Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

भावना

भावना

2 mins
143


जीवनातील नऊरसांना त्यांच्या अभिव्यक्तींना या जीवनी खूप महत्व आहे.

   अगदी तान्ह्या बाळापासून भावना उपजतच असतात.फक्त बाळ बोलून दाखवू शकत नाही तर मोठी माणसे कधी रडून,कभी हसून,कधी रूसून,कधी प्रेमाने,कधी द्वेशाने,कधी वाद करून अशा विविध रूपात भावना व्यक्त करतात.

  कधीतरी काहीच न बोलता देहबोली द्वारे देखील भावना व्यक्त करता येतात.

   परवाच शाळेत एक प्रसंग घडला. मी तशी शाळेत अर्धा तास आधीच जाते,शाळा सात वाजता भरते मी शाळेत साडेसहाला हजरअसते.

  दोन दिवस मी पाहत होते मांजर वत्याची दोन पिल्ले शाळेच्या आवारात मस्त मस्ती घालत होती. तिसर्‍या दिवशी दोन पाचवितील मुलांनी त्या मांजरांसाठी अर्धालीटरची दुधपिशवी आणली होती व ती फोडून मुले मांजरांना दूध एका ताटात देत होती.

मला हे पाहून खूप छान वाटले.मुलांना वाचारले"आईबाबांनी दिली का दुधाची पिशवी?" मुले म्हणाली नाही "आमच्या खर्चातील पैसे साठवले होते आईने दिलेले तेच वापरले आज"

  मला खूप आवडले मी मुलांच्या व मांजरांच्या डोक्यावरुन हात फिरवला वपुढे ऑफीसमधे जावून बसले.

  विचारचक्र सुरू झाले. हीच ती प्रेमळ भावना ..आज मुलांच्या मनात प्राण्यांबद्दल प्रेम आहे.तर माणसांबद्दलही निश्चितच असणार,असेच प्रेमाने सर्वांनी वागावे.

   दुसरा अनुभव सांगते.स्काॅलरशीपला माझ्याकडे एक वाद्यार्थी येत होता.सन १९९४ मधे.४ थी स्काॅलरशीप साठी तो बसला होता.पण बेभान होता.त्याला वाढवताना त्याची आई खूप वैतागली होती.पण तो माझे ऐकायचा त्यामुळे त्यांनी माझ्या घरी त्याला सोडायला सुरूवात केली.बुद्धिमत्तेचा विषय चालू होता.त्याला म्हटले"बाळा जर रस्त्यावर तुला एका पायाने लंगडे कुत्र्याचे पिलू दिसले आणि त्याला रस्ता ओलांडायचा आहे तर तु काय करशील?" त्याने लगेच क्षणात उत्तर "मी त्याला दगड मारेन" मी त्याला त्याची कृती कशी वाईट आहे हे समजावून दिले.व नंतर त्या समान काही प्रश्न विचारले "भावनिक बुद्धिचे" त्याने आता उत्तरे हवी ती दिली होती.इथे त्याला भावना कशा जपतात याची उदाहरणे द्यावी लागली कृतीतून समजावावे लागले.पण त्याला समजले.

  असे आपल्या दैनदिन जीवनात अनेक प्रसंग येतात.माझ्या वर्गातील मुलगा जो पहिली ते चौथी माझ्याकडे होता आता सातवीला आहे .त्याचे वडील गेले .तो माझ्याकडे आला माझ्या कमरेला विळखा घालून खूप रडला..त्याचे मन रिकामे केले .अशा अनेक भावनांचा संगम आपल्याला मानवांमधे नाही तर अगदी प्राण्यांमधे पण दिसून येतो,हे समजायलाही भावना मनी असायला हव्यातच की!

 मानवाचा स्वभाव हा भावनांच्या मेळाव्यातील जग आहे .असे म्हटले तरी चालेल.



Rate this content
Log in