STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

भीती

भीती

1 min
401

अलक

भीती... 


बायको आणि दोन 

लेकरांना घेऊन स्मशानभूमीच्या झोपडीवजा घरात राहून तिथले सारे काम तो बघायचा. त्याची लेकरं

जळणाऱ्या चितेच्या उजेडात खेळायची, उबेला बसून अभ्यासही करायची 


        एकदा एका पत्रकाराने त्याला विचारले " इथे तुम्ही राहता तेव्हा भीती नाही का वाटत तुम्हाला?" 

 तो म्हणाला - "साहेब, मेलेल्या माणसांची काय भीती."

   

  


Rate this content
Log in