भक्ति.
भक्ति.
एका शेतकरी परिवारात एका मुलाचा जन्म झाला होता. तो परिवार शहराच्या जवळच असणा-या खेड्यात राहत होता. परिवारामधे तो घराण्याचा एकमात्र चिराग होता. वडिलांनी बहिणींचे लग्न वैगरे आटोपल्या नंतर मुलाच्या शिक्षणासाठी शहरामधे घर बांधले होते. आता परिवार शहरात वास्तव्य करित होता. मुलाचे वडिल आता शहरा वरुनच आपला वाडवडिल शेतिचा व्यवसाय करित होते. मुलाने पण शिक्षित होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न सुरु केले होते. मुलाने मेहनत करुन तो सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला होता. त्याला एका प्रतिष्ठित कंपनी मधे जॉब मिळाला होता. आई-वडिलांना आपल्या जीवणाचे सार्थक झाले असे वाटत होते.
शहरात ज्या नगरात कुंटुंब राहत होते. तिथे त्यांची चांगली प्रतिष्ठा वाढली होती. वस्ती नविन असल्यामुळे बरेच लोकांशी घरच्या सारखे नगरातील रहिवाशांचे मन जुळले होते. त्या सर्व लोकांनी योगदान करुन एक मोठे मंदिर त्याच नगरात उभारले होते. त्यात मुलाच्या वडिलांचा सिंहाचा वाटा आणी योगदान होते. त्यांचा मुलगा चांगला कमाई करित असल्यामुळे, त्यांची गणना प्रतिष्ठित वरिष्ठ नागरिका मधे होत होती. आता त्यांचे जास्त लक्ष शेतिकडे नव्हते. मुलाचे वडिल शेति बटईने देवुन मोकळे होत होते. आता ते नगरातील वरिष्ठ मित्रांन सोबत मंदिर परिसरात जास्तीत जास वेळ देत होते. बरेच धार्मिक संस्कार घडवुन आनण्यात आपला पैसा, वेळ आणी ऊर्जा ते खर्च करित होते. त्यांच्या या चांगुलपणामुळे त्यांना फार सम्मान मिळत होता. देवळातील पुजारी पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवळातील व्यवस्था सांभाळत होता.
मुलगा आता वयात आल्यामुळे लग्न करने जरुरी होते. पण कोराना महामारी मुळे लग्नचे कार्य रखडत चालले होते. कोरोणाची दुसरी लाट थोडी मंदावली होती. त्यांनी आता लग्न जुळण्यासाठी आपल्या प्रयत्नला गति दिली होती. सुदैवाने मुलासाठी पण एक सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीचा योग चालुन आला होता. मुला-मुलीचे पाहिणी व पसंदी झाली होती. कोरोनाची सावट थोडी शितल पडली होती. बरेच लोकांनी पण हिम्मत जुटवुन छोटे –मोठे लग्न कार्य-प्रसंग करने सुरु केले होते. सगळेच सॉफ्टवेअर इंजिनिअर कर्मचारी कोरोना काळात बहुतेक वर्क फ्राम होमच्या सुविधामुळे घरुनच नौकरी करित होते. त्यामुळे लग्न करने जास्त सोईचे होते. वडिलांनी थाटा-माटात मुलांचे लग्न केले होते. सर्व परिवार फार आनंदी होता.
मुलाच्या वडिलांना अस्थमाचा आजार होता. मधे-मधे त्यांचा त्रास थंडीमुळे वाढत पण होता. सुन आणी मुलगा हुनिमुनला जावुन आले होते. कोरोण्याच्या तिसरी लाटीच्या भितिमुळे ते फारसे फिरु शकले नव्हते. कोरोणाच्या भितिमुळे बरेच जवान नौकरी पेशेवाले कर्मचारी त्रासुन व कंटाळवाने झाले होते. कंपनीच्या काही कामासठी पति-पत्निला पुण्याला जाण्याची संधी मिळाली होती. आता समोर कंपनी मागे-पुढे पुणे कार्यालयात बोलवणारचं !. म्हणुन त्यांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला व तशी योजना राबवली होती. नविन-नविन लग्न झाले होते. त्यांना आपल्या संसाराची उभारणी करावी म्हणुन आई-वडिलांनी पण त्यांना आनंदाने जाण्याचा आशीर्वाद दिला होता. सुन आणी मुलगा आपला संसार पुण्यात मोठया थाटाने करित होते. ते आनंदी होते. त्यांच्या आनंदात आई-वडिल पण आपला आनंद मानत होते.
