नंतर त्याचे गंतव्य स्थान आले.आणी तो उतरला.आणी माझ्याकडे न बघता सरळ निघून गेला.