अचानाक त्या वर्षि थंडीच्या मागे-पुढे, एका-मागे-एक अशा लाटी येत होत्या. मंदिराच्या पुज्या-याला काही महत्वाचे काम आले होते. त्याला आठ-दहा दिवसासाठी बाहेर गांवी जाने अत्यंत जरुरी होते. त्यामुळे पुजा-याने मुलाच्या वडिलांना आग्रह केला कि त्याच्या अनुपस्थिति मधे मंदिरात सकाळ-संध्याकाळ देवाची पुजा-पाठ करावी !. त्यांनी या कार्यासाठी होकार दिला होता. आता त्यांना ही जवाबदारी पार पाडने आवश्यक होते. वडिलांचा दमा थंडीमुळे वाढने सुरु झाला होता. पुज्याराचे दायित्व पूर्ण करने म्हणजे सकाळी लवकर उठुन संपूर्ण दिनचर्या आटपुन स्नान वैगरे करुन कमीत-कमी कपडे धारण करुन पुजेचे कार्य करने आवश्यक होते. त्याच काळात अतिशय तीव्र थंडीची लाट ब-याच अवधीसाठी निरंतर चालु होती. बहुजन धार्मिक समाजाचा माणुस आपल्या कडुन काही कमी राहु नये, याची सारखी दक्षता घेत होता.पति-पत्नि दोघेच घरी असल्यामुळे कोणी काळजी घेणारा नव्हता. इतक्या थंडित हा जास्तीचा उपद्रव कशाला लावुन घेतला अशी त्यांची पत्नि पण धार्मिक्तेमुळे म्हणु नाही शकली होती.पुजा-याने दिलेले दायित्व त्याने अत्यंत चोखपने पनाला लावले होते.
पण अतिथंडिचा तडाखा त्याला बसला होता. छातित श्र्वास दाटला होता. त्याची प्रकृति ढासळ्त चालली होती.त्याचा मुलगा आणी सुन संक्रातिच्या संस्कारासाठी येणार होते. घरी त्यांचा सोहळा होणार होता. त्यासाठी काही जवळचे सोयरे येनार होती. मुलगा आल्यावर दवाखाण्यात जान्याची मानसिक तैयारी केली होती. मुलगा कार्यक्रमच्या आधल्या दिवशीच आला होता. आल्या-आल्या , त्याला कशाला त्रास द्यायचा म्हणुन कार्यक्रमाच्या दिवशी आंथरुना वर पडुन राहिले होते. रात्री एकदम श्र्वास घेण्यास त्रास होत होता. तेव्हा सकाळी दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. तो पर्यंत त्याच्या दोन्ही मूत्रपिंडावर वाईट परिणाम झाला होता. रुग्णची परिस्थिति आता आवक्या बाहेर गेली होती. शेवटी त्यांचा मृत्यु झाला होता. तो एवढया माहामारीच्या लाटीतुन सुखरुप बाहेर निघाले होता. पण थोड्याशा निःकाळजी पणामुळे दगावला होता. आता तर त्याचा खरा सुखाचा प्रवास सुरु झाला होता. नविन सुन,सोयरे आले होते. नातवंडाचा सहवासात राहुन जीवनाचे खरे सुख भोगण्याची वेळ आली होती.कदाचित ईश्र्वराने त्यांची भक्ति बघुन व अतिप्रसन्न होवुन आपल्या सेवेसाठी कदाचित स्वर्गात बोलवुन घेतले असावे असे समजण्यात काही हरकत नाही !.
